ब्रूस विलिसच्या डाय हार्ड या चित्रमालिकेतील चौथा भाग कुणी पाहिलाय? त्यात बघा एक कंप्युटर हॅकर मुलगा असतो. मुलगा म्हणजे खरे तर संगणकातला बाप असतो तो. सायबरपिढीचा अस्सल प्रतिनिधी. एका प्रसंगात तो ब्रूसबाबूंसमवेत कारमधून चाललेला असतो. काररेडिओवर गाणीबिणी वाजत असतात. मध्येच ब्रूसबाबू रेडिओची कळ फिरवित म्हणतात, बातम्या ऐकू यात. बातम्या म्हटल्यावर हा मुलगा आश्चर्यचकितच होतो. म्हणतो - तुम्ही बातम्या ऐकता? काही खरं असतं का त्यात? अहो, बातम्या म्हणजे अवघा बनाव असतो, कॉर्पोरेट कंपन्यांनी तयार केलेला! (आमच्या इंग्रजीच्या ज्ञानानुसार हा संवाद दिलेला आहे. चुकभूल द्यावी-घ्यावी.)
सोमवार दिनांक आठ जून दोन हजार नऊ रोजी आम्ही लोकसत्ता व सकाळ ही वृत्तपत्रे (आम्हांस उपलब्ध झाली म्हणून) वाचली आणि आम्हांस डाय हार्ड भाग चार मधील त्या प्रसंगाचे मर्म समजले. झाले असे, की सर्वप्रथम आम्ही सवयीने लोकसत्ता वाचला. त्यात पद्मसिंह पाटील यांच्या अटकेची बातमी होती. (ती वाचून आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास किंचित बळकट झाला.) लोकसत्ताने या प्रकरणाचे विविध पैलू विविध बातम्यांद्वारे स्पष्ट केले आहेत. उदाहरणार्थ 'डॉक्टरांच्या अटकेने राष्ट्रवादी कॉंग्रेसने धरले अंथरूण!' अशा छान मथळ्याची एक बातमीही लोकसत्ताने दिली आहे. (पान ५) मुंबई डेटलाईनच्या या बातमीत राष्ट्रवादीची पिसे काढतानाच सदरहू बातमीदाराने म्हटले आहे, की 'पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने न्यायालयात हजर केले तेव्हा राष्ट्रवादीचा एकही नेता तेथे फिरकला नाही.' शरद पवार यांच्या यासंबंधातील वक्तव्यास दुजोरा देणारीच ही घटना होती. निंबाळकर खून प्रकरण ही 'वैयक्तिक घटना' आहे. त्यात राष्ट्रवादीचा काही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता वाचून झाल्यानंतर आम्ही सकाळ वाचण्यास घेतला. त्यातही पद्मसिंह पाटील अटकेच्या विविध पैलूंचा विस्कळीत समाचार घेण्यात आला होता. त्यातील आतील पानावरील (पान ४) एक चौकट वाचून मात्र आम्ही चकितच झालो! कारण की त्यात म्हटले होते - न्यायालयाच्या आवारात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रीघ लागलेली होती. लोकसत्ता म्हणते, कोणीही फिरकले नाही. आणि सकाळवाले म्हणतात, रीघ लागली होती. कोण खरे?
एकंदर बातम्या वाचता, असे लक्षात येते, की लोकसत्ताच्या सदरहू बातमीदाराने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून बातमी दिली. आपले मत वा निष्कर्ष यांना अनुरुप अशीच तथ्ये मांडायची, असा प्रकार सध्या पत्रकारितेत बोकाळलेला आहे. त्यातलाच हा प्रकार.
अशीच एक बातमी लोकसत्ता व सकाळने प्रसिद्ध केली आहे.(८ जून). बातमी आहे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाविषयीची. सकाळच्या बातमीनुसार ऑनलाइन प्रवेशासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या संकेतस्थळाची चाचणी रविवारी घेण्यात आली व ती चाचणी यशस्वी झाली. ही चाचणी कशाची होती? सकाळच्या बातमीनुसार एकाचवेळी किती विद्यार्थी वेबसाईटला भेट देऊ शकतात हे तपासण्यासाठी चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी खरेच यशस्वी ठरली का? लोकसत्ताच्या बातमीचे शीर्षक आहे - ऑनलाइनच्या रंगीत तालमीमध्ये सर्व्हरने केला घात! झाला का गोंधळ? सकाळचा बातमीदार म्हणतो - चाचणी यशस्वी. लोकसत्ता बातमीदार म्हणतो - सर्व्हरने अवसानघात केला. कोण खरे?
एकंदर बातम्या वाचता, असे लक्षात येते, की केवळ एमकेसीएलच्या अधिका-याशी बोलून सकाळने सदरहू बातमी दिली आहे. त्यामुळे बातमीस साहजिकच सरकारी पत्रकाची कळा आली. लोकसत्ताच्या बातमीदाराने मात्र या बातमीवर अधिक मेहनत घेतलेली दिसते. त्यामुळेच या चाचणीदरम्यान सर्व काही सुरळीत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. ती बाब त्याने शालेय शिक्षणमंत्र्यांच्या कानावर घातल्यावर ते म्हणाले, की ऑनलाइन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीच तर हा प्रयोग करण्यात आला.
या बातम्या वाचल्यानंतर कधीतरी वाचलेले एक इंग्रजी वाक्य उगाचच आठवले, की डोंट बिलिव्ह (पेपरातील बातम्यांसकट) एव्हरीथिंग यू रीड!!
(Posted by चांगदेव पाटील, दि. ८ जून २००९)
This entry was posted
on 9.6.09
at 00:40
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.
5 comments
Sakaal mhanje paperacha malak maratha aani tithe nirnay prakriyet varchasva baamnaanche, punha cheharaa Uttam Kamble yancha........
June 11, 2009 3:52 PM
डोंट बिलिव्ह एव्हरीथिंग यू रीड/वॉच/हियर!! हा हा हा. हीच तर शोकांतिका आहे!
June 15, 2009 2:11 PM
Rahul Gandhichya congressBhavanmadhil sabhechya batmyahi sakal aani loksatta madhye
vegvegalya hotya.
November 26, 2009 3:31 PM
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
ए-सिडिक कम्युनिकेशन्स सादर करीत आहे
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
This site is administrated by
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

