आजचा मुंबै सकाळ व चित्रमय टुडे वाचलात का?
हो. सकाळीच.

आणि त्यातील टुडेच्या वर्धापनदिनाची बातमी?
ती 'सकाळ'मध्ये हशा-टाळ्यांचा झिम्मडझिम्मा या शीर्षकाची बातमी ना? वाचली की.

मग काय वाटले?
काय वाटणार? सकाळमधील एक पुरवणी तब्बल तीन वर्षे सुरु राहिली, याबद्दल आनंदच वाटला! शिवाय बातमीचा मथळाही आवडला आम्हांला. मराठी पेपरांची ही परंपराच आहे बरे का. दरवर्षी एकदा तरी असा मथळा येतोच छापून. बहुधा त्याचा परमनंट ब्लॉक करून ठेवलेला असावा. कदाचित बातमीच्या इंट्रोचाही ब्लॉक तयार असेल. पावसाळ्यातला कार्यक्रमासाठी हा इंट्रोचा ब्लॉक. तोच कार्यक्रम उन्हाळ्यात झाला, की हा इंट्रोचा ब्लॉक. चांगले आहे. यातून डोक्याची केवढी बचत होते!

आणि त्या वर्धापनदिन सोहळ्याबद्दल काहीच नाही वाटले?
व्वा! वाचून मजा वाटली की. जितेंद्र जोशी यांच्या कविता आणि कोट्या, नकलाकार श्रीनिवास लखपती यांच्या नकला, असा छानच नकली कार्यक्रम आयोजित केला होता सकाळकारांनी. ही नवी परंपरा सुरु केलेली दिसतेय सकाळने. लावण्या, नकला, ऑर्केस्ट्रा, त्याचे पांचट सूत्रसंचालन... अत्यंत उंची मनोरंजन! अखेर म्हणतात ना, उंचे लोग उंची पसंद!!...

ते जाऊ द्या हो. तुम्ही ती बातमी आणि कार्यक्रमाची चित्रझलक नीट पाहिलेली दिसत नाही...
का? काय झाले?

अहो, त्या बातमीने तिकडे मंत्रालयात मोठी खळबळ माजली आहे. सगळे सनदी अधिकारी तर चक्रावूनच गेलेत...
काय म्हणता काय?... अहो, पण मनिषाताई म्हैसकरांची छायाचित्रे छापून आली म्हणून काही एवढी खळबळ माजायला नको. लोकांचे पण कसे असते ना? तिकडे दिल्लीत एवढे रामायण झाले, त्याने नाही खळबळ माजली आणि...

दिल्लीत? काय झाले काय?
तुम्हांला माहित नाही? काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राचे गणेश रामदासी माहिताहेत ना? ते हो, माहिती उपसंचालक. तर मनिषाबाईंनी त्यांची बदली केली होती. तिकडं नाशिकला...

म्हणजे लोकसत्ताच्या संजय आवटेंची झाली होती तशीच?
हो तशीच. आता अशी चर्चा आहे, की ती बदली अत्यंत 'अभिनंदनी'य व 'थोरा'-मोठ्यांनी केलेली होती. तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून चावाच काढला म्हणा ना गणेशभाईंचा! आता गणेशभाई म्हणजे षटकार क्लबचे आधारस्तंभ. तो असा तसा कसा क्लिन बोल्ड होईल? त्यांनीसुद्धा मग फिल्डिंग लावली. जोरात सामना झाला तो. जणू लोकमान्य लोकशक्ती विरोधी महाराष्ट्र टाइम्स यांच्यातील ट्वेंटी-ट्वेंटीच. अखेर हा सामना रामदासींनीच जिंकला आणि त्यांची बदली रद्द झाली. मनिषाताईंनी केलेली बदली नव्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केली. म्हणजे अशी चर्चा आहे. खरं काय ते तपासून पाहिले पाहिजे...

हो पण, सकाळमधील बातमी याहून खळबळजनक आहे. मनिषा म्हैसकर यांच्याकडचे माहिती महासंचालकपद गेले म्हणतात... तुम्ही टुडेतली चित्रझलक नाही वाचलीत? तिथे फोटो कॅप्शनमध्ये, देवेंद्र भुजबळ हे राज्याचे माहिती महासंचालक असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. विशेष म्हणजे बातमीत मात्र त्यांचे पद उपसंचालक असे दिले आहे. म्हणजे नक्कीच काही तरी मोठा घोळ असणार!
खिखिखिखि. तुम्ही पण काय राव पराचा कावळा करताय! अहो तो मुद्राराक्षसाचा विनोद आहे...

