ऑस्करच्या लहानग्या बाहुलीची कित्ती मोठी सावली पडलीये...!!
अहाहा! आम्ही बेहद्द व बेसुमार खुश आहोत!
स्लमडॉगला आठ ऑस्कर पुरस्कार!
ही घटना कायमची आठ-वणीत राहील...
आपल्या आणि च्यानेलवाल्यांच्याही!!

आता आम्ही वाट पाहतोय उद्याच्या वृत्तपत्रांची.
म्हणजे असे, की स्लमडॉग मिलेनियरला आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले ही बातमी तर आज समस्तांस समजली. वाहिन्यांनी तर आता फक्त धारावीतले नाले तेवढे उपसायचे बाकी ठेवले आहेत! अशा परिस्थितीत वृत्तपत्रे देणार ते काय देणार? सांगणार ते काय सांगणार? छापणार ते काय छापणार? येथे खरा कस लागणार आहे मुद्रित माध्यमांचा.

उद्या आपणांस वाचावयास मिळतील का खास लेख स्लमडॉगच्या यशाचे रहस्य सांगणारे?
उद्या आपणांस कोणी सांगेल का रेहमानच्या त्या संगीतात अशी कोणती जादू होती?
उद्या कोणी उलगडून दाखविल का डॅनी बॉयलच्या दिग्दर्शनाचा अर्थ?
उद्या कोणी सांगेल का मूळ कादंबरी आणि तिच्यावरून रचलेल्या पटकथेतील नेमके नाते?

की आठ कॉलमी आकर्षक मथळ्यांच्या वेस्टनात गुंडाळली जाईल शिळ्याच बातमीची मिठाई?
पण उद्याचे उद्या!

आज आम्ही खूपखूप आनंदात आहोत.

किती तरी दिवस झाले नवी चप्पल घ्यायची म्हणतोय.
लोकलच्या पाससाठी पैसे काढून ठेवले पाहिजेत.
सोसायटीच्या मेन्टेनन्सचे पैसे थकलेत, ते भरा म्हणतोय चेअरमन.
पण आज त्याचे काही नाही.

आज आम्ही बेहद्द आणि बेसुमार आनंदात आहोत!!

This entry was posted on 23.2.09 at 10:42 . You can follow any responses to this entry through the comments feed .

14 comments

My sentiments, Bapu.

February 23, 2009 12:09 PM
भंकस  

बापू आता हे अति झाले अन.. आतापर्यत तुम्ही छापून काय आले त्या बद्दल बोलत होता. (लिहित) आता मात्र काय छापावे याबद्दलही आघीच अपेक्षा करू लागलात.. हे बरे नाही. अशा हिंटस देऊ नका., आधीच आपली गळेकापू स्पर्धा, त्यात चॅनलवाल्यांचा धुमाकूळ आणि तुम जर असे विषय फोडू लागलात तर कसे व्हायचे.... तुम्हाला आनंद झाला असेल हो, पण तो उद्या सकाळी पेपर वाचेपर्यत टिकावा अशी अपेक्षा कशी करता राव उगीच अपेक्षाभंग व्हायचा... असो.
भंकस

February 23, 2009 4:14 PM
chakaramani  

जय हो! बापू, `धारावीतील गटार उपसण्याची' कल्पना एकदमच झक्कास. पण
उद्या पेपरावाल्यांचा वान्दाच आहे हे एकदम मान्य. पण त्यावरही उपाय आहेच. परदेशातील `टाइम्स'ची साईट उघडावी त्यावर ओस्कराचा हवा तेवढा मजकूर आहे. नाहीतर उद्याचे आठ कालमी मथला ठरलेला...``जय हो!'...आणि रहमानाचा फोटो.

February 23, 2009 4:52 PM
Paperwaala  

Bapu,
Aaj challenge dilech ahet tar udyaa sagale paper paha ani tumachyaa apeksha koni purn kelya ka, hey hee tapasheelaane liha. Amhi challenge ghetale ahe ani udyaachyaa post-mortem chi vaat pahaat aahot.

February 23, 2009 8:16 PM
Anonymous  

Aurngabadhun alela matter amhi uchalal ani pan lavle.... ugach dokayla tap nako...

February 23, 2009 8:23 PM
Anonymous  

अन् आम्ही की नाही पुण्यातला