कालची गोष्ट.
सक्काळसकाळी नेहमीप्रमाणे एका हाती कषायपेयपात्र, दुज्या हाती पारले जी माने जिनियस बिस्कुटे आणि समोर पेपरांचे चघाळ अशी रवंथसामुग्री घेऊन बसलो होतो.
नेहमीच्या सवयीने आधी मुंटातील छायाचित्रे पोटभरून पाहून घेतली. मग सकाळचा अग्रलेख वाचला. हल्ली अग्रलेखाबरोबरच सकाळच्या संपादकांनी लिहिलेली (लागले बोवा लिहायला संपादक!... छडी लागे छमछम विद्या येई घमघम!!) निवडणूक वार्तापत्रेही आम्ही आवडीने वाचतो. ती वाचून आम्हांस म्हाराष्ट्राच्या समस्त राजकीय परिस्थितीचे धादांत आकलन होते. कारण की त्यात गेल्या निवडणुकीचा इतिहास व यावेळी हे निवडून नाही आले तर ते निवडून येतील असे खोलखोलसखोल अभ्यासपूर्ण विश्लेषण असते. त्याचे परिशिलन केल्यावर आम्ही पुन्हा मटाकडे वळलो. त्यायोगे आम्हांस सभ्यसामना वाचल्याचे पुण्य लाभले. (तुम्हांस सांगतो, तो दिवस आता दूर नाही, की ज्या दिवशी सामनाच्या पहिल्या पानी चौकट छापून येईल, की आमची कोठेही शाखा नाही! बोरिबंदरात तर नाहीच नाही!! असो.)

यानंतर आम्ही लोकसत्ता हाती घेतला आणि आमच्या कानी अचानक पॉंगपॉंग पॉंगपॉंग ऐसा कर्कश्श ध्वनी उमटला. केवढे दचकलो आम्ही! त्या भरात हातातील उष्ण चहा राप्र महामंडळाच्या प्रहारवर सांडला. (तर त्याचे क्षणात कोल्ड ड्रिंक झाले!!)

तुला काय समजते की नाही? कानाजवळ भोंगे कसले वाजवतेस भलत्या वेळी? असे आम्ही रागेजून हिला बोलणार, तर ती तेथे नव्हतीच. मग हा आवाज केला तरी कोणी?
पाहतो तो वेळूच्या बनातून बासरीचे सूर यावेत त्याप्रमाणे लोकसत्तेच्या पानातून हे हॉर्नओकेप्लीज येत होते.
काय बरे हे आक्रीत? असे स्वगत म्हणत आम्ही लोकसत्तेचा पर्णसंभार चाळू लागलो.
आणि लख्खकन् आम्हांस आवाssज कुणाचा? याचा उलगडा झाला.
हा तर आमचे त्रिकालवेधी संपादक रा. रा. कुमार केतकर यांचा हॉर्न!

'गेले काही दिवस मराठी सारस्वतात जे काही चालू आहे त्यावर भाष्य करणे, मत प्रदर्शित करणे, सल्ला देणे म्हणजे त्या कर्कश्श गोंगाटात आपलाही हॉर्न वाजवण्यासारखे आहे...' असे म्हणत रा. रा. केतकर यांनी 'सुशिक्षितांची निर्बुद्धता!' (लोकसत्ता, चोवीस मार्च दोन हजार नऊ) असा हॉर्न मागाहून 'वाहतूक सुरळीत' झाल्यानंतर वाजविला आहे.
या हॉर्नच्या (हॉर्न कसला, ही तर इशारतीची तोफच!!) आवाजाने आमचा जीव मात्र भांड्यात पडला.

