(होळीनिमित्ताने केलेले हे बुरा न मानो होली है परंपरेतील लेखन वास्तविक कालच प्रसिद्ध व्हायला हवे होते. किंतु शिळ्या पोळीप्रमाणे कधी कधी शिळा लेखही अधिक चवदार लागतो, असे आम्हीच कुठेतरी म्हटले आहे. त्या एका विधानाच्या आधारावर येथे हा कालचा लेख आज प्रसिद्ध करण्याची जुर्रत करीत आहोत. - बापू)
---------------------------------

बॅक्ग्राऊंडला समग्र होळीगीते ढणढणत आहेत. सप्तरंग, लोकरंग, नवरंग अशी भिन्नभिन्न रंगउधळण सुरु आहे.
वातावरणाने जणू मुंबैटाईम्सचा लेऔटच ल्याला आहे. काव्यशास्त्रविनोदाच्या पिचका-या उडत आहेत. मागील बाजूस एका टेबलावर कसलेसे पात्र आहे. त्यात कसलेसे सफेद द्रव्य आहे. (क्यामेरामन, तो तेवढा भाग तेवढा ब्लर करून टाका!) सगळ्यांचे चेहरे रंगाने एवढे माखलेले आहेत, की इतरांस काय, त्यांचे त्यांनाही ते ओळखू येत नाहीत. परिणामी त्यांची ओळख अंदाजानेच लावणे क्रमप्राप्त आहे. (चू.भू.द्या.घ्या.)

आता आपणांस प्रश्न व सवाल पडला असेल, की हे कशाचे वर्णन आहे? व ते काय म्हणून दिले आहे?
तर मुंबैतील समस्त पेपरांस होळीची कचेरीबंद सुटी असते. (वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या एकजुटीची विजय असो!) हा दुर्मिळ वार्षिक योग साधून यंदा संपादक परिषदेने संपादकांची होळी (यात कुठलाही श्लेष नाही याची कृपया नोंद घ्यावी!) आयोजित केली होती, त्या रंगोत्सवाची ध्वनीचित्रफीत नुकतीच आपल्या हाती आली आहे. (होळीचे आयोजन संपादक परिषदेचे होते म्हटल्यावर ती प्रायोजित असणार हे काय वेगळे व स्वतंत्र सांगावयास हवे? होळीतल्या एकेका गोवरीपासून आगपेटीच्या काडीपर्यंत व गुलाल-बुक्क्यापासून प्लास्टिकच्या पिचकारीपर्यंत एकेक गोष्ट व वस्तू तेथे प्रायोजित होती. होलिकोत्सवाचे श्रीफल तेवढे संपादक परिषदेच्या मालकीचे होते! त्यातही वदंता अशी, की तो नारळ संपादक परिषदेने सत्काराचे साटेलोटे करून कमाविलेला होता! सत्य-असत्य रा. रा. यशवंत पाध्ये जाणे!!)

या फेस्टिव्हलाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यास बहुतेक सगळे संपादक दस्तुरखुद्द उपस्थित होते. यात कोणासही नवल व आश्चर्य वाटेल. परंतु लक्षात घ्या, या कार्यक्रमाचे आयोजक आहेत - संपादक परिषद! (होय, होय, तीच संपादक परिषद, की जी संपादकांस प्रायोजित पुरस्कार देते. मंदीच्या काळात या पुरस्कारांचे मूल्य व मोल अधिकच वाढलेले आहे मित्रहो!) तेव्हा आता अधिक काळनाश न करता आपण पाहू या, या शिमगोत्सवातील नेहमीच्या यशस्वी संपादकांच्या रंगपंचमीचे संपादित अंश...

ते पाहा,
होळीचे ढोलताशेझांजनगारे जोरजोरात वाजत असताना एका कोप-यात काही जण घोळक्याने उभे आहेत. इसवीसन तीन हजार नऊमध्ये जगभरातला शिमगोत्सव कसा असेल, याचा त्रिकालवेध ते घेत आहेत व तेथे रा. रा. प्रवीण टोकेकर ते रा. रा. संजय आवटे सदृश चेहरे दिसत आहेत म्हटल्यावर, तो नक्कीच केतकरपीठाचा सत्संग असणार! पण तेथे रा. रा. कुमार केतकर दिसत नाहीत. ते कोठे आहेत?