नाही हो. तसे असणे शक्य नाही. कारण की सकाळच्या मुद्रितशोधन विभागाचे जे प्रमुख आहेत ना, त्यांच्याच हस्ते भुजबळसाहेबांचा सत्कार होतानाचा तो फोटो आहे. त्याची कॅप्शन कशी चुकेल? शिवाय सगळीकडे मनिषाताईंचा उल्लेख केवळ लोकराज्यच्या संपादिका असाच आलेला आहे.
नाही नाही. सकाळमध्ये काहीही होऊ शकते. तुम्ही उगाच अर्थाचा अनर्थ करू नका. पराचा कावळा करू नका. छोटीशी चूक आहे ती.

पण मग मनिषाताई म्हणाल्या त्यात तर काही चूक नाही ना?
काय म्हणाल्या त्या?

वाचत जा हो बातम्या नीट. उगाच संपादकांसारखे करताय! त्यांना बिचा-यांना वेळ नसतो पेपर वाचायला. पण तुम्हांला काय उद्योग असतो हो?
नाही, ते मनिषाताई काय म्हणाल्या ते सांगताय ना?

त्यांनी सकाळवर टीका केली की सकाळची प्रशंसा याबद्दल मतभेद आहेत. पण त्या म्हणाल्या, की सकाळ हे ट्रेनिंग सेंटर आहे. आणि येथूनच त्यांना त्यांच्या लोकराज्यसाठी प्रशिक्षित कर्मचारी मिळाले.
असे म्हणाल्या त्या?

छापून आलेय तसे सकाळमध्येच. वाचत जा हो तुम्ही...
मनिषाताई या ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. आणि सनदी अधिकारी म्हटले, की तो बोलतो एक आणि त्याचा अर्थ असतो दुसराच. कोणत्याही मंत्र्याला विचारा हे! तेव्हा नक्कीच मनिषाताईंच्या या विधानात दोन अर्थ दडलेले असणार.

यातला पहिला अर्थ कोणता?
सकाळ हे ट्रेनिंग सेंटर आहे, याचा अर्थ येथून बाहेर पडणारे पत्रकार हे सुप्रशिक्षित असतात. चांगले असतात.

आणि दुसरा अर्थ?
सकाळमधून पत्रकार नेहमीच बाहेर पडतात! टिकत नाहीत...

टिकत नाहीत असे कसे म्हणता तुम्ही? अनेक पत्रकार दशकानुदशके आहेतच की सकाळमध्ये.
तो सकाळचा नाईलाज आहे!

च्यामारी असा अर्थ आहे काय बाईंच्या बोलण्याचा. एकूणच वर्धापनदिनाच्या कार्यक्रमापेक्षा ही कार्यक्रमाची बातमी म्हणजे हशा-टाळ्यांचा झिम्मडझिम्मा आहे! व्वा व्वा!

सकाळच्या टुडे पुरवणीला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

(Posted by चांगदेव पाटील, दि. २२ जून २००९)

जमल्यास हेही वाचा -
टुडेच्या कुशीत टुमारो आला त्या सोहळ्याचा वृत्तांत (बातमीदार)
हॅपी बर्थडेची गोष्ट (बेस्ट ऑफ भंकस)

This entry was posted on 22.6.09 at 13:29 . You can follow any responses to this entry through the comments feed .

21 comments

Anonymous  

Vah Vah Vah vah vah
Changdeva, farch sunder jamlay!!!
Bapu nahit mhnalyavar ata blogche kay honar ashi chinta vatatli, pan tumhi ajubat tyanchi uneev bhsu dili nahit.
vishesh Abhinanadan.

June 22, 2009 9:48 PM
Anonymous  

Excellent...!

June 23, 2009 3:34 PM
श्रीकांत  

वा वा !
बातमीदार छान लिहीता.

June 23, 2009 4:20 PM
Anonymous  

tya abhinadniya thoara mothayni atat CHITAN kele pahije.. aso..

June 30, 2009 4:37 PM

sakalmadhil zimmadzimma ani dillitil shatkarani jinklela saamana amhala sangitala khara pan changdeva amhala majam (mahiti jansamparka mahasachlanalaya)waril prafullit mar pakawla koni he sangal?manishataiwar bel sarla ki konalahi challele chalte yavar shradha asnaryani ki gelya daha varshat maharashtratil patrkarana mich posto ase sangun pudharyana lutnyache kase yache chintan karnaryani yacha shodh tumhi lawla tar tumhalhi adhiswikrat karnyche abhinandniya thor kam kele jayil.

