हल्ली जुलै महिन्याची २६ तारीख जवळ येऊ लागली की इथं मुंबईत आम्हांला धडकीच भरू लागते! पावसाची भीती नाही हो. पाऊस काय त्याला हवा तसा पडतो. आणि दरवेळी असा सणकून पडायला तो काय ठाण्यातला कॉंग्रेसचा उमेदवार आहे? तेव्हा भीती त्याची नाही. आम्हांला भय वाटते ते एकाच गोष्टीचे, की २६ जुलै आली रे आली की आमचे पेपरवाले आणि च्यानेलवाले गटारं, नाले आणि खड्ड्यांशिवाय काही बोलतच नाहीत! बोला रे! बोलण्याला आमची ना नाही. पण त्याला काही मर्यादा? आणि इथं पावसाचा पत्ता नसतो अन् यांचं आपलं चाललेलं - मुंबई पुन्हा जलमय होणार! (त्या सहाराच्या आरकेबीला आवरा रे कुणीतरी! बोलेन तर तोंडातल्या तोंडातच असा काय नवस केलाय काय त्याने?) असो.

ही वृत्तपत्रे आणि च्यानेलवाले यांच्यामुळे अलीकडे आम्हांला तर असंच वाटू लागलं होतं, की या उभ्या महाराष्ट्रात मिठी नदीशिवाय अन्य कोणती नदीच नसून, त्या नदीची नोंद रा. रा. किरीटजी सोमय्या यांच्या सातबारा आणि आठ-अ वर आहे!

पण अलीकडेच लोकसत्ताने आमचा हा गैरसमज दूर करण्याचे मोठे ऐतिहासिक कार्य केले आहे. लोकसत्ताने महाराष्ट्रातील नद्यांच्या सद्य(दुः)स्थितीबद्दलची एक मालिका नुकतीच प्रसिद्ध केली - 'मरणासन्न नद्या' नावाची. बातम्यांचे किरकोळीकरण झाल्याच्या आजच्या या जमान्यात अशी - नद्या वगैरे विषयांवरील मालिका प्रसिद्ध करायची म्हणजे धाडसच म्हणायचं! (ही मालिका सुरू झाली, तेव्हा आम्हांला तर अशीही शंका येऊन गेली, की हा काही तरी 'ध चा मा'चा प्रकार असावा! म्हणजे कोणीतरी 'ट्या' चे 'द्या' केले असावे! आणि तसेही मालिका म्हटल्यावर डोक्यात पह्यल्यांदा नट्याच येणार नाही का?)

परंतु लोकसत्ता अशी धाडसं नेहमीच करीत असते.
संपादकाला स्पॉंडिलायटीस नसला आणि मालकाची सत्ता व आर्थिक सोयरीक मर्यादीत असली, की अशी धाडसी वृत्ती येते पेपरात वा च्यानेलमध्ये.
लोकसत्तामध्ये ती आहे. त्या जोरावर त्यांनी नद्यांची मालिका लावून येथील सत्ताधीशांच्या भ्रष्टगंगेचा तळ उघडा पाडला!

लोकसत्ताचे हे करणे अन्यांनाही जमो!

(स्वाध्याय - वाचा लोकसत्ताचा अग्रलेख 'नद्या झाल्या विषवाहिन्या')

Age of The Lilliputians!  

Listen buddy,
I, Bapu Atrange am not a media-hater or journo-basher.
But whenever I look at those news channels or read tomorrows trash, i.e. my morning newspaper, I feel like drinking a dirty wine served in the plastic mug!

Tell me, as they say, has the Age Of Lilliputians really arrived?
I think it is.

The way these media people with that ugly boom in their hand and a Peeping Tom in their head are creating the so-called breaking news or hard news or whatever news they call it - out of so trivial a thing, it is nothing but a Sansanikhej crime in the name of journalism!

Yes, yes, I know, what they will say!
It’s the usual rhetoric – ‘the competition, the TRP, the advertiser’s pressure, and the people love to watch this, it is the viewer who want such type of stories’ etc. But My Dear Sir, if this is so, then you simply go ahead. But then, please for journalism’s sake don’t you ever call the trash you publish or broadcast The News!
That is not news. The Dhanush of Ravana.
The cave where Ram and Sita spent a night.
Aishwarya got pregnant.
Rakhi Sawant slapped her boyfriend.

This is not news, you Lilliputians!
Or is it after all the news?
THE NEWS OF THE LILLIPUTIANS FOR THE LILLIPUTIANS BY THE LILLIPUTIANS?

दादू अमिताभ बच्चन, ड्यूड अभिषेक बच्चन आणि सौ. ऐश्वर्या राय-बच्चन आणि आमचे रा. रा. भाऊराव खंडागळे, त्यांचा पुत्र चि. भाग्येश आणि सून सौ. भाग्यश्री खंडागळे यांच्यात कमालीचे साम्य असल्याचे पाहून आम्हांस आश्चर्याचा धक्काच बसला!