ते पाहा, दिसले. कुमार केतकर. आपल्या फाऊंटन पेनचे टोपण उघडून त्यांनी सपकन् कोणाच्या तरी पाठीवर काळ्या शाईचा सपकारा मारला! कोण बरे असेल ते? पाठीमागून तरी ते रा. रा. अरुण टिकेकर वाटताहेत. त्यांनी पवारांच्या भाषणांचे संपादन केले, त्याची तर ही सजा नव्हे?

रा. रा. डॉक्टर मात्र अत्यंत तारतम्याने रंग उडवित आहेत. वास्तविक ते रंग उडवित आहेत असे म्हणणे हे मोठेच उदारमतवादी विधान झाले. सिगारेटची राख झटकावी, तसे ते रंग झटकीत आहेत! पिचकारी रंगाची असो, की मतांची, हातात पेपर असल्याशिवाय त्याचा परिणाम होत नाही, हे त्यांस जाणवले असेल का?

डॉक्टरांप्रमाणेच रा. रा. अशोकराव पानवलकर (पक्षी - अप्पा) हेही अत्यंत धीरगंभीरपणे रंग खेळत आहेत. आपल्या कनिष्ठाच्या कधी गाली, तर कधी पाठीवरी ते रंगचपराक वा रंगथाप मारत आहेत.
बघा, बघा, त्यांनी आपल्या एका कंत्राटी सहका-याच्या अंगावर अचानक रंग टाकला. पण त्याबरोबर तो बिच्चारा एवढा दचकला व टरकला व घाबरला की त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले! त्याने घाईघाईने अप्पांनी कोणता रंग टाकलाय ते पाहिले. रंग पिंक स्लिपसारखा नव्हता! तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला!
अप्पांच्या रंगपंचमीतही एक सराईतपणा दिसतो आहे. मटाचा प्लास्टिक इमल्शन काढून त्यास टिकावू रंग देण्याचा नेटका उद्योग त्यांनी अलीकडे सुरु केल्याचे सांगणारे सांगतात. त्यातून तर त्यांस ही रंगसफाई साधली नसेल?

मटातील सहका-यांपासून सावध अंतर राखून कोणी एक व्यक्ती फिरताना दिसत आहे. पांढरीफेक सुरवार, पांढराफेक कुर्ता. डोईस कोल्हापुरी फेटा. उंच कपाळी गुलालाचा उभा टिळा. छातीवर हात जोडून येत्या-जात्यास पुढारी-छाप नमस्कार. रा. रा. संजीव साबडे तर नव्हेत हे? आता ऐन होळीत, सप्तरंगात न्हाऊन आली, आली माझ्या घरी ही दिवाळी असे गाणे गुणगुणत कोणी अत्तराचा फाया हुंगत चालले असेल, तर त्याची अन्य काय बरे ओळख असेल? साबडेच असावेत ते. स्वप्नपूर्तीच्या आनंदरंगात ते इतके न्हाऊन गेले आहेत, की इतरांना रंग लावण्याचेही भान त्यांना उरलेले नाही. पण समजा त्यांनी रंग टाकले, तरी ते पक्के बसणारच नाहीत, याची काळजी घेण्यासाठी सकाळ आणि लोकमतने पूर्ण सज्जता केली आहे. याची कल्पना त्यांस असेल काय?

