आम्ही लोकसत्ता ब्लॉगर झालो. आमचे लेख लोकसत्तेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले. ते जगभरातील लाखो वाचकांनी वाचले. लाखो वाचकांतील शेकडो वाचक त्यावर कॉमेन्टले. आम्ही खूप खूप प्रसिद्ध झालो. मराठी विश्वातील एक आघाडीचे ब्लॉगर म्हणून लोक आम्हांस ओळखू लागले...
रोज रात्री साडेनवाच्या ठोक्याला तोंडावरून गोधडी ओढली रे ओढली, की आम्ही या सुखस्वप्नात रममाण होतो. गेले आठ दिवस दिसते मजला हे स्वप्न नवे!
पण कसले काय आणि फाटक्यात पाय!

लोकसत्ताने मारे जाह्यराती देऊन जाहीर केले, की व्हा लोकसत्ता ब्लॉगर. संकेतस्थळावर ब्लॉग नोंदवा म्हणून एक लिंकपण देऊन ठेवली.
पण ब्लॉग नोंदविणाराने ब्लॉग नोंदवायचा तर कुठे नोंदवायचा?
अजून व अद्याप लोकसत्तेचा ब्लॉगफलाट काही तयार झालेला नाही.
दोन दिवस आम्ही वाट पाहिली.
म्हटले, चुकून पीडब्ल्यूडीकडे हा फलाट बांधण्याचे काम तर दिले नाही ना केतकरांनी (पक्षी - कुमार केतकर, त्रिकालवेधी संपादक, लोकसत्ता)?

अखेर न राहवून आम्ही लोकसत्तातील ब्लॉगर-पत्रकार रा. रा. शेखर जोशींना हल्केच पुसले, की जोशीबुवा, जोशीबुवा, लोकसत्तेचा ब्लॉग कधी हो येणार?
तेव्हा जोशीबुवांनी आपल्याकडे खूप काम आहे व ठालेपाटलांनंतर आपणांसच समग्र साहित्य व्यवहार सांभाळायचा आहे, अशी वाङ्मयीन पोझ घेतली. आमचा सवाल त्यांच्या कर्णरंध्रापर्यंत पोचलाच नसावा, असे वाटून आम्ही त्यांस पहिलाच प्रश्न दुस-यांदा केला. तर त्यांनी पुन्हा तीच पोझ घेतली.

आता काय करावे, असा खूपखूप विचार करून आम्ही लोकसत्तातील अन्य ब्लॉगर-पत्रकार रा. रा. पंकज भोसले फिल्लमवाले यांच्याकडे गेलो. तर ते नुसतेच लेखामागून लेख लिहित होते. बातम्यांमागून बातम्या लिहित होते. पानांमागून पाने लावीत होते. उरलेल्या वेळात डीव्हीडीमागून डीव्हीडी पाहात होते. (त्यांच्या या लेखनकामाठीचे आमच्या ताईंना केवढे कौतुक! किती रे बाबा लिहितोस, म्हणत मनातल्या मनात सारख्या काळजी करीत असतात!!) रा. रा. भोसलेंचा हा असा लेखनदिग्विजय सुरु. तरीही आम्ही अदबीने त्यांस व्यत्ययिले व युनिकोड मराठीत पुसले, की राजे भोसले, राजे भोसले, लोकसत्तेचा ब्लॉग कधी हो येणार?
त्यावर त्यांनी आमच्याकडे, आम्ही म्हणजे क्युरियस केस ऑफ मराठी ब्लॉगर आहोत, असा एक किंचितकृपाकटाक्ष टाकला. मग स्लमडॉगमधील अनिल कपूरसारखा चेहरा करीत त्यांनी आम्हांलाच एक कोटीचा सवाल केला, "कसला ब्लॉग?"
आता मुख्य अंकवाले ऑनलाईनवाल्यांना बिनकामाचे समजतात. ऑनलाईनवाल्यांना मुख्य अंकवाले म्हणजे मागासलेले वाटतात. हा वर्गसंघर्ष पेपरोपेपरी असतो. ई-सकाळसम्राट सम्राट फडणीस हे या संघर्षावर एक अख्खी साईट काढू शकतात! पण तरीही ऑनलाईन एडिशनबद्दल एवढीही माहिती नसणे म्हणजे अतिच झाले. तेव्हा आम्ही रा. रा. राजे भोसलेंना लोकसत्तेचा ब्लॉग हे प्रकरण युनिकोड मराठीतून समजावून दिले.
"अच्छा, ते होय," राजे भोसले म्हणाले, "ते ब्लॉगबिग आम्हांला काय माहित नाही. ते तुम्ही विनायक परब यांना विचारा."
माझी बातमी लागली का हो आज पानात, असे विचारत येणा-या ज्युनियर बातमीदाराला पानलावे उपसंपादक ज्या प्रेमाने हुडुत् करतात, तेच सराईत प्रेम राजे भोसलेंच्या या उत्तरात होते!

