विद्या-अर्थीमित्र हो,
आज आपण येथे संगणकावरील माहितीच्या महाजालाची उपयुक्तता व गुगलपूर्व व गुगलोत्तर कालखंड या विषयीची माहिती घेणार आहोत.
इसवीसनाच्या विसाव्या शतकातील गुगलपूर्व कालखंडात मराठी पत्रसृष्टीतील अनेक अत्यंत थोरथोर माणसे (उदाहरणार्थ ज्येष्ठ पत्रकार व माजी संपादक, महाराष्ट्र टाइम्स गोविंदराव तळवलकर, माजी संपादक, सांज लोकसत्ता व परिक्रमाकार लता राजे मॅडम, माननीय ज्येष्ठ पत्रकार विजयराव साळुंखे इत्यादी व वगैरे) परदेशातील घटना-घडामोडींबद्दल लिहित असत. गुगलपूर्व काळात असे लिहिणे सोपे नव्हते! त्यात तुडुंब बौद्धिक व दैहिक कष्ट होते. (एशियाटिक मध्ये जा, ब्रिटिश काऊन्सिलात जा... वाचत बसा, नोट्स काढा.... केवढा तो कुटाणा!)
आज मात्र संगणकावरील माहितीच्या महाजालामुळे ते कित्तीकित्ती सोपे झाले आहे. इतके की आजकाल कोणीही, म्हणजे गेलाबाजार सकाळचे कन्वर्जन्सबळी रवी आमले हेसुद्धा कचेरीत बसून विश्ववेध वगैरे घेऊ शकतात. यात अतिशयोक्ती वाटत असेल, तर प्रहारचे अमर्त्यसेन रा. रा. राहुल बोरगावकर अथवा लोकसत्तेचे मिनीकेतकर रा. रा. संजय आवटे यांना विचारा! (तेही असाच विश्ववेध घेतात!)
तर मुद्दा असा, की इतिहासातील गुगलपूर्व कालखंडात एकंदरच परदेशी घडामोडींबद्दल लिहिणे किती तरी अवघड व कठिण होते. आता मात्र तसे काही राहिलेले नाही.
आता महाराष्ट्र बॅंकेत बचत खाते असले-नसले तरी काही बिघडत नाही, तुम्ही खुश्शाल स्विस बॅंकेवर लिहू शकता! लिहू शकता म्हणजे काय? लिहिलेच आहे आमच्या अरविंद व्यं. गोखले (द्वारा लोकसत्ता, पुणे) यांनी. गेल्याच्या गेल्या रविवारच्या (१२ एप्रिल) लोकरंगात त्यांचा स्विस बॅंकेची 'भाकड'कथा हा अत्यंत माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण व विद्वत्तापूर्ण लेख प्रसिद्ध झाला आहे. (गोखलेसरांचे बॅंकेत - स्विस नव्हे, पुण्यातल्या - खाते आहे याची कृपया नोंद घ्यावी. गैरसमज नको!)
तर वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्य हो, संगणकावरील माहितीच्या महाजालाच्या आधारे आपण परदेशी घटना-घडामोडींवर छानसुंदर लेख लिहू शकतो, हे आपण येथवर पाहिले. तेव्हा पाठ्यपुस्तकबाह्य उपक्रम म्हणून आपण या उन्हाळ्याच्या सुटीत असा एखादा लेख पाडावा.
तथापि तत्पूर्वी आपणांस गोखलेकृत भाषांतरमालाही अभ्यासावी लागणार आहे. त्याकरीता आपण स्विस बॅंकेची भाकडकथा हा लेख आणि हाऊ स्टफ वर्क्स या संकेतस्थळावरील एक लेख यांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत.