अरेच्चा! ती चंमतग पाहा... तिकडे तिकडे... आली का तुमच्या रडारवर? येतेय का ऐकू?
"आज माझ्या या पृथ्वीवर माझ्या आकाशाखाली माझ्या जमिनीवर ही माझी होळी माझे लोक साजरे करीत आहेत. माझ्या या पारंपरिक सणामध्ये मी आणलेले माझे रंग मीच उडविणार आहे. माझी रंगाची पिचकारी माझ्या डाव्या हातात आहे. माझ्या उजव्या बाजूला मी माझ्या मी मी मी...."
तर वाचक हो, हा आजचा सवाल!
काय असेल बरे त्यांचे नाव? नक्कीच मीखिल! कोणावर बरे त्यांनी नेम धरलाय? शिरिष पारकर (संपादक, पा. महाराष्ट्र माझा, मुखपत्र, मनसे) यांच्यावर तर नव्हे? (परंतु ते असे कोणावरही पिचकारी टाकू शकतात. उद्या त्यांच्यासमोर दगड आणून बसविला, तरी ते त्यालाही पिचकारतील, की 'तुम्हाला असे वाटत नाही का, की तुम्ही रस्त्यावर येथे तेथे पडता त्यामुळे सर्वच पक्षांच्या गुंडांना दगडफेक करण्यास प्रोत्साहन मिळते?'... ते कुणालाही बोलण्याची संधी न देऊन निरुत्तर करू शकतात!!) पुढची निवडणूक लक्षात घेऊन ते बहुधा येथे पिचकारीची प्रॅक्टिस करण्यासाठी आले असावेत!

रंगपंचमी आता अगदी रंगात आली आहे. प्रत्येक संपादक दुस-याकडे पाहून न पाहिल्यासारखे करीत रंग खेळत आहे. संजय राऊत हे मात्र त्यात दिसत नाहीत. त्यात नाहीत म्हणजे नक्कीच ते एखाद्या च्यानेलास बाईट देत असणार. अगदी बरोब्बर. ते पाहा, ते तिकडे एका च्यानेलबाळास एक होलिकागीत ऐकवित आहेत. 'काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज घड्याळाचा काटाही रुतावा हा पवारगेम आहे...' ते ऐकून रा. रा. आल्हाद गोडबोले यांच्या हातातील रंगास मात्र उकळ्या फुटत होत्या! या रंगाचा पिचुकप्रहार कोणावर करावा, हे विचारण्यासाठी, ते पाहा, त्यांनी बंगल्यावर फोन लावला आहे.

त्यांचा फोन सुरु असतानाच रा. रा. उत्तमराव कांबळे (पक्षी - महाराष्ट्राचे शॅडो मुख्यमंत्री) तेथे हजर झाले. ते सकाळचे सर्व्हेसर्वा. त्यामुळे त्यांच्यासमवेत ३६ बातमीदारांची फौज होतीच. आल्याक्षणी त्यांनी घड्याळात पाहिले. मग बातमीदारांची मिटिंग घेतली व लोक टमरेलाने रंग उडवितात की पिचकारीने याच्या सर्वेक्षणाला बसल्याजागी सुरुवात केली! हल्ली त्यांचा सर्वेक्षणावर मोठा जोर. त्याचबरोबर हल्ली सर्व कामे घड्याळाबरहुकूम करण्यावरही त्यांचा कटाक्ष, असे सांगणारे सांगतात. कामकाळवेळेचे गणित बरोब्बर व सुयोग्य जमल्यामुळेच त्यांचे 'पुण्यावर स्वारी' हे नवे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे, असेही सांगणारे सांगतात!

होळी आता बरीच रंगबिरंगी झाली आहे. बाकीच्या संपादकांचे चेहरे तर अंदाजानेही ओळखणे कठीण झाले आहे.
निवडणुकीच्या काळात होळी आली की असेच होते. भूमिका व चेहरे इतके बदलतात, की हेच का ते, असा प्रश्न पडावा.
तेव्हा आता त्या फंदात आपणां जनसामान्यांनी न पडलेलेच बरे...
त्यांचे हे असे रंग त्यांनाच लखलाभ होवोत.
गड्यांनो, आपणांसाठी आपले सीएमवायकेच बरे!

(Posted by बापू आत्रंगे, दि. १२ मार्च २००९)

This entry was posted on 12.3.09 at 11:27 . You can follow any responses to this entry through the comments feed .

22 comments

Anonymous  

tari mhatale bapu tumhi holiche rang kase khelale nahit te.

article kaal n denyamagil karan kay hote?
aamchya mahitinusar kaal bapuncha small accident zala.
get well soon bapu.

ha lekhahi mast jamla ahe. tyatil kahi punch tar ekdam zakas. punyavar swari ani mikhil ekdam sahi.
ya holimule kahi lok nakki petatil bapu.

