आता निस्तं समजायचं बरंका मंडळी...
निस्तं समजायचं, का ह्यो एक रंगमंचहे. ह्या रंगमंचावर नेपथ्या म्हनून एक परदा सोडलेलाहे. त्या परद्यावर यमुनेचं चित्र काडलेलंहे. यमुना म्हंजे रात्र काळी, घागर काळी यमुनाजळी काळी वो मायमधली यमुना! आधीच स्पष्ट केलेलं बरं. नाय तं तुमचा गैरसंबंध व्हायचा! त्या यमुनेच्या काठावर एक वडाचा डेरेदार वृक्शहे. रंगमंचाच्या मोहरं पब्लिक म्हंजी मायबाप प्रेक्शकजन बसलेलंहे.
पन मंडळी ह्यो इव्हेंट हाय तरी काय?
तं तुम्हाला आता लई ताटकळत ठेवत नाय. सांगूनच सोडतो, का इथं आता गनगौळन व्हनार हाय. ते बगा 'घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निगाल्या पान्या गौळनी' या गवळनगीताचं बॅकग्राऊंड मुझिकबी सुरु झालं.
(सारेगमप लिटिल च्यांपमधी हे गीत कोनी गायलं व्हतं? पल्लवी जोशीनं की कार्तिकी गायकवाडनं? या प्रश्नाचं बरोबर उत्तर देना-या पयल्या दहा पत्रकारांना, मुंबईत पुढारी नेमका कव्हा लॉंच व्हनार याची तारीख पोस्टाने कळविन्यात येईल. तव्हा पाचपाचपाच चारपाचपाच या क्रमांकावर लगेच यसेमेस करा.)
ते बगा, आला... आला... (पुढारी नव्हं!) रंगमंचावर गवळनींचा जथा आला...
पेंद्या - स्टॉप. कोणीही यापुढं जायचं नाही... खबरदार! जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या...
मावशी - येss, चिंधड्या कोणास म्हणतो रे फुल्याफुल्याफुल्या?
पेंद्या - छट्, वाक्य पण पूर्ण करु देत नाहीत!... डायरेक्टर, आपण गणगौळण सादर करतोय की 'आजचा सवाल'? च्यामारी, सगळेच आजकाल अर्णब गोस्वामी झालेत!!
मावशी - अगंss बाई! वाक्य अर्धवटच राह्यलं का तुमचं? बोला बोला...
पेंद्या - आता बोलाबिला काही नाही! आधी मला सांगा तुम्ही कुठं चाललात?
गौळण - मावशे, कोण गं हा ऑम्बुडस्मन?
पेंद्या - मी कोण? मी कोण? माहित नाही तुला?
गौळण - सगळं माहित असायला, मी काय त्रिकालवेधी आहे? तेवढा दृष्टिकोन नाही माझ्याकडे!!
मावशी - अगं पेंद्या आहे तो! त्याच्या नाववरचा पीआरबीचा स्टार तरी लक्षात घ्यायचास! हा स्टार लागला की माणसाला वाटतं, आपण किती विद्वान, आपण किती प्रसिद्ध! पण हल्ली ना, केवळ पत्रिकेत स्टार असतील ना, तर कोणालाही हा स्टार मिळतो.... म्हणजे, असं पुण्यात म्हणतात!
गौळण - ओह आय सी!
पेंद्या - पटली ना ओळख? मग आता मला सांगा, कुठं निघालात तुम्ही?
मावशी - हा पेंद्या म्हणजे गेल्या जन्मी नक्की उपसंपादक असला पाहिजे! त्यांना रोजरोज तीच ती पानं लावून कंटाळा येत नाही. आणि याला रोजरोज तोच तो सवाल विचारून बोअर होत नाही! अरे, आम्ही मथुरेच्या बाजाराला निघालो आहोत...
पेंद्या - बाजाराला? ते कशासाठी?
गौळण - प्रेस कॉन्फरन्स आहे कॉकटेल-डिनरवाली! येतोस? अरे, प्रॉडक्ट विकायला चाललोय आम्ही.
पेंद्या - मग अजिबात जाऊ नका. बाजार आधीच सॅच्युरेट झालाय. आता तिथं स्कोप नाही.
मावशी - कोण म्हणतो स्कोप नाही? मार्केटिंग पक्कं असलं ना, तर कुठंही दर्डावून सेल करता येतो. हे इकॉनॉमिक्स जरा पुढार-लेलं आहे. तुला समजायचं नाही!
पेंद्या - मग तू समजावून सांग.