अभ्यासाच्या सोयीकरीता प्रथम आपण हाऊ स्टफ वर्क्स या संकेतस्थळावरील लेखातील काही इंग्रेजी वाक्ये घेऊ. तुम्ही मनातल्या मनात त्यांचे ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मर्राठी करा. ते झाले की लगेच स्विस बॅंकेची भाकडकथा या लेखातील वाक्यांशी ते ताडून पाहा. त्यायोगे आपणांस आपले भाषांतर योग्य की चुकीचे ते समजेल. तर आपण आता आपल्या भाषांतर कार्यशाळेस सुरुवात करू या. -
---------------------------------------------------------------------
हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्ये -
Swiss bank accounts aren't just for millionaires, criminals or government officials trying to hide ill-gotten wealth, or celebrities protecting their assets from former spouses. They're available to anyone and lots of average people have Swiss bank accounts.
गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -
स्विस बँकेत पैसे ठेवणारे केवळ कोटय़धीश, अब्जाधीश असतात असे नाही, तर बऱ्याचदा ते अब्ज-अब्जाधीश असतात. यात गुन्हेगार, अनेक देशांतले राजकारणी आणि ‘सेलिब्रेटिज’ही असतात. त्यात असंख्य अभिनेते, चित्रपट अभिनेत्री आदींचा समावेश असतो. हॉलिवूडमधल्या अनेक नट-नटय़ांचे पैसे या बँकांमध्ये आहेत. त्यामागे हेतू असा सांगण्यात येतो की, उद्या जर जोडीदाराबरोबर जमले नाही आणि घटस्फोट घ्यायची वेळ आली तर आपले सर्वच पैसे त्याच्याबरोबर वा तिच्याबरोबर जाऊ नयेत, यासाठी त्यांनी घेतलेली ती खबरदारी असते.
हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्य -
People who live in countries with unstable governments and banks in particular often turn to Swiss banks because of their security and privacy.
गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -
ज्या देशांमध्ये नेहमीच अस्थिर सरकारे आहेत, अशा देशांचे राजकारणी तसेच श्रीमंत उद्योगपती यांनीही आपली अमाप संपत्ती स्विस बँकांमध्ये ठेवल्याचे सांगितले जाते.
हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्ये -
Walk into the wrong Swiss bank and you'll be quickly escorted out and pointed in the direction of the bank you "should" be entering. What just happened? You've just walked into a "private" bank rather than a "retail" bank.
गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -
तुम्ही कोणत्याही स्विस बॅंकेत प्रवेश केलात आणि ती जर तुमची बँक नसेल, तर तुम्हाला अतिशय सौम्य शब्दांत समजावून देऊन बाहेर काढले जाते आणि तुमची योग्य बँक तुमच्या निदर्शनास आणून देण्यात येते. ‘रिटेल’ बँकेऐवजी तुम्ही खासगी बँकेत शिरल्याचा तो परिणाम असतो.
हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्ये -
Private banking refers to services provided by banks to private individuals with exceptionally large assets to work with. It's called "private" because customers receive a much more personal level of service than in mass-market retail banking. This historically exclusive service has been reserved for those with liquid assets over $1 million, although accepted deposits as low as $50,000 are not unheard of these days.
गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -
दुसऱ्या प्रकारात तुम्हाला जरा खास वागणूक देण्यात येते. तर आधीच्या प्रकारात तुमच्याकडे फुटकळ ग्राहक म्हणूनच पाहिले जाते. थोडक्यात- खासगी बँकेत तुम्हाला खास दर्जाची वागणूक दिली जाते. तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमची पाश्र्वभूमी कोणती आहे, असे प्रश्न तिथे विचारले जात नाहीत. दहा लाख डॉलरपेक्षा अधिक रक्कम ठेवणाऱ्यांना त्याहून चांगली- म्हणजे अतिखास वागणूक दिली जाते. एखादा ५० हजार डॉलर खासगी स्विस बँकेत ठेवायला गेलाय, असे सहसा होत नाही. ‘रिटेल’ बँकेत मात्र हा ‘बाजार’ चालतो. ही पारंपरिक बँकिंग पद्धती तिथे आजही आहे. तिथेही किमान दहा हजार डॉलरपासून पुढच्याच रकमा घेतल्या जातात.