आम्हांस आधी तर असे वाटले होते, की रा. रा. केतकर परदेशात जावे, तसे सूक्ष्मात वा मौनातच गेले आहेत!
आमचे (राजी)नामचीन लेखकसूर्य आनंद यादव यांनी तळ्यात-मळ्यात करता करता संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा मसापच्या डोहात टाकला. त्या दिशी आम्हांस वाटले, की समस्त पत्रांतून फटाके फुटणार. झालेही तसेच. परंतु त्यात लोकसत्तेचा आपटबार काही नव्हता. त्या दिशी लोकसत्तेत आनंद यादवांऐवजी लालू यादवांवरचा अग्रलेख. ते पाहून आम्ही मनी म्हटले, अगंबाईअरेच्चा! ही लोकसत्तेच्या न्यूजरॅपची गफलत म्हणावयाची, की रेखाबाईंची नजरचूक? चुकून त्यांनी या यादवांऐवजी त्या यादवांवरचा अग्रलेख तर नाही ना डकवला?
तेव्हा आम्ही आमच्या अंगभूत भोचकपणाने लोकसत्तेत चौकशी केली, तर समजले की सध्या केतकरसाहेब औटॉफ महाराष्ट्रा आहेत. म्हणजे नक्कीच, रा. रा. श्रीकांत बोजेवारांना कार्यबाहुल्यामुळे अग्रलेख लिहिण्यास सवड व वेळ मिळाली नसणार आणि नेहमीप्रमाणे पुण्याची लाईन बंद पडलेली असणार. त्या गोंधळात राहून गेला या यादवांवरचा अग्रलेख. मग आम्ही टाईमप्लीज म्हटले आणि दुस-या दिवसाची वाट पाहिली. मग आम्ही तिस-या, चौथ्या, पाचव्या दिवसाची वाट पाहातच राहिलो. परंतु तो अग्रलेख काही आलाच नाही.
म्हटले रा. रा. कुमार केतकर हे काही डांबराला डरणारातले नाहीत!
मग हे ऐसे का बरे झाले असावे?
या संपूर्ण प्रकरणात सोनिया, पवार, स्वयंभू डावे आदींचा सहभाग नसल्याने तर त्यास अनुल्लेखाने डावलले नसेल ना?

गेले चार-पाच दिवस आम्ही आणि आमची तनहाई याच गोष्टीचा सखोल विचार करीत बसलो होतो.
आणि अचानक हे पॉंगपॉंग झाले.
मनी म्हटले, उशीरा आले, योग्य मुक्कामी आले!!
पण आले ते कसे आले, सर्वांच्या कानी सटासट सटके देतच आले.
अग्रलेखाचे शीर्षक (सुशिक्षितांची निर्बुद्धता!) वाचून तर आधी आम्हांस वाटले, केतकरसाहेब आमच्यावरच घसरले की काय?
(आम्ही सुशिक्षित आहोत, याचा दाखला आमच्याकडे आहे. आमच्या बुद्धपणाबाबत मात्र अनेकांचे अनेक समज आहेत!)
किंतु नंतर समजले, की मसापमधील अनेकांसही तसेच वाटत होते.
म्हणजे वार सुस्थळी बसलाय!
म्हणजे चांगले झाले!

तथापि या संपूर्ण लेखातून आम्हांस एवढेच समजले नाही, की
''इतक्या अचाट प्रमाणावर ‘संस्कृतीकरण’ (!) होत असले तरी महाराष्ट्रात इतके सांस्कृतिक अराजक कसे? इतकी सर्वव्यापी निर्बुद्धता कशी? इतकी असहिष्णुता आणि अरसिकता कशी? या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे नाहीत,'' असे साक्षात कुमार केतकर म्हणत असतील, तर या सवालांच्या उत्तरांकरीता वाचकांनी कुणाकडे जावयाचे? कोण्या एडिटराच्या तोंडाकडे पाहावयाचे?
या समग्र परिस्थितीस जबाबदार कोण?
या समग्र परिस्थितीत समस्त गंभीर वृत्तपत्रांची जबाबदारी काय?

की आम्ही आता आमच्या पेपरवाल्यास मुंबई चौफेर टाकावयास सांगू?
कालपासून आमच्या कानात या विचारांचा हॉर्न सारखा भोंभों करीत आहे.

(Posted by बापू आत्रंगे, दि. २५ मार्च २००९)

(लोकसत्तेचा अग्रलेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

This entry was posted on 25.3.09 at 13:07 . You can follow any responses to this entry through the comments feed .

12 comments

great

March 25, 2009 1:29 PM
KHABRILAL  

ketkar bolle sorry lihele he kami ahe ka?

