अर्थशास्त्रात आम्हांस अजिबात गती नाही.
वास्तविक समग्र शास्त्रांची निर्मिती आमुच्या डोक्यावरून जाण्याकरीताच झालेली आहे. परंतु त्यातही आकड्यांचा खेळ आम्हांस मुळीच कळत नाही.

(तुम्हांस सांगतो, या आकड्यांनी आमुच्या जीवनप्रवाहात एवढे अनर्थ केले आहेत, की केवळ त्यांमुळे आम्हांस पुनवडीतील एका वृत्तपत्रातील नोकरी गमवावी लागली होती! त्याचा इतिहास असा, की एके प्रभाती आम्ही कचेरीत आलो. तर तेथे ही बोंबाबोंब सुरू, की ओपनचा आकडा चुकला! एकवेळ अंकाची तारीख चुकली, चालले असते! सिनेमाच्या दोन जाहिराती कमी गेल्या असत्या, चालले असते! पण आकड्यात चूक? तोबा तोबा! आता रात्री दूरध्वनीवरून आम्हीच ते कल्याणकारी आकडे घेतलेले असल्याने आमच्या नोकरीस आकडी येणार हे ठरलेलेच होते! हल्ली त्या वृत्तपत्रात आकडे येतात की नाही माहित नाही. बरेच दिवस अमृततुल्यात गेलो नाही ना!!)

तर मुद्दा असा, की ज्यांना हे अर्थशास्त्र समजते, ते अमर्त्य वेगळे! आम्ही आपले मर्त्य असल्याने आम्हांस साधे ग्यानबाचे अर्थशास्त्रही समजत नाही.
तर आमुच्या या अज्ञानाचा अंधकार इतुका घनगर्द असल्यामुळे झालेय काय, की सांप्रती वृत्तपत्रसृष्टीत जे काही अनर्थ सुरु आहेत त्यांचा ताळमेळच आम्हांस लागत नाही.

आता तुम्ही पुसाल, की आम्ही कोणत्या अनर्थांबद्दल बोलत आहोत?
आम्ही बोलत आहोत, खर्चकपातीबद्दल.
आम्ही बोलत आहोत, नोकरकपातीबद्दल.
आम्ही बोलत आहोत, पर्णसंख्याकपातीबद्दल.
आम्ही बोलत आहोत, वृत्तपत्रांच्या कचे-यांतून वाहत असलेल्या असुरक्षिततेच्या प्रदुषित हवेबद्दल.

एकीकडे बोरीबंदरपासून बेलापूरपर्यंतच्या समस्त वृत्तवाहिन्या व पत्रकचे-यांतून अशी गुदमर सुरु असताना, दुसरीकडे म्यानेजमेन्ट नामक अपौरुषेय व्यवस्थेचे सगळे कसे सुशेगात सुरु आहे, याचाच आम्हांस अपूर्व अचंबा वाटतो आहे.

त्याहून नवल वाटते आहे ते हे, की ही आर्थिक मंदीची आकाबाई काही नेमक्याच पत्रांमध्ये कशी काय बोवा घुसली?
कारण की चित्रपट तर असा दिसतो आहे, की लोकमत, पुढारी, देशोन्नतीसम पत्रे 'आली निवडणूक पर्वणी' असे गातगात आस्तेकदम विस्तारत चालली आहेत. त्यांस का आर्थिक मंदी माहित नाही? त्यांस का कागदाचे वाढलेले भाव ज्ञात नाहीत? त्यांच्या जाहिरातींचे कॉलम-सेंटिमीटक का बरे आकसले नाहीत?
हे झाले पत्रांचे. आता च्यानेलांचे बघा. गेलाबाजार दीड-दोनशे नवी च्यानेले म्हणे परवानगीच्या रांगेत उभी आहेत.
या पत्र व च्यानेलांमध्ये नोकर भरती सुरु असताना, अन्यांनाच का बरे ओहोटी लागली आहे?

हे असे तर नाही ना, की ज्या ठिकाणी ओहोटी लागलेली आहे, त्या ठिकाणच्या व्यवस्थेतच काही खोट होती?

आम्हांस काहीच कळेनासे झाले आहे.
आमचे म्हणणे इतकेच, की म्यानेजमेन्टल चुकांमुळे नोकर कपात सुरु असेल, तर ते शंभरवेळा चूक आहे. अशा वेळी कोणास एकदम नोकरीवरून काढून रस्त्यावर आणण्याऐवजी प्रथम ओबामासूत्र (पक्षी - वरिष्ठांच्या खादाडीत कपात) अवलंबिले तर ते योग्य ठरेल.
अर्थात जर कोणी मंदीची संधीच साधून कर्मचा-यांस कमी करीत असेल, तर मग त्यांस आपल्यासारखे अन्यायाविरोधात लढणारे, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सदा संघर्षरत असणारे निर्भिड पत्रकार तरी काय करणार म्हणा!

वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
आधीच आम्ही कबूल केले आहे, की आम्हांस अर्थशास्त्रात शून्य गती आहे.
तेव्हा आमचे उपरोक्त विचार योग्य आहेत की अयोग्य, हे आता तुम्हीच सांगायचे आहे.
(वैधानिक इशारा - क्रिपया लिखते समय अपनी नोकरीं का खयाल करें.)

(Posted by बापू आत्रंगे, दि. ४ मार्च २००९)

This entry was posted on 4.3.09 at 13:30 . You can follow any responses to this entry through the comments feed .

11 comments

Bundlebaaj  

Dear Baapu, very very bundle item.

Baapu tumhi aataa Blog lihine sodun dyaa aaNi TaaL kuTat basaa.

March 4, 2009 3:40 PM
sawai bandalbaaj  

कोण रे हा बंडलबाज.
त्याचं बंडल दै. मुंबई चौफेरमध्ये पार्सल करा. तो त्याच लायकीचा दिसतोय.

March 4, 2009 6:34 PM
Anonymous  

बापू रिअल नावाची नवी वाहिनी दाखल झाली आहे.

March 4, 2009 7:18 PM
बन्डलबाज  

सवाई बन्डलबाज, तुमचे बन्डल आपला वार्ताहर'च्या पार्सलमध्ये गुन्डालायचे काय? तुमची लायकी तीच दिसतेय....!

March 4, 2009 9:30 PM
बन्डलबाज  

सवाई बन्डलबाज, तुमचे बन्डल आपला वार्ताहर'च्या पार्सलमध्ये गुन्डालायचे काय? तुमची लायकी तीच दिसतेय....!

March 4, 2009 9:30 PM
खबरीलाल  

हे खरे पत्रकार, उखाळ्यापाखाळ्या भर चव्हाट्यावर काढण्याच्या धर्माला जागून काम सुरू आहे.

March 4, 2009 11:24 PM

लेख नाय आवडला तं नाय आवडला.
त्याच्यावरून भांडायचं काय म्हून?
माझ्या बंडलबाज मित्रांनो,
आपण अधिक गंभीर गोष्टींवरून वादेवादे तत्वबोध: करू यात ना...
कसें?
- बापू

March 4, 2009 11:39 PM

आम्ही बोलत आहोत, वृत्तपत्रांच्या कचे-यांतून वाहत असलेल्या असुरक्षिततेच्या प्रदुषित हवेबद्दल.
एकीकडे बोरीबंदरपासून बेलापूरपर्यंतच्या समस्त वृत्तवाहिन्या व पत्रकचे-यांतून अशी गुदमर सुरु असताना, दुसरीकडे म्यानेजमेन्ट नामक अपौरुषेय व्यवस्थेचे सगळे कसे सुशेगात सुरु आहे
त्यांस आपल्यासारखे अन्यायाविरोधात लढणारे, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सदा संघर्षरत असणारे निर्भिड पत्रकार तरी काय करणार म्हणा!
(वैधानिक इशारा - क्रिपया लिखते समय अपनी नोकरीं का खयाल करें.)

आत्रंगे साहेब जे काही लिहिला हे सारा मजकूर तुम्ही नुस्ता ब्लाग मध्येच चालतय दुसरे इतर कुठे ही नाही,पत्रकार असो कुपत्रकार असो पण तुमचा इशारा सगळ्यांना नक्कीच समझतय...
एकदम पेट्रोल लिखा है बाप...अंगार है अंगार... एक कटिंग पर खबर लिखने वाले आपकी बात को नहीं समझॆंगे....
जय जय भड़ास

March 5, 2009 9:29 AM
sudharak  

bapu chhan!
arthshastrat gati nahi mhanta, pan `arth` lawanyachya shastrat pra`gati` aahech tumchi! lage raho!

March 5, 2009 6:14 PM

Bapu,

Management isn't exactly su-shegat. My friends in a pink daily tell me that management kids are disappearing faster than scribes.

March 6, 2009 8:21 PM
Anonymous  

Apan Sakaalbaddal bolat asal tar he sarva khare ahe. Abhijeet pawarana ata officela yayala vel nahi and Khire sarakhya peshvayani ata sutra ghetalayay kay honar. Yaa naukarni ayshyat yek tari product, department changala chalvun ghetalay ka? He ashech honar.

March 9, 2009 12:42 PM

Post a Comment