मावशी - तसं काही फार अवघड नाही ते. आता हे बघ. हे काय आहे? निरसं दूध. क्वालिटीदार. पण त्याची किंमत जास्त. प्रॉडक्शन व्हॅल्यू जास्त. आपण ते विकायचंच नाही. आपण दूध घ्यायचं. त्यात जरा पाणी घालायचं. थोडा युरिया घालायचा. किंचित साखर घालायची. क्वांटिटी वाढवायची. तिकडं कोल्हापुरात तर दुधात तिखट मसालासुद्धा घालतात! आणि असं दूध सुरवातीला स्वस्तात विकायचं. रुपयाला एक शेर! लोकांचं काय आहे, लोकं नुसती दुधाची पिशवी बघतात! ती झॅकपॅक असली म्हणजे झालं!... आणि महत्त्वाचं म्हणजे, बाजारात दुस-या डेरीचं दूध सहसा येवूच द्यायचं नाही. किरकोळ विक्रेत्यांना लोणी लावलं, की तेही जमून जातं... पुढं पुढं लोकांनाही मग अशाच दुधाची सवय लागते! मग त्यांना सकाळ-चं रतीबाचं दूध नको होतं!
गौळण - मावशे, अगं त्याला असं सांगून समजायचं नाही. त्यापेक्षा पेंद्या, तूच चल ना आमच्याबरोबर बाजाराला. समक्षच सगळं बघता येईल तुला...
मावशी - खरंच की! चल की. आपण वन डे वुईथ मावशी करू या!
(वन डे वुईथ मावशी करायचं आसंल, तं त्या पॅकेजची किंमत किती व्हईल? या प्रश्नाचं बरोबर उत्तर देना-या पयल्या दहा टीव्ही पत्रकारांना, एका पेडन्यूजच्या पैशांचा चेक घरपोच पाठविला जाईल. तव्हा आपापल्या मार्केटिंग खात्याला लगेच यसेमेस करा. नंबर तं सगळ्यांनाच माहित हाये!!)
पेंद्या - मावशे, तू तर गोरस विक्रीचा धंदाच करायला लागलीस?
गौळण - येss, धंदा म्हणायचं काम नाही! हा धंदा असला, तरी त्याला व्यवसाय म्हणायचं!
मावशी - पाणीदार दूध असलं, तरी त्याला प्रॉडक्ट म्हणायचं!
गौळण - आणि एकदा प्रॉडक्ट म्हटलं, की सगळं माफ असतं. ते विकलं जातं की नाही, एवढंच महत्त्वाचं असतं!
पेंद्या - हे काही खरं नाही! काही खरं नाही! आपल्याला काही हे जमणार नाही! आपल्याला काही हे पटत नाही!
मावशी - पेंद्या, तुला एक सल्ला देऊ?... बाळा, असं काही चुकूनही रडू नकोस. असं रडणाराचं काय होतं माहित आहे का?
पेंद्या - काय होतं?
मावशी - तो आजी असेल, तर माजी होतो. नाही तर...
पेंद्या - नाही तर?
मावशी - नाही तर काय य माजी होतो!!
(Posted by बापू आत्रंगे, दि. ४ मे २००९)
22 comments
great piece!
well done..
patrakaritela kay divas aalet?
jiv tutato,pan sangnar konala?
kahi divasanpoorvi punemedia blog var (jo sadhya band aahe) sakaal madhe kasha "bogus" appointments karanyaat aalya aahet yaachi mahiti denyaat aali hoti. malkaransarkahyaa sadhya-saraL vyaktila hhe lok kahich karu denar nahit hhe nishchit
malkar aani "nirbhay" samooh sampadakacnhe ajibaat jamat navhate ase samajate. 1 may roji
pg1 var lihilela lekh jar koni vaachla (aani tyaateel akadevaari tapasali) tar malkar tithe ka tikoo shakat nahit yaachi kalpana nakkeech ye'eel. "sumaaraanchi saddee..."
खरं आहे बापू... आमच्या इचलकरंजीला (हे गांव कोल्हापूर जिल्ह्यात आहे) फक्त S.T. Stand वर लोकसत्ता, म.टा., Times इ. मिळतात, बाकी पेपर विक्रेत्यांच्या स्टॉल वर यातला एकही पेपर मिळत नाही.
पीआरबीनुसार (बे)जबाबदार असलेल्या अनेकांची हीच परिस्थिती आहे.
बापू, आम्ही तर ऐकलंय की हल्ली दूध फुकटात पण विकतायत. खरेतर पाणी अमूल्यच आहे. पण त्यात पांढरा रंग टाकल्याने दूध म्हणतोय, हेच खरे.
"च्यामारी, सगळेच आजकाल अर्णब गोस्वामी झालेत"!!
Lai bhari...
पण बापू,
असं पाणीदार दुध पुण्यात नाय चाललं, लोकं आजबी सकाळ-चं रतीबांचंच दुध घेत्यात.
I think, he asech chalu rahile tar sakal budayala vel lagnar nahi. Sakalmadhe murkhache sammelan bharlele ahe. Khire, Agase, Kulkarni, etc sarakhi mandali todi bajula kadhali tarcha sakalchi pragati ahe nahitar hee mandali pawarsahebana gotyat antil.
Samajik samrasta manchacha prayog chalalay sakaalmadhya. Bhajapa mhana have tar. Nirnay ghyayla Agashe,Kulkarni, Khire aani chehra dakhvayla Uttam Kamble, Khore, Bhosle......
hihihihihihihihihihihihihih,hahahahahahahahahahahah,khukhukhukhukhukhukhukhu!!!!!!!!!!!!!!!!