आता रा. रा. विनायक परब यांना गाठायचे म्हणजे केवढा सिटी वॉक करावा लागणार या कल्पनेनेच आमच्या देही झेंडू फुटला. परंतु योगायोगाने ते कचेरीतच होते. शिवाय कॅम्पस मूडमध्येही होते. ते पाहून आम्ही त्यांस विचारले, की लोकसत्तेचा ब्लॉग कधी हो येणार?
तर त्यांना धक्काच बसला!
ते उद्गारले, "कधी येणार म्हणजे? सुरु पण झालाय आमचा ब्लॉग."
ते ऐकून मनीं म्हटले, यांची सांगण्यात काही चूक होतेय की आपल्याच कर्णरंध्रांत काही समस्या आहे?
"अहो, तेथे नुसतेच म्हटलेय की ब्लॉग नोंदवा. पण त्यावर क्लिक केले, की आत कॉमेन्टचा फॉर्म येतो!" आम्ही आमचे अवकाशव्यापी दुःख हलके केले.
"मग? त्यालाच तर म्हणतात ब्लॉग! या माध्यमातून आम्ही ब्लॉगचे केवढे मोठे ब्रॅंडिंग करतो आहोत! मराठी वाचकांमध्ये ब्लॉग या माध्यमाबद्दलची जाणीव जागृती करण्याचे केवढे प्रचंड काम यातून होत आहे."
नंतर बराच वेळ त्यांनी आमचे ब्लॉग म्हणजे काय, इंटरनेट म्हणजे काय, संगणक म्हणजे काय, लिहिणे म्हणजे काय असे थोरथोर प्रबोधन केले.
बुद्धाला बोधीवृक्षाखाली बुद्धत्त्व प्राप्त झाले. आम्हांस वृत्तांताच्या आधारवडाखाली बुद्धत्त्व आले.

वाटले,
फुकाच आपण स्वतःस ब्लॉगर म्हणवित मिरवित होतो.
अरे मूढबापू, ब्लॉग म्हणजे अखेर असते रे काय?
आपण ज्यास लेख म्हणतो, ते सुद्धा अखेरीस कॉमेन्टच असतात ना!
अरे शतमूर्खा, अखेर अवघे लेखन हेच एक ब्लॉग आहे.
कोणी लेखांस ब्लॉगमधील पोस्ट म्हणते.
कोणी वाचकांच्या पत्रव्यवहारास ब्लॉग म्हणते.

ब्लॉग याने की वेबलॉग या संकल्पनेस एवढे सुंदर, एवढे सरळ, एवढे सोपे रुप कोणी दिले, याच्या शोधात आम्ही सध्या आहोत.
लोकसत्तामधील कोणी याचे उत्तर देईल काय?
(कृपया, उत्तरासाठी या लेखासोबतच्या कॉमेन्ट फॉर्ममध्ये आपला ब्लॉग नोंदवा!!)

(Posted by बापू आत्रंगे, दि. ३१ मार्च २००९)

This entry was posted on 31.3.09 at 13:45 . You can follow any responses to this entry through the comments feed .

23 comments

Vachak  

Ha ha ha... Majja aahe! Ye kya ho raha hai Bapu? Kon tar Loksatta valyana Blog baddal KT dyayala pahije buva!

March 31, 2009 3:23 PM

लोकसत्तेला एका मल्टीसम्पादकाची गरज आहे. लाटकर तयार आहेत का बघा...!

March 31, 2009 4:20 PM
Anonymous  

लोकसत्तामध्ये नोकरी सोडून पुन्हा परत आल्यावर चाैपट पगार देण्याची पद्धत असेल तर लाटकर नक्की येतील...

बंडूनाना शिंगरे

April 1, 2009 11:57 AM
Anonymous  

आम्ही बी बुलॉगर झालो वो बापू. लोकसत्तेतले. आमच्या तीन कमेंटा त्यांनी लावल्यातच नाय. तेव्हा आम्ही रागारागातच म्हटले...

लोकसत्ताने हा उपक्रम राबवून लय झैक काम केले बघा. काय शॉलीट उपक्रम हाये, धन्येवाद. आम्हाला अशी थोर संधी वूपलब्ध करून दिल्याबद्दल..

आणि काय आश्चेर्य. आमची कमेंट आमच्या नावासकट प्रगटली.

आम्ही ब्लॉगर झाल्याच्या आनंदात पेढे वाटले.


ता.क.

आमच्या कमेंटचा वापर करून रा.रा शेखर

जोशी यांनी रविवारच्या अंकात एक भली मोठी बातमी लिवली हाये. लोकसत्ताच्या ब्लॉगला तुफानी प्रतिसाद अशा आशयाच्या शीर्षकाने.

पण त्या नतद्रष्ट पानलाव्या उपसंपादकाने आमचे नाव त्या बातमीतून काढून नवव्या कॉलमात लावल्याचे कळते समजते.

--- आम्ही (म्हणजे मीच) त्याचा जाहीर निषेध करतो.

-टोच्या बोबडे.

