बादशहाचे आज काहीतरी बिनसले आहे, हे चाणाक्ष बिरबलाच्या तत्काल ध्यानी आले.
त्याने चिंतेने विचारले, "खाविंद, तबियत नासाज दिसते आपली. रात्री पुरेशी निंद झाली नाही, की सकाळी उठल्यावर सामन्याचा अग्रलेख वाचलात?"
उजव्या हाताने कानशिल दाबत बादशहा म्हणाला, "बिरबल, अरे अग्रलेख परवडला... पण आमची बेगम! लाहोलविलाकुवत!!"
एवढ्या वर्षांचा अनुभव असल्याने बिरबलाच्या लगेच लक्षात आले, की राणीसाहेबांनी बादशहाकडे काही तरी हट्ट धरला आहे.
"काय झाले बेगमसाहिबांना?" त्याने पुन्हा काळजीने विचारले. बादशहा आणि साहेबांच्या कुटुंबाची नेहमी आस्थेने चौकशी करावयाची असते, हा कचेरीराज्यशास्त्राचा पाठ बिरबलाने कोळून प्यायलेला होता.
"कसे सांगू तुला?... त्या तुमच्या तंबी दुराई ऊर्फ श्रीकांत बोजेवारांना अक्षरशब्द पुरस्कार मिळाल्याच्या बातमीने पुरा घोटाळा केलाय! बेगमच्या भावालासुद्धा आता पुरस्काराचे डोहाळे लागलेत! त्यासाठी त्याला हास्यरंगचे कंत्राट द्या, म्हणून बेगम मागे लागल्यात..."
ते ऐकून बिरबल कोसळायचाच शिल्लक राहिला.
"कसे शक्य आहे? तुमच्या मेव्हण्याला थोडीतरी विनोदबुद्धी आहे का?"
बादशहा म्हणाला, "बेगम म्हणतात, है! आमचा मेव्हणा कधी कधी राजकीय-सामाजिक लेख लिहित असतो. हल्ली तर टीव्हीवर राजकीय विश्लेषक म्हणूनही बोलावतात लोक त्याला..."
"खाविंद, राज्यात राजकीय अभ्यासकांची, विश्लेषकांची मुळातच कमी आहे. त्यामुळे टीव्हीवाले लोक काय, वेळ भरून काढायला कोणालाही बोलावतात! निवडणुकांच्या वेळी तुम्ही ते पाहिलेच असेल. शिवाय मेव्हणेसाहेबांचा तर वशिलाही दांडगा आहे!... ते जाऊ द्यात. मुळात मेव्हणेसाहेबांचा आणि विनोदाचा संबंधच काय?" बिरबलाने पृच्छा केली.
"तेच तर म्हणतोय आम्ही. पण बेगमकडे गुप्तचरांचे अहवाल आहेत! त्यानुसार त्यांच्या भावाचे लेख वाचताना, त्यांचे टीव्हीवरील बोलणे ऐकताना लोक मनोमनी खदाखदा हसत असतात! म्हणजे ते केवढे विनोदी असणार बघा!" बादशहा म्हणाला.
"खाविंद, अहो, ते विनोदी वेगळे आणि हास्यरंगमधले विनोदी लेखन वेगळे!" बिरबलाला आता स्वतःचे मस्तक स्वतःच्या हातांनी फोडावे असे वाटू लागले होते.
"बिरबल, अरे आम्ही मालक असलो म्हणून काय झाले? आम्हांला पत्रकारितेतले थोडेफार तरी कळत असेलच की नाही? पण बेगम म्हणतात, की विनोदी लिहिणे म्हणजे काही फार मुश्किल काम नाही."
"जहापन्हां, हा तंबी दुराईंवर अन्याय होतोय!"
"अंहं. बेगम म्हणतात, तंबी दुराई असा कोणता तीर मारतात? आपण त्याला बिरबल-बादशहाच्या गोष्टींचे कॉपीराईट दिले. म्हणून तर तो विनोदी लेखक झाला. बेगम म्हणतात, आपण आता ते कॉपीराईट तिच्या बंधुला द्यायचे. म्हणजे झाले!!"
"खाविंद, अहो, विनोदी लिहायचे म्हणजे त्याच्यामागे मोठी तपश्चर्या असते. अतिशय गंभीर अभ्यास असतो. भाषेवर हुकूमत असावी लागते. विसंगती टिपायची निर्विष नजर असावी लागते. तंबी दुराई इतकी वर्षे विनोदी लिहिताहेत... हे काही ये-यागबाळ्याचे काम नाही! तसे मराठीत अनेक विनोदी अखबारनवीस आहेत... ब्लॉगमध्ये बापू आत्रंगेसारखे लोक आहेत... नाही असे नाही! पण खरे सांगू? त्यांचे पीजे वाचताना धाय मोकलून रडावेसे वाटते हो!... सगळ्यांनाच ब्रिटिश नंदी किंवा तंबी दुराई नाही होता येत खाविंद!!"
"अरे मग आता यावर उपाय काय? राणीसाहेबांची समजूत कशी काढायची? त्या तर हट्टालाच पेटल्यात." बादशहा दुखरी कानशिले दाबत म्हणाला.