आता तुम्ही म्हणाल, की कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्यामभट्टाची तट्टाणी!
कुठे शहेनशहा अमिताभ आणि कुठे तुमचे भाऊराव खंडागळे (द्वितीय श्रेणी कर्मचारी, मुंबई महापालिका) !
या दोघांमध्ये कसले आले डोंबलाचे साम्य!

मान्य. अगदी मान्य, की रामगोपाल वर्माकी आगमधला अमिताभ सर्वांसमक्ष नाकात बोट घालून आमच्या भाऊरावांसारखेच कोरीव काम करतो. आम्हांला हेही मंजूर, की अलीकडच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्याचा जो वॉर्डरोब असतो तो त्याने आमच्या भाऊरावांकडूनच उसना घेतलेला असावा असा असतो. पण म्हणून काय झाले? शेवटी अमिताभ तो अमिताभ!

आणि अमिताभचे एकवेळ जाऊ द्या. आता हा सिंह इतका म्हातारा झालाय, की कुठल्याही जाहिरातीचं गवत खाऊ लागलाय! उद्या कुणी पैसे दिले, तर तो 'कंपनी का माल है, कंपनी का प्रचार है' असं म्हणत लोकलमध्ये दाढीची ब्लेड विकायलाही कमी करणार नाही! तेव्हा त्याचं जाऊ द्या. पण भाऊरावांचा भाग्येश आणि सौ. भाग्यश्री यांची तुलना चक्क अभिषेक आणि ऐश्वर्याशी?

अरे काय लक्ष्मी-नारायणाचा जोडा दिसतो तो!
परवा आत्यंतिक एकाग्रतेने टाईम्सवाल्यांची झूम टीव्ही पाहात असताना अचानक हा जोडा पडद्यावर आला आणि आमच्या मातोश्रींच्या मुखातून अनावधानाने शब्द गेले, की 'अशीच असती सून आमुची सुंदर रूपवती...' म्हणजे बघा, काय दिसत असतील ते!

(आता मातोश्रींच्या त्या काव्यपंक्तीनंतर आमच्या दहा-बाय-दहाच्या पेन्टहाऊसमध्ये - गेल्या दिवाळीत रंग काढल्यापासून आम्ही आमच्या घराला पेन्टहाऊसच म्हणतो! - तर त्यात जो काय इतिहास घडला तो येथे अर्थातच सांगण्यासारखा नाही. एवढेच सांगतो, की पडद्यावर झूम वाहिनी सुरू होती आणि घरात हंगामा!!)

अशा या जोड्याच्या जोड्याची तरी सर आमच्या खंडागळेंच्या जोड्याला (म्हणजे भाग्येश व भाग्यश्री यांना) येईल का?

पण मित्रांनो, सख्यांनो, सवंगड्यांनो, देवाघरची रीत अजब निराली असते हेच खरे!
आमचे भाऊराव नित्यनेमाने दर सोमवारी लॉटरीचे तिकिट काढतात आणि मंगळवारी पहाटे सिद्धिविनायकाच्या रांगेत इमले बांधत उभे राहतात! भाग्येश तर दहावीत असल्यापासून सिद्धिविनायकाला अनवाणी जातो. त्यामुळेच तर त्याला कुरिअर कंपनीत नोकरी लागली, अशी त्याची डोळस श्रद्धा आहे! सौ. भाग्यश्री यांच्या मते चांगले स्थळ नशिबातच असावे लागते! याबाबतीत त्यांचे आणि महाराष्ट्राचा हसरा गजरा विलासराव यांचे अगदी तंतोतंत पटते! तर सौ. भाग्यश्री आपले नशीब नेमके कोठे फुटले याचा अंदाज घेण्यासाठी लग्नानंतर नित्यनेमाने सिद्धिविनायकाला जाऊ लागल्या आहेत!

हे म्हणजे बच्चन प्रभृतींसारखेच झाले की!
पोराचं करिअर जोर धरत नाही - चला सिद्धिविनायकाला.
सूनेला मंगळ आहे - चला सिद्धिविनायकाला.
आजारपण आले - चला सिद्धिविनायकाला.
पिक्चर चालू दे - चला सिद्धिविनायकाला.

भाऊराव आणि दादू अमिताभ - इज देअर एनी डिफरन्स? किंवा तेथे काही फरक आहे काय?

याबाबतीत फरक एवढाच आहे - की अमिताभ जातो तेव्हा दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या अंगात येते!
भाऊराव सिद्धिविनायकाला जातात कधी आणि येतात कधी याचा त्यांच्या शेजा-यांनाही पत्ता नसतो!