March 12, 2009 11:52 AM
Anonymous  

congrats Bapu, aamhi aapale fan aahot. lai khaas livhataa rao. jonatehi chanel, paper paahun yet naahi ashi majaa yete rao. lihit rahaa.
Bandu.

March 12, 2009 12:50 PM
Anonymous  

Great,
Mikhil aankhi Great.
Great, Great and Great.

March 12, 2009 1:17 PM
Anonymous  

आज (१२.०३.०९)मुंबईतला सकाळ बघायला मिळाला. त्यातील काही उदाहरणे -

पान १ - बातमी - वीरुपंचमी.
बातमीतील शब्द - इंद्रधन्युष्य, धावांची उधळन, भारताततर्फे

पान ५ - बातमी - कविभूषण पाडगावकर
बातमीत प्रथम स्ट्रॅटफर्ड म्हटले आहे. पुढे त्याचे स्ट्रॅटसफर्ड झाले आहे.
एकदा शेक्सपियर म्हटले आहे. एकदा शेक्सपीयर म्हटले आहे.
ऐतिहासीक असेही एके ठिकाणी म्हटले आहे.
पुढे अजून गंमत आहे. बातमीत म्हटले आहे - पाडगावकर यांनी न्यू टेस्टामेन्ट या बायबलमधील ग्रंथाचे मराठीत रुपांतर केले आहे.
एका ग्रंथात दुसरा ग्रंथ! बातमीदाराच्या या अगाध किमयेचा विजय असो!!

पान ७ - लेख - फेररचनेमुळे कोण कमावणार, कोण गमावणार? याचे लेखक विनायक पात्रुडकर आहेत. ते म्हणतात - ... आनंद परांजपे ठाण्यातील शिवसेनेचे वर्चस्व आणि सहानुभूतीच्या लाटेवर ९० हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. मात्र बदललेल्या मतदारसंघात त्यांचे मताधिक्य २५-३० हजारांपर्यंत कमी झाले आहे.
निवडणुकीपूर्वीच त्यांचे मताधिक्य घटले, हे आश्चर्यच झाले!

यात आणखीही काही मजा आहे. तेव्हा आता मी रोजच हा सकाळ पेपर वाचणार आहे.
- सकाळचा एक नववाचक

March 12, 2009 2:19 PM
Anonymous  

sakal ha ata murkhancha papers zala ahe.

March 12, 2009 4:22 PM
Anonymous  

कामकाळवेळेचे गणित बरोब्बर व सुयोग्य जमल्यामुळेच त्यांचे 'पुण्यावर स्वारी' हे नवे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे, असेही सांगणारे सांगतात!

kay sangta khare ki kay... mele mag punewale...

March 12, 2009 4:26 PM
ANIL THATTE  

BAPU TUMHEE NEHMEE NEHEMEE TICH

TICH NAVE KA LIHITA? AMHEE KAAY

MELO AHOT KA?

KON HE TOKEKAR ANI AWATE?

TYANCHI MARATHI PATRAKARITET

KAAY TEE PATRAS?

March 12, 2009 5:06 PM
झुमरु खमरु झुम्रीतलैयेकर  

गगनभेदीकारांनी मोकळ्या गगनात पिचकारी उडवली.... रंग कोठे उडाला माहिती नाही आणि रंग कोणाचा उडाला , हे ही समजले नाही. असो... घ्या बापू,...सगळ्यांच्या होळीची (साॅरी...रंगवारंगवीची )दखल घ्या... वाटल्यास रंगपंचमीचा वेगळा वाढावा द्या.... पण भेदाभेदी नको...कसे..?