April 1, 2009 11:29 PM
Anonymous  

Atishay mhanje Atishay mhanje Atishay chhan, utkrushta agdi good better bestach baghaa.

April 3, 2009 2:41 PM
khabrilal  

Bapu, baas kara ki, dusri post yeu dya ata.

April 4, 2009 12:23 AM

वा बापु वा.

April 4, 2009 10:20 AM
Anonymous  

HAREKRISHNA HAREKRISHNA KRISHNA KRISHNA HARE HARE...

April 4, 2009 3:31 PM

बापू, नवं लिवा की काही..!

April 4, 2009 4:30 PM

रा.प्र. महामंडळाच्या प्रहार.इन या संकेतस्थळावर ब्लॉग दिसत नाही. लोकसत्ताची री ओढली दिसतेय त्यांनी..!

April 4, 2009 4:37 PM
Anonymous  

ओ बापू,

लोकसत्ता म्हणत असलेल्या ब्लॉगला अपडेट करण्यासाठी बसला की काय

नाही, म्हणजे खूप दिवस नवी पोस्ट आली नाही.

आम्हाला वाटले तुमच्या पोस्टही तशाच येत असाव्यात. म्हणजे तेथे कमेंट टाकावी बुधवारी अन् लागावी शनिवारी, असे होते. तशीच तुमची आज टाकलेली पोस्ट पुढील आठवड्यापर्यंत मिळेल काय
सांगा बरे,


-चक्रसोड स्वामी,
आमच्या (आणि तुमच्याही)मुंबईतून

April 7, 2009 12:52 AM
Anonymous  

Bapu

Butavar(shoes) liha kahitari
Ithlya vruttapatratlya lokana anekana butani marnyachi icchha aahe ho...

Ase lok kon(marnare ani jyana marayche aahe ase) he tumhala mahit aahech.

April 8, 2009 1:29 PM
Anonymous  

Bapu,
Prahaar ne tumche kaay ghode marle ahe, kalte samjte blogvar nivdnuk vartankanat Prahaarcha ullekh ka nahi.

April 9, 2009 11:13 AM
Anonymous  

Are he Tokekar gele tari kuthe ? Khabrilal shodh gya?

April 11, 2009 2:21 PM
Anonymous  

टोकेकर की काठ्योकर

बातमीदारी पुस्तक लिहिणारे सुनील माळी

की तंबी देणारे बोजेवार

काय कळायला मार्ग नायी बुवा

ज्यो भी है वो मिलत्याच नही.

लय काम करतायत बहुतैक आपले बापू भौ

ओ बापू भौ, जरा अपडेट राव्हा की.

लोकसत्ताच्या ब्लॉगनेभी मागे टाकलं बघा तुम्हाला

- बखरीलाल

April 11, 2009 9:56 PM
खबरीलाल  

आयला बापू कुठे गेले?


खबरीलाल

April 12, 2009 9:26 PM
Anonymous  

Aho Bapu,
31 March nantar tumhi kahi lihilech nahi. Chuklyasarkhe vatate.STOCK sampala ki kay.Lavkar kahi tari KHARMARIT liha rao. Lay gwad vatatay rao.

April 13, 2009 7:01 PM
Anonymous  

Are Blog mhanje haay kaay an naay kaay ?
Kunachya bapache bandhan naay..aao jaao ghar tumhara..blog takla kaay aani naay kaay..kunala ghabraayche kaaran naay? kaay Bapu barobar haay naaaa?

April 15, 2009 1:26 PM
Anonymous  

Aho Bapu.......
KUTHE AHT.....
31 March nantar tumhi kahi lihilech nahi. Chuklyasarkhe vatate.STOCK sampala KA? NIVDNOKICHYA KALAT TUMCHY KADE STOCK NAHI MANJE HE KAHI TARICH..... SHOBHAT NAHI RAO TUMAHALA.....

April 16, 2009 4:21 PM
Anonymous  

where are you bapu


tumcha chahtha

April 17, 2009 7:12 AM
Anonymous  

Ketkar aani Loksattachi chamchegiri karnyasathi tumcha ha udyog(Batmidar, kalte samajte)suru aahe diste. Pravin Mahajancha lekh chhapla tyyabaddal kahitari mhana ki, ka laaj watate aaplya ?

April 17, 2009 2:24 PM
Anonymous  

बातमीदार
अहाहा, माहितीपूर्णतेची भाकडकथा - वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्य हो, आज आपण येथे संगणकावरील माहितीच्या महाजालाची उपयुक्तता व गुगलपूर्व व गुगलोत्तर कालखंड या विषयीची माहिती येथे घेणार आह...

hi post sahyogi batmidar v kalte samajte var diste. pan batmidarvar ti ka open hot nahi...

April 18, 2009 9:47 PM

अहाहा ब्लॉग म्हणजे ब्लॉग म्हणजे ब्लॉग असतो सगळ्यांचाच तो शेम असतो :)

April 29, 2009 5:41 PM

Post a Comment