मित्र हो,

तुमच्याशी आज जरा वेगळ्या विषयावर, वेगळे असे काही बोलायचे ठरवून आलो आहे.

आमचे मन विषण्णतेने भरून गेलेले आहे.
परवा सारेगमप या सांगितिक कार्यक्रमाची अंतिम फेरी झाली. आणि त्यानंतर महाराष्ट्रात जे काही झाले, जे काही होत आहे ते सर्व पाहून संताप होत आहे.

या कार्यक्रमानंतर आयोजकांची पत्रकार परिषदेत झाली. तेथून या बेसूर आणि भेसूरपणाला सुरुवात झाली. त्यात काही पत्रकारांनी जे तमाशे केले ते अत्यंत लाजिरवाणे होते.
आपण पत्रकार आहोत म्हणजे आपण काही खास आहोत, कोणालाही काहीही विचारण्याचा, कोणाचाही अपमान करण्याचा परवाना आपल्याकडे आहे, असा अनेकांचा समज असतो. त्याचेच गलिच्छ दर्शन या पत्रपरिषदेत झाले, असे तेथे उपस्थित असलेल्या काही पत्रकारांकडूनच आम्हांस समजले. साधे मॅनर्सही पत्रकारांना पाळता येत नसतील, तर त्यास काय म्हणावे?
त्या पत्रपरिषदेतील घटनांवर आमच्या एका मालवणी पत्रकारमित्राने केलेले झणझणीत भाष्य (सारेगमपच्या प्रेसकॉन्फरशीच्या गजाली) 'सहयोगी बातमीदार'मध्ये प्रसिद्ध केले आहे. मालवणी विनोदाआडून त्याने व्यक्त केलेली खंत आपण लक्षात घ्यावी.

महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मनाची स्पंदने समजण्याची ताकद ज्यांच्यात आहे अशा काही वृत्तपत्रांनी या कार्यक्रमावर अग्रलेख लिहिले. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र टाइम्स, प्रहार, लोकमत, तरुण भारत यांची नावे घ्यावी लागतील. (या अग्रलेखांच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.) लोकसत्तेने तर यापूर्वीच यावर अग्रलेख लिहिला होता. सकाळने मात्र या कार्यक्रमावर अग्रलेख लिहिला नाही. त्यांच्या न-धोरणात ते बसत नसावे! अर्थात सकाळने कोणत्या विषयावर अग्रलेख लिहावेत हा त्यांचा प्रश्न आहे, हे मान्य करूनही सकाळचे हे मौन खटकणारे होते!

मात्र आम्हांस सर्वात जास्त दुःख होत आहे ते याचेच, की या कार्यक्रमाच्या निकालावरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी (त्यातही पुण्यात जरा जास्तच) ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वाद निर्माण झाला आहे. आणि त्यात भर घालणा-या बातम्या आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

एका सूरमयी कार्यक्रमाची एवढी भेसूर भैरवी कोणी पाहिली नसेल, ऐकली नसेल!

(Posted by बापू आत्रंगे, दि. ११ फेब्रु. २००९)

सारेगमविषयीचे अग्रलेख :
मन सुद्धं तुझं... (मटा)
हे सुरांनो चंद्र व्हा! (लोकमत)
'सारेगमप'चे 'धनी' (प्रहार)
कार्तिकीदेवींचा विजय असो (तरूण भारत)

सारेगमपविषयीच्या ब्लॉगपोस्ट्स :
सारेगमपमधील सूर आणि बेसूर - नीलेश बने (मटा ब्लॉग)
लिटिल चॅम्प्सच्या जातीवरून खाल्ली माती! - प्रशांत जाधव (मटा ब्लॉग)
त्यांचा इमोशनल जयजयकार - रवि आमले (मुंबई मेट्रो, सकाळ)

This entry was posted on 5.2.09 at 15:23 . You can follow any responses to this entry through the comments feed .

3 comments

भंकस  

मित्रानू असाच एक किस्सा काल सोलापुरात घडला असा. तिथ तो राजकारणातील जाणीमानी हास्ती रा. रा. शरद पवार समोर होते, आधीच राजकारणी त्यात आता क्रिकेटची बॅकग्राऊंड त्यामुळे ते सिक्सर मारणारच असा हे माहित असूनही पत्रकारांनी आडवं तिडवं का घुसावं मनतो मी.
तिथे काय झाले, त्यांच्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाचा विषय झाला. त्यात एका पत्रकारानू प्रश्न इचारलासा की असं म्हणतात शरद पवार जे बोलतात ते करीत नाहीत, आणि जे करतात ते बोलत नाहीत, हे खरं आहे का. ह्यो प्रश्न कानाक पडताड पवार साहेब जे भडकले म्हणता. त्यांची त्या पत्रकारीची विकेटच घेतली. म्हणले कसे, एखाद्या नेत्याचा इन्सल्ट करायचे तुमी ठरविले आहे का. तुम्हा कोणत्या वाहिनेचे, तुमचे वय काय? गेल्या पन्नास वषार्ंपासून मी राजकारणात आहे,.... जे सुरू झाले पवार साहेब ते थांबच ना. ज्येष्ट पत्रकार मधी पडले, माफी मागितली पण ते थांबेचा तब्बल पाच-सात मिनिचे ते चिडलेले होते. त्यांचा तोलालबुंद चेहरा पाहून त्या पत्रकारीची अशी पंचाईत झाली म्ङणता. त मी काय सांगतो बाबूनू पवार साहेब कधी नाय तेवढे चिडले होते.

भंकस

February 11, 2009 12:00 PM
Anonymous  

बापू तुम्ही एवढी चिडचिड का करताय? पत्रकारांचा आपणच शहाणे हा समज काही नवा नाहीये, सो जस्ट बी कूल!!! आणि आपण काहीही करू शकतो रादर ज्याला हात लावू त्याचे सोने करू हा जो मस्तवालपणा झी वाहिनी करतेय, त्याचं रिफ्लेक्शन त्या पत्रकार परिषदेत झालं. प्रत्येक गोष्टीचं एक मूळ कारण असतं तसं या सगळ्याच्या मागे हे कारण होतं. बाय द वे, काही पत्रकार म्हणे आपल्या कुटुंबासह कार्यक्रमाला आले होते. असे सहकुटुंब ते अन्य कोणत्या सामाजिक कार्यासाठी जातात का?

February 11, 2009 3:53 PM
Anonymous  

Patrakar kadhitari swathachya kutumbasathi vel detat, tyamule kunachya potat dukhayla lagley ?

February 12, 2009 2:43 PM

Post a Comment