हाऊ स्टफ वर्क्समधील लेखातील इंग्रेजी वाक्ये -
Swiss law forbids bankers to disclose the existence of your account or any other information about it without your consent . in Switzerland, if a banker divulges information about a bank account without permission, immediate prosecution is begun by the Swiss public attorney. Bankers face up to six months in prison and a fine of up to 50,000 Swiss francs. The only exceptions to the Swiss banking privacy rule are criminal activities such as drug trafficking, insider trading or organized crime,
गोखलेकृत मराठी भाषांतर व वाक्यविस्तार -
‘स्विस बँक व्हेराईन’ (Schweizerischer Bankverein ) म्हणजेच स्विस बँक कॉर्पोरेशन ही अनेक बँकांची संघटना तुमच्या पैशाची व्यवस्थित काळजी घेते. या बँका तुमचा पैसा व तुमचे खाते क्रमांक गुप्त ठेवायला बांधील असतात. स्विस कायद्यानुसार या बँकांना ही गुप्तता सर्वाधिक महत्त्वाची वाटते. तुमच्या परवानगीशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याने तुमच्या बँक खात्याविषयी कुणाला माहिती पुरवलीच, तर त्याला स्विस कायद्यान्वये अनेक महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हा पैसा गंभीर गुन्ह्य़ांतला, मादक पदार्थाच्या व्यापारातला किंवा शस्त्रास्त्रांच्या विक्रीतून मिळवल्याचे सिद्ध झाल्यास अशी माहिती या कायद्याला अपवाद ठरते.
------------------------------------------------------------------
तर वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्य हो, आपण गोखलेकृत भाषांतरमालेचा अभ्यास येथे केला. या लेखावरून आपणांस ट्रान्स्लेट इन्टू गुड्ड मर्राठीचे महत्त्व निश्चितच लक्षात आले असेल. तेव्हा व्हा तय्यार, लिहा लेख आणि द्या झाले लोकसत्तेकडे पाठवून. कुणाला कळतेय कुठून ट्रान्स्लेट केलेय ते! कसें? (उगा रा. रा. प्रशांत दीक्षितांप्रमाणे तळटीपेत संदर्भ वा स्त्रोत देण्याची काय गरज व आवश्यकता आहे?)
(Posted by बापू आत्रंगे, दि. १७ एप्रिल २००९)
(हाऊ स्टफ वर्क्समधील लेखाची लिंक आमच्याकडे पाठविणा-या पत्रकाराचे आभार. त्यांच्या विनंतीवरून त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.)
19 comments
jhakas!!! fakt google chya aivaji wikipedia cha vapar bahutansh maharshtra times aani loksattatil buddhivant kartat, yachi nond ghyavi.
dusare mhanje ra. ra. gokhale aani ra. ra. hemant desai yanchya pramanech eengarjee vartaman patranmadhe hee ase anek namune aahet je, marathi batmyanvarun eengarjee bhasahantare karun swatahala maharshtratil maha vishleshak mhanvtat. tyanchyavar lihayche aslays ra. ra. praful marpakvar, ra. ra. prakash joshi, ra. ra. dharmendra jore, ra. ra. shubhani khapre aani ase mahit aslele naslele itke ra. ra. sapdtil ki agadich ararara vatavayas lagel..kadhi tari ya engrajee chutiyanvar hee liha. pan ekandar ha jo kay prakar aapan suru kelay to kharach jhakas suru aahe dhanyvad..!!!
Now it is easy to understand from where it is copies. These writers and journalists must have earlier wcopying the material from other sources.
I was always surprised how the reportes are so taleneted, but I came to know the reality while working one media company.
This breed is very self centered and don't know anything. If we study the conetent of marathi newspapers like sakal, loksatta, and other local newspapers, all the editors and publisheres will be sued.