झुमरु खमरु झुम्रीतलैयेकर

March 12, 2009 6:08 PM
Anonymous  

अनिल थत्ते, एकदम खरे बोललात. मराठी पत्रकारितेत हल्ली कोणत्याही पत्रकाराची काय पत्रास राहिलेली आहे?
हल्ली पत्रकार कमी मॅनेजर जास्त झालेत.
मॅनेजर - पेपरची व्यवस्था पाहणारे, नोटीसा काढणारे
मॅनेजर - मालकाला बरोबर मॅनेज करणारे
एवढ्या पात्रतेवर माणसं संपादकच होऊ शकतात.
- एक संपादकपदेच्छुक शिपाई

March 12, 2009 6:10 PM
Anonymous  

अनिल थत्ते, एकदम खरे बोललात. मराठी पत्रकारितेत हल्ली कोणत्याही पत्रकाराची काय पत्रास राहिलेली आहे?
हल्ली पत्रकार कमी मॅनेजर जास्त झालेत.
मॅनेजर - पेपरची व्यवस्था पाहणारे, नोटीसा काढणारे
मॅनेजर - मालकाला बरोबर मॅनेज करणारे
एवढ्या पात्रतेवर माणसं संपादकच होऊ शकतात.
- एक संपादकपदेच्छुक शिपाई

March 12, 2009 6:10 PM
Anonymous  

solapur, kholapur, aurangbad, nagpur, nashik, jalgaon che sampadak, patrkar bapu tumala mahit nahit ka? ko barliwar batmi chapto, kon mandhan mitach karyakarmala jato ani kon 4000 rs. war kam karto paha jara. tyachihi rangpanchimi asech ki. tikde kon pahanar bapu?

March 12, 2009 7:44 PM
Anonymous  

अहो शहरातील संपादकांचा शिमगा काय घेऊन बसलात. तिकडे ग्रामीण भागात बघा धूळवड सुरू झाली आहे. सहयोगी बातमीदारवरील लेख वाचला का? निवडणूक आणि होळी एकत्र आल्याचा हा परिणाम असावा काय. असो मंदीत आलेल्या निवाडणुकीत पत्रकारांनी केली थोडी चांदी तर काय बिघडले.

March 12, 2009 9:10 PM
Anonymous  

Amchya kollapurche ek sampadak roj hapisat pichkarya martat. tyani kebinmadhech badli thevliy. pachapach thunkat astat.sampadak kebinmadhe toyletcha vaas yeto.aata paper kuthla aani naav kay vicharu naka.

March 12, 2009 10:06 PM

thattesaheb
aho anil thatte jee
aapan tec na je sandhyanamd madhye lekh lihita
aapnyashi samvas asaadhayalaa aavadel
maajha mail yethe det aahe
marathilikhan@in.com
baki lekh nehameepramane uttam

March 12, 2009 10:22 PM

बापू भाई धांसू आलेख....
पण एक गोष्ट आहे कि तुमचे चिट्ठेवर टिप्पणीकारांना नांव देताना मलेरिया का होतय? आई बापांने नांवच नाही ठेवला असेल म्हणुन हल्ली बेनामी राहिले....
बुरा मानो होली है ताकि आई बाबा से नाम तो पूछ कर हमें बता सको :)

March 13, 2009 9:58 AM

वा बापु वा.

आज मिठी लगी है तेरी गाली रे.

माझे स्नेही संजीव लाटकर सध्या असतात कोठे हो ?

March 14, 2009 9:04 AM
Anonymous  

shrivastav ji apan ya prantatatla disat nahit. tumi comment vachta ka lekh. commenta var nave ahet ka nahit yachi uthathev karta kashala...

March 14, 2009 11:05 AM
Anonymous  

shrivastav ji apan ya prantatatla disat nahit. tumi comment vachta ka lekh. commenta var nave ahet ka nahit yachi uthathev karta kashala...

March 14, 2009 11:05 AM
Anonymous  

Ha srivastav bhaiyyakon re ?

March 14, 2009 3:53 PM
Anonymous  

bapu kiti divas dandi martay..ka nivadnuk ladhvayla gele...nahi tari ata barech sampadak nivadnuk ringnat uatart ahet..

March 17, 2009 10:13 AM
Khabrilal  

o bapu kaha ho, kahi gum to nahi ho gaye nivdnuk ki randhumali mein ?

March 18, 2009 10:22 AM

kya baat hai, bapu.

March 22, 2009 7:38 PM

Post a Comment