रा. रा. अरूण साधू यांनी विजय तेंडुलकर यांच्यावरील श्रद्धांजलीपर लेखांच्या संदर्भात प्रसारमाध्यमांबाबत एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. लोकसत्तेच्या पुरवणीतील आपल्या लेखात त्यांनी असे नमूद केले आहे, की तेंडुलकरांच्या मृत्युनंतर निदान माध्यमांनी तरी त्यांना पुरेसा न्याय दिला.

म्हणजे काय झाले, तर तेंडुलकर गेल्यानंतर - १९ व २० रोजी आणि नंतर २५ मे रोजी मराठी वृत्तपत्रांनी त्यांच्याबद्दल भरपूर लेख प्रसिद्ध केले!

त्यातले काहीच लेख खरोखर वाचनीय होते.
मृत्युनंतरच्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया (त्याला प्रतिक्रियाच म्हणायचे! श्रद्धांजली हा शब्द इथे मिसफिटच! ) कोण वाचते कोण जाणे? पण त्या वाचवत नाहीत. वृत्तपत्रांनी जोपासलेली ही रूदाली संस्कृती आता स्वतःहून हद्दपार करायला हवी!

एखाद्या सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या मृत्युनंतर सार्वजनिक जीवनातील जीवंत व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेण्याची वृत्तपत्रीय क्रिया कशी चालते याची माहिती असणारांना ही रूदाली संस्कृती म्हणजे काय याचा अर्थ समजेल. पण ते असो!

तर तेंडुलकरांचे असे वृत्तपत्रीय श्राद्ध जोरदारपणे घालण्यात आले याचे रा. रा. अरूण साधू यांना समाधान वाटते. तर त्यांना तसे समाधान वाटू दे. पण त्या लेखांमधून तेंडुलकर हाती लागले का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा आमच्या नजरेचा आत्रंगपणाही असू शकेल, परंतु आम्हाला भावला, आवडला तो एकच लेख. त्याचा मथळा होता - 'विचार-कलहांचा अग्रनायक'. लेखक होते रा. रा. अरूण टिकेकर आणि हा लेख प्रसिद्ध झाला होता चक्क सप्तरंग या सकाळच्या रविवार पुरवणीत! (सप्तरंग पुन्हा 'मोठा' झाला व रंगात आला हे पाहून खरेच बरे वाटले! )

रा. रा. अरूण टिकेकर म्हटले की त्यांची ती सुप्रसिद्ध बिकट भाषा आठवते! या लेखातही त्यांची तीच भाषा आहे, तीच शैली आहे. पण त्या भाषेची व शैलीचीही खास खुमारी असते! (रा. रा. टिकेकरांच्या टीकाकारांना अर्थातच ती समजलीच नाही. सुमारांची सद्दी असलेल्या काळात असेच होत असते. त्याला नाईलाज असतो.)

पण केवळ भाषा वा शैलीमुळे रा. रा. टिकेकरांचा सदरहू लेख चांगला झाला असे म्हणणे त्या लेखातील आशयावर अन्याय केल्यासारखे होईल. 'तेंडुलकर' समजून घ्यायचे असतील तर पंडिती गांभिर्याने लिहिलेला हा लेख टाळताच येणार नाही.

आजकाल वाचनाचे समाधान देणारे लेखन वृत्तपत्रांतून अभावानेच येते. रा. रा. केतकर, रा. रा. टिकेकर असे एका हाताच्या बोटांवर मोजता येतील असे पत्रनायक सोडल्यास तेथे अवघीच सुमारांची सद्दी! अशा काळात आलेला हा लेख म्हणूनच मनाला भावून जातो...

रा. रा. डॉ. अरूण टिकेकर व सप्तरंग पुरवणीचे आम्ही, बापू आत्रंगे या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन करतो!

Friends, COUNTRYmen and RUMmen,
Yesterday the 'War of Vadapav' came to an end, as Thanekars voted in the most entertaining Loksabha bypoll.
But was it really entertaining?
Were the voters really interested in that election and the propaganda war?
No, the voters turnout shows it all and well! Only 26 percent voters caste their precious vote.
Yes, the Precious Votes!
In these days of Rising Inflation, the vote have became so precious that nobody wants to 'give' it to anybody!
But that's another issue. The point I want to raise here is, the newspapers - those self-proclaimed voice of the people - they almost fail to gauge this undercurrent! All those Marathi Newspapers - Loksatta, Maharashtra Times, Sakaal, Lokmat - they just kept on publishing news items regarding this election, as if that was a life and death issue for the Thanekars.
So the lesson we should take from that bypoll is there is always a life beynd the news and that is much much different and real!!
Whatdoyathink?

Welcome  

Friends,
reporters tells us what is happening in the world. but who tells us about reportes? who tells us what is happening in their well guarded world?
this blog will try to report you exactly that.it will show you a hidden side of the marathi mewspaper industry.
i know it is going to be very interesting and a bit illuminating experince.
so be prepared...
Bapu Atrange is coming with the breaking news... about the breakers of the news... verrrry sooon!