Idiots.
Regards,
सकाळपेक्षा गोखलेंचं भाषांतर कितीतरी बरं ओ...
http://beta.esakal.com/2009/04/22090845/Homeswiss-bank-issue.html
excellent!
chor pakda gaya!
ketkarahi ashich chori kartat pan fakta te google varun ghet nahit, motthya english granthantun chortat evdhech. tehi pakdun devu lavkarach...
shodh uttamach bapu,
aata loksatta naahi bhashantar satta zala, ketkaranchi kshma magun.....Vinayak Mete punha paratle, loksattala hallyanchi savay hotey. Aapla hallahi te samarth hatanni jheltil. mag kadhi kali visratil,lok visrtat tase loksattahi visrte kalantarane.
lihit ja....vachat rahut.
खरं म्हणजे हे काही बरोबर नाही. माहितीचे सोर्स सगळ्याचे सारखेच असतात. पुस्तकं,नेट इत्यादी... पण त्या माहितीचा तुम्ही अर्थ कसा लावता याला महत्त्व आहे. तिथे तुमची बुध्दिमत्ता पणाला लागते. तिथे तळवलकर तळवलकर ठरतात. केतकर हे केतकर ठरतात आणि गोखले हे गोखले ठरतात.
एक संस्कृत श्लोक आहे.
"काक: काक: पिक: पिक:, को भेद पिक काकयो:?'
कावळाही काळा कोकिळही काळी तर मग दोघांमध्ये फरक तो काय?
याचं उत्तर सुभाषितकारच देतो
"वसंतसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक:'
वसंत ऋतु येतो तेव्हा कावळा कोण आणि कोकिळ कोण याचं उत्तर द्यावं लागत नाही.
सिनियर लोकच असं करत सतील तर जयुनियर लोकांकडून काय अपेक्षा ठेवायच्या?
मुळात ही सगळी सिनियर मंडळी इतकी स्वत:मध्येच गुंग आहेत की ते ज्युनियर लोकांचं पर्यायानं पुढच्या पिढीचं ग्रुमिंग वगैरे विचारच करू शकत नाहीत. द
देव त्यांचं भलं करो. दुसरं काय?
श्रीलंकेतील संघर्षावर लिहिताना, इंग्रजीतील No Fire Zone चे तीन तीनदा नो फ्री झोन असा उल्लेख करणाऱया लोकमतपेक्षा हे बरेच म्हणायचे. पहा http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=Editorial-16-1-22-04-2009-591fd&ndate=2009-04-22&editionname=editorial
This is the correct link
http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=Editorial-16-2-22-04-2009-4ad9f&ndate=2009-04-22&editionname=editorial
हे ग्रुमिंग ब्रिमिंग काय प्रकरण आहे? ते म्हणजे काय पाळणाघरासारखं काही आहे काय? म्हणजे सिनियर मंडळींनी काय पाळणाघर वगैरे चालवायचीत काय?
हे सगळीकडंच हाय की! आता सकाळच्या सप्तरंगात नव्हं का त्या न्यू सायंटीष्ट आन् सायंटीफीक अमेरिकनची भाषांतरे यतात!
बापू, बरे तरी हे विंग्रजीचेच भाषांतरच करतात. काही बड्या पेपरात तर महाराष्ट्र टाईम्सच्याच बातम्या भाषांतरित केल्या जातात.
Murkhano ata tari jage vha. Navi pidhi marathi vachatach nahi. Ya ashya prakaramule marathi koni vachnarch nahi. Marathi papaer koni vachnar nasel tar tumi kay karnar? English tar tumala yet nahi. Electronoic madhe yevadhya jaga nahit, tumhala tasa cheharhi nahi. Mag??
Bhik Magnar ka? Kahitari alternate shodha.
पुनेमीडिया ने शेपूट घातली तशी तुम्ही घालू नका
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
-
►
January
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

