वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य यांस सविनय निवेदन -
गत काही महिने आम्ही एका वेगळ्या उद्योगात मग्न होतो. खरे तर उद्योग हाच, लेखनाचा होता, परंतु वेगळ्या माध्यमासाठी आम्ही लिहित होतो व ते माध्यम म्हणजे दूरचित्रवाणी हे होय.
होय, दूरचित्रवाणीवरील मी मराठी या वाहिनीवरील एका मालिकेसाठी आम्ही लेखन करीत होतो.
त्या मालिकेचे नाव, नावात काय आहे? असे असून, ती मालिका दर शुक्रवारी रात्री साडे नवाच्या ठोक्यास प्रक्षेपित होणार आहे. उद्या, शुक्रवार दिनांक चार सप्टेंबर रोजी त्या मालिकेचा पहिला भाग दाखविणार आहेत.
तरी आपण सहपरिवार, इष्ट मित्रमैत्रिणींसह ही मालिका पाहून तिच्यावर टीका आणि टिपण्णी करण्याची कृपा करावी, ही विनंती.


मालिकेचे लेखन संपले, की मग बातमीदारवर तुम्ही आहात आणि आम्ही आहोतच.
अनेक दिवसांची कसर भरून काढायची आहे. अनेक विषय मस्तकी आहेत.
त्यांचा सविस्तर समाचार घेऊच.

मध्यंतरी आमच्या कानी अशी चर्चा येत होती, की
बापूंना एका वृत्तपत्राच्या म्यानेजमेन्टने दम भरल्याने बापू भयग्रस्त झाले व म्हणून त्यांनी ब्लॉगलेखन थांबविले. तर तसे काही नाही. कारण -
१. आम्ही ज्या प्रकारचे लिखाण करतो, त्यास मराठीमध्ये मोठी परंपरा असून, त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता आमच्या अंगी यावी असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.
२. आम्ही बातमीदारवर जे लिहितो ते कोणाच्याही विरोधात नसते, तसेच येथे कोणाचीही बदनामी करावी असा उद्देश नसतो व हे समजून घेण्याची शक्ती पत्रकार व पत्रमालक व पत्रव्यवस्थापक आदीकरोनी सर्वांस असावी, असा आमचा अजून तरी समज आहे.
असो.

आमच्या या निवेदनाने सर्व अफवा, वावड्या, बोलवा व चर्चांस पूर्णविराम मिळेल, अशी आमची खात्री आहे.
आपण बातमीदारवर जे प्रेम करीत आहात, ते असेच कायम राहो, हीच कामना.
(हे फार इमोशनल होतंय का? होऊ दे.)

- आपला नम्र,
बापू
(दि. ३ सप्टेंबर २००९)

This entry was posted on 3.9.09 at 21:17 . You can follow any responses to this entry through the comments feed .

5 comments

Anonymous  

वा:, बापू, म्हणजे तुमची लेखणी बरीक ‘प्रोफेशनल’ अंगाला झुकली होती. शुभेच्छा.

September 4, 2009 8:18 AM
Anonymous  

herzlich wilkommen, Bapu.

- Sheetyuddha Sadaanand.

September 4, 2009 8:43 AM

Bapu back. Dhan Tanan!

September 4, 2009 1:07 PM

जमलं होतं बरीक; पण इथे जसे "सुटता" तसे सुटला नव्हतात. वाव असुनही. असो. आमच्या मौलिक सुचनेचा तुम्ही विचार करालच. :p
अजुन खुसखुशित करता आलं तर पहा.

राखी सावंतचं भारी जमलं होतं हं बापू.

September 5, 2009 12:45 AM
Anonymous  

manje bapu tumi paperline sodali manta ka kay? as o kay kartas.

September 12, 2009 8:10 PM

Post a Comment