"खाविंद, आहे... यावर उपाय आहे. तुम्ही बेगमसाहिबांना सांगा... म्हणावे, मेव्हणेसाहेबांसारख्या चतुरस्त्र प्रज्ञावंताने हास्यरंगसारख्या पुरवणीत अडकून पडावे हे काही खरे नाही! त्यापेक्षा त्यांना एखाद्या अखबाराच्या एखाद्या आवृत्तीचे संपादक करा! हल्ली अशा विनोदी संपादकांची मोठी लाट आहे. त्यात ही आणखी एक भर पडेल एवढेच."
"व्वा व्वा, बिरबल. काय अक्सीर इजाल सांगितलास! तुझ्या बुद्धीची आणि निरिक्षणशक्तीची कमाल आहे! या उपायाने सापही मरेल आणि लाठीही तुटणार नाही! व्वा!" असे म्हणत बादशहाने अतिप्रसन्न होऊन बिरबलास आपल्या हातातील अखबार दिला.
त्या अखबाराचे नाव काही आम्हांस समजले नाही.
त्यामुळे आमची मात्र वेगळीच पंचाईत झालीय.
हल्ली पेपर वाचताना आम्हांस पदोपदी बादशहाच्या मेव्हण्याची आठवण येते आणि अभावितपणे आमची नजर प्रेसलाईनकडे वळते!!
(Posted by बापू आत्रंगे, दि. २३ मे २००९)
12 comments
Ekmekanchi jahiratbaji...Bojewaranchi Bhakri aani Tokekaranchi Bhaji...
मित्रहो, विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण शंभर टक्के सांगतो की बापू अत्रंगे म्हणजे प्रवीण टोकेकर नाही. कारण जी ताजी पोस्ट आली आहे, ती त्यांची असूच शकत नाही, असे आमच्या गुप्त बातमीदाराकडून कळाले आहे. त्यामुळे बापू म्हणजे टोकेकर समजून प्रतिक्रिया देण्याचे टाळावे. बापू म्हणजे कोणी तरी तिसऱया आघाडीतील (म्हणजे फळीतील) पत्रकार असावा, असे आमचे मत आहे. ज्या आथीर् बापू कोणत्याही पेपराची टोपी उडवि्ता त्या अथीर् तो कोणत्याही पेपरात प्रत्यक्ष काम करीत नसावा. अन्यथा आजच्या युगात बापूची अवस्था काय झाली असती...... हे प्रत्यक्ष काम करणाऱया पत्रकारांना सागण्याची गरज नाही.
खबरीलाल
अरे हा कोण नवीन खबरीलाल उपटला. बातम्या ढापता ढापता बाईलाईनीही ढापायला लागला की काय हा ? (बाईलाईनच उगीच माझ्या भाषेचा किस काढू नका)
खरा खबरीलाल
आता पुन्हा प्रश्न आला - बापू कोण?
ये बापू बापू कौन है... ये बापू बापू...
तो प्रवीण टोकेकरच असावा असे वाटते...
तंबी दुराई यांचे लेख मला खूप आवडतात. तंबी दुराई म्हणजेच श्रीकांत बोजेवार हे आज समजले. बोजेवार यांना मला फक्त थ्यॅंक्यू म्हणायचे आहे.
बापू तुम्ही त्यांच्या लिखाणाबद्दल एवढे चांगले लिहिले आहे, हेही मला आवडले. हल्ली कोणी कोणाबद्दल चांगले म्हणते आहे, हे दृश्यही दुर्मिळच आहे.
अरे बाबानो खरेच सांगतो, बापू म्हणजे टोकेकर नाही. कारण ते असते तर तंबी दुराईवर एवढा चांगला लेख लिहिलाच नसता. थाळी बाजवून कोणी साप घरात घेते का? यावरून सांगतो. ते टोकेकर नाहीत. बापू दुसराच कोणी तरी आहे. पहिल्या खबरीलाल ने ते शोधून काढावे व मगच खबरीलाल नाव वापरावे. तोपयर्ंत मीच खबरीलाल.
नंबर दोन,
बापू कोण आहे ते महत्त्वाचे आहे की, त्यांनी लिहिलेल्या गमतीजमती वाचणे महत्त्वाचे आहे, हे ठरवा. आणि तुम्ही खबरीलाल झालात म्हणून वाईट वाटणार नाही. नाहीतरी बातम्या चोरता चोरता नावे चोरण्याची फॅशन आहेच की! उदा. एका ख्यातनाम पत्रकाराच्या नावाचा दुसरा बोलघेवडा आणि तोंडाळ पत्रकार आधी ख्यातनाम पत्रकार तोच, अशी टिमकी वाजवत होता. पण नंतर त्याचे बिंग मित्रांनीच फोडले, आता तो एका फुटकळ च्यानेलात आहे. म्हणूनच प. पू. शेक्सपिअरने म्हटलेच आहे की, नावात काय आहे. काम महत्त्वाचे.
Bare Tya khyatnam patrakarache nav kay ? Tondal patrakaracha vishay rahu de..
doghachehi nav sarkhech ahe nahi ka ? mag ekache naav sangitale ki dusre naav apsukach kalel.
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