स काळ मधे ए खा ड्याला प्रमोट करायचे असेल तर खालील पद्दात वापरतात.
१) एक रुपयाचे नाणे घेऊन ते उडावतात आणि छापा काटा बघून निर्णय घेतात.
२) मालका नि नेमलेलय कारकुना ना (डाइरेक्टर) कर्मचारी किती SMS क रता त यावर तो व्यक्ती किती performing आहे, हे ठरविल्या जाते.
३) रोज कमीतकमी एकदातरी वरील व्यक्तीच्या कॅबिन मधे मुज़रा करायला गेले तर फायदा होतो.
४) कधी कधी मालक जे सांगतील ते करावे लागते , कांबळे , पा ध्ये यांच्या नेमणूका ह्या सर्व प्रयोग ज़यालयावा केले ले असावेत.
कोण कोणास (कधी) काय म्हणाले...!
१. सोवियत रशियाच्या विघटनानंतर जागतिक व्यवस्थेत झालेल्या आमुलाग्र बदलामुळे भारतावरही गंभीर परिणाम होऊन छोटे छोटे राजकीय पक्ष अस्तित्वात आले...
उत्तर- ति. रा. रा. कुमार केतकर 'लोकरंग'मधील संपादकीयात (ज्याला इतर ठिकाणी कव्हर स्टोरी म्हणतात.)
कधी- भारतातील सार्वजनिक निवडणुकांचे संभाव्य निकाल.
२. दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील मराठी बांधवांसाठी गेल्या सत्तर वर्षांत सातत्याने लढलो. शेतकऱयांचे प्रश्न असोत, किंवा कामगारांचा लढा असो, आम्ही एक भूमिका घेऊन, एक विचार घेऊन उभे राहिलो आहोत.
उत्तर- 'पुढारी'कार बाळासाहेब जाधव.
कधी- 'पुढारी'च्या मुंबई आवृत्तीच्या लॉंचिंगनिमित्त मंदीच्या काळात कार्पोरेट विश्वासमोरील आव्हाने, या विषयावर कार्पोरेट ऑफिसेससाठी आयोजित कार्यक्रमात.
३. फॉरेनमधील मराठी यंग जनरेशन ज्या सुपरफास्ट स्पीडने एकेक पीक कॅप्चर करते आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
उत्तर- 'महाराष्ट्र टाईम्स'चे कोणत्याही विषयातले तीन डॉटने समाप्त होणारे किंवा सुरुवात होणारे विचार.
कधी- कोणताही. कॅच देम यंग असो किंवा नंदुरबारमधील कुपोषण असो.
४. हा विषय प्लॅनिंगमध्ये नव्हता. अंकात जागा नाहीय. उद्या पाहू...
उत्तर- 'सकाळ'च्या कोणत्याही कार्यालयातील उपसंपादक.
कधी- जगात अचानक घडलेली कोणतीही अत्यंत महत्वाची घटना (ज्या घटनेला जगात सर्वत्र बातमी म्हणतात, फक्त तिथे प्लॅनिंगबाहेरील कंटेन्ट म्हणतात...)
५. जसा निरोप असेल, तसं लावून घ्या. वाटल्यास अग्रलेख बाजूला ठेवा. वरून मेसेज असेल, तर आपली बातमी कापा, पण मेसेजच्या फाईलला हात लावू नका. तश्शी वापरून घ्या.
उत्तर- लोकमतचे कोणतेही सन्माननिय संपादक.
कधी- दर्डावून आदेश आला की तत्काळ...
६. 'ज्ञानप्रकाश'चे संदर्भ साहित्य चाळताना, हे जरूर लक्षात घेतले पाहिजे, की त्या काळी अस्तित्वात असलेली माध्यमाची सर्व ती ताकद वापरून 'ज्ञानप्रकाश'ने लोकांचे यथार्थ रंजन आणि लोकांना ज्ञान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला आहे.
उत्तर- संदर्भ देण्याची जागरूकता दाखविणारे अरूण टिकेकर.
कधी-कोणत्याही लेखांत
In todays'Sakal, Pune, the bottom written by by line of somebody manageh regarding Ravindrnath tagore, there is a blunder related to Vande Mataram.
He inetend to say that Vande mataram is written by Ravindranath.
Vande matram is not written by Ravindranath.
Please read the said article and comment.
jan gan man is writen by ravindrnath... vande matarm is writen by bankimchndra chtargi... ha ha ha aso.. ha lekh kothun hi dhaplela nahi manun chukale asel
bapu, gangaulan zali aata pudhcha tamasha kadhi, an vaghnatya kadhi haonar.... chala lavakar..
bapu, gangaulan zali aata pudhcha tamasha kadhi, an vaghnatya kadhi haonar.... chala lavakar..
बापू, रविवारच्या लोकमतने गंमतच केली आहे. त्यांच्या लीडच्या बातमीला हेडिंगच नाही. विशेष म्हणजे सर्वाधिक खपाचा पेपर असल्याची टिमकी शेजारीच वाजवली आहे.
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
-
►
January
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