June 30, 2009 9:40 PM
Anonymous  

Arun Khore'ni kantalun wicket fekali as yektoya. Khare ka?

July 1, 2009 11:19 AM
Anonymous  

Blog band padala ki kay?

July 7, 2009 1:18 PM
Anonymous  

Bloggerla atak zali ki kay? Kothech updates nahit. Naukri pan geli vatate!!

July 10, 2009 12:38 PM
Anonymous  

Ase yekto ki, ya bloggerla yeka newspaperschya mothay adhikaryane samaj dili and mhanun likhan band karnyat ale!! Khare kay te janatesamor yeu dya?

July 15, 2009 9:44 AM

कुणाच्याही दबावामुळे वा धमकावण्यांमुळे हा ब्लॉग बंद पडलेला नाही. मुळात हा ब्लॉग बंद केलेला नाही. तूर्तास त्यावर लिखाण होत नाही एवढंच. दुसरी गोष्ट म्हणजे बातमीदारवरील लेख हे कोणत्याही वाईट हेतूने लिहिलेले नसतात. त्यातील टीका निर्विष असते. टिपण्ण्या मजेशीर असतात. (असे आम्हांला आपले वाटते.) आमचा अनुभव असा आहे, की या लेखांतून आम्ही ज्यांची टोपी उडवतो, ते लोकही ती चंमतग वाचून हसतात. (चांगदेव म्हणतात, लोक आपल्याला खूपच लाईटली घेतात, हे वाईट आहे!!) तेव्हा बापू आत्रंगे, चांगदेव पाटील वा अरुंधती पुणेकर प्रभृतींचे काहीही भलेबुरे झालेले नसून, त्यांस कोणत्याही प्रकारचे धमक्यांचे फोन आलेले नाहीत, याची दखल घ्यावी ही विनंती. कळावे. लवकरच पुन्हा भेटू..

आपला नम्र,
बापू आत्रंगे

July 15, 2009 5:55 PM
Khabrilal  

bapu khare sanga ghabarlat na? nahitar khulasa ka kela tumhi?

July 16, 2009 9:02 PM
Anonymous  

etke divas zale lekhan nahi. manhaje bapu kothe tari bhangadit adkale kay?? comment la utter deta tar mag lihit ka nahi?

July 18, 2009 8:25 PM
Anonymous  

Kahi patrakarana, bahercha rasta dakhavnyat ala ahe. Karan hech ki tyanche lekhan malkanna awadle nahi. Hya newspaperschya IT department ni kon kay commet deto, kay lihito he sarva sodhun kadhale and mhanun, barechse patrakar ghabarlele ahet.

July 20, 2009 11:43 AM
श्रीकांत  

बापू बरेच दिवस आपले लिखाण वाचायला मिळाले नाही. लवकर काहीतरी चांगले लिहा.

July 21, 2009 6:49 PM
Anonymous  

bapu,,, there has not been any pressure tactic used by newspaper organisations on batmidar blog,,, is that true? but if that is the case then all journalists should raise voice against it.

a comment on your post says, if there was some arrest. even in pune media blog case, the police were not in a position to arrest the blogger. infact, police cannot arrest an individual in such cases, they can not investegate it.

however, some people are spreading rumours about you.

bloggers being made to close blogs and stop writing is not good. all should protest out.

July 31, 2009 6:09 PM
Anonymous  

blogchya atmyas shanti labho

August 8, 2009 11:09 AM
Anonymous  

Akher hahi blog namala, dahashatipudhe. Shanti deve. Amen!

August 10, 2009 5:28 PM
Anonymous  

Bapu,Shrawan sampla.Ganpti dekhil zala.aata tari liha..aata.

August 24, 2009 2:45 PM
Anonymous  

बापू, हलवल्याशिवाय उठत नाही, काय? आता उठा, लेखणीला धार काढा. विसरा मधले दिवस. लिहा.

August 26, 2009 9:52 AM
Anonymous  

Kase lihinar. Sakal la maphinama lihun dyva lagala na?

August 26, 2009 10:05 AM
Anonymous  

patrakaranchi udun kay milate?

November 8, 2009 2:15 PM

Post a Comment