वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष आणि अन्य हो,
गेले वर्षभर आपण अधुनमधून येथे मस्त भंकस केली.
आपण म्हणण्याचे कारण म्हणजे, येथे आम्ही जे लिहित होतो, ते तुम्हां सर्वांचेच होते. ते तुमच्या मनातले होते. आम्ही फक्त ते शब्दबद्ध केले. विचार, भावना तुमच्याच होत्या, आम्ही त्यांचे फक्त शब्दांकन केले.
कुणास चिमुकचिमटे काढले, कुणाची टोपी उडविली.
कुणास शालजोडीतले दिले, तर कुणास शब्दशाल-श्रीफलही दिले.
तुम्हीही आम्हांस सोडले नाही.
आमच्यावरही तुम्ही टीका केली, कधी कवळेकौतुक केले.
एकंदर मझा आली.
या मजेमजेत आमच्याकडून कोणी दुखावले गेले असेल,
तर गड्यांनो, माफ करा!
आमचे लक्ष्य कधीही व्यक्ती हे नव्हते, हे समजून घ्या.

आता तुम्ही म्हणाल, की बापू असे निरोपाचे विडे का उचलतो आहे?
तर आता खरोखरच निरोपाची वेळ आलेली आहे.
(निरोपाचा क्षण फार वाईट असतो मित्रहो! पण कोणी, आता पीळ नका मारू, असे सांगण्यापूर्वीच कल्टी मारलेली बरी! कसें?)

तर या ब्लॉगवर पुन्हा नक्की भेटू या.
तोवर - टाटा, बायबाय, रामराम!!

आपला स्नेहांकित,
बापू आत्रंगे.

-----------------------------------------------

बापू आत्रंगे यांनी काही काळासाठी, वैयक्तिक कारणांमुळे बातमीदारची रजा घेतलेली आहे. मात्र हा ब्लॉग, तसेच सहयोगी बातमीदार व कळते-समजते हे ब्लॉग सुरुच राहणार आहेत. या तिन्ही ब्लॉग्जवरील आपले प्रेम असेच कायम असू द्या.

- ब्लॉग एडिटर, ए-सिडिक कम्युनिकेशन्स, मुंबई

This entry was posted on 30.5.09 at 12:34 . You can follow any responses to this entry through the comments feed .

11 comments

SHRI  

bapuu....
kdhi yanar tumhi???
sangun tari jaaaaaaaa....

May 30, 2009 1:25 PM
Anonymous  

bapu kay pardes vari la nighalat kay??

May 30, 2009 4:48 PM
KUMAR  

KA DHARILAA PARADES, SAJANA..

May 30, 2009 7:09 PM
Anonymous  

Bapu Gadya, Dhwaj Unch ubha dharnara hotas. Pan he niropache bare nahi keles...
- V

May 31, 2009 3:18 PM
Anonymous  

Bapu la konitari dhamaki dileli ahe or tyachya naukarivar yamule gada ali asnar.

June 1, 2009 3:50 PM
Anonymous  

Bapu,
Mediat asach hot astay,bagha.Ya kshetrat gunvatta-vidvatta ya kalagunanna kimmat naste, asa mhantat tech khara.Yabaddal kadhi koni vichar karnar ahe ka?

June 1, 2009 7:20 PM
Anonymous  

बापू, सीरियलवाल्याना जे कळत नाही ते तुम्ही वेळीच जाणलेत.
वेळीच निरोप घ्यावा हे उत्तम.
पण तुम्ही इतक्या लवकर निरोप घेऊ नका, हा केवळ ब्रेक आहे असे आम्ही समजतो...
ब्रेक के बाद भेटू ...पुन्हा नव्या दमाने... नव्या स्टॉरीज घेऊन

June 2, 2009 11:45 AM
Vachak  

Bapu,
We will miss you! Everyday I start my machine and first thing I do is access Batmidar. I am so much habitual to this. I liked your blog. It used to make me think. It used make me laugh. We used to dicuss about every post at home. It has given me a new vision to look at news I read, I watch. Thanks for everything Bapu. Hope you be back soon!

June 2, 2009 11:48 AM

bapu

tevdha 'nakki' shabda visary naka ..

June 3, 2009 4:49 PM

मित्र हो,
धन्यवाद.
आम्ही लिहित राहावे, असे आपणांस अद्याप वाटते.
तुमच्या सहनशक्तीची पण कमालच म्हणायची!
असो.

सध्या जरा वेगळ्या व्यापात आहे. ते संपताच पुन्हा आपणांस पीळ मारण्यास येणारच आहोत...

तोवर... रामराम.
आणि अगदी मनापासून त्रिवार थ्यँक्यू!!

June 5, 2009 12:26 AM
Anonymous  

Come on Bapu ...
'Picture abhi baki hai..

- Sheetyuddha Sadaanand.

July 24, 2009 3:35 AM

Post a Comment