March 25, 2009 2:30 PM

Too Good Bapu
काल लोकसत्ताचा अग्रलेख वचल्यावर मला वाटलं, कुमार केतकर बापूंचा ब्लॉग वाचत असावेत आणि बापूंच्या 'आमच्या लोकसत्ताचं बघा. त्या साहेबांनी काही बोललंच नाही!' (वादंगाचे डोही....पोस्ट) या वाक्यावर उत्तर म्हणून त्यांनी 'गेले काही दिवस मराठी सारस्वतात जे काही चालू आहे त्यावर भाष्य करणे, मत प्रदर्शित करणे, सल्ला देणे म्हणजे त्या कर्कश्श गोंगाटात आपलाही हॉर्न वाजवण्यासारखे आहे...' असं म्हटलं असावं.
सोनिया, पवार, स्वयंभू डावे, नवमध्यम वर्ग, नवश्रीमंत असे शब्द दिसले की आज काल तो अग्रलेख ओझरता वाचला जातो.

March 25, 2009 2:44 PM
ALHAD  

KETKARANCHI CHAMCHEGIRI


KASHALA ETAKEE?

March 25, 2009 10:45 PM
Anonymous  

आल्हाड, चमचेगिरी करावी अशी माणसे राहिलीत का हल्ली पेपरांमध्ये?
चमचेगीरी केतकरांची नाय करायची तर काय बाकीच्या सरपटणारयांची?

March 25, 2009 11:29 PM
Anonymous  

बापू, फार सांभाळून लिहिलय. लोकसत्ता असल्यामुळे असेल बहुधा, तुमच्या लेखणीला धार लागलेली नाही हे खर. बाकी चमचेगिरी वैगरे म्हणण्यात अर्थ नाही.

March 26, 2009 8:09 PM

Ketkaranna jevha jaag yete

March 27, 2009 4:00 PM
Anonymous  

Ketkarana jevha jaag yete.. tevha te mitra aani olkhichya lokanchya pustakaanaa prastavna lihitat... aani bogus pustakahi kase akshar vangmay aahe he thasun mandnyacha prayatna kartat.Tyanche slogan asel..Chala Prastavna lihuyaaaa.......

March 27, 2009 7:32 PM

>>प्रहारवर सांडला. (तर त्याचे क्षणात कोल्ड ड्रिंक झाले!!)

:D

March 28, 2009 9:43 AM
Anonymous  

Bapu, pudhcha horn vajwa ki rao..ka ketkarani sangitley no honking..

March 28, 2009 8:41 PM
KHABRILAL  

Bapu, Ravivarcha loksatta pahila ka, Varatimagun ghode ahet.

March 29, 2009 10:42 AM

So after a long wait Loksatta's Editor Kumar Ketkar has opened his cards. He has openly joined the hands with RSS lobby in Loksatta to harass Sanjay Awate. It is a common impression that Ketkar is a hardcore Nehruvian, anti RSS and he is regularly showing it through his writing. But the fact is that Ketkar has always surrounded by RSS lobby. It is not that this situation is forced on him. He himself has encouraged the RSS lobyy to get around him and become powerful. Just look at the people around Ketkar, who are they ? Sudhir Joglekar, Shubhada Chaukar, Shrikant Bojewar, Datta Panchwagh, Arvind Gokhale, Mukund Sangoram and so on....So it is clear that at a one hand Ketkar is taking anti RSS stance in his writing but on the other hand he is favouring the RSS lobby in office and at personal level. As per the information I got Awate was the blue eyed baby of Ketkar. He himself brought Sanjay to Lokatta. But suddenly what happened? Is Ketkar become insecure about Sanjay? Everybody is aware that Sanjay's book on Obama has tremoundously popular. Is Ketkar jeolus about Sanjay, as he has encroached his territory of international affairs. One thing is clear that whatever has happened is good for journalism. Because it will reveal the real face of Ketkar. Nobody has taken seriously to Nikhil Wagale when he was telling the truth about Ketkar. But now the process of tearing the mask of Ketkar will start. Awate is just an occasion. The real thing is that the image created of Ketkar is a false one and ultimately Marathi media will know about it.

April 6, 2009 10:43 PM

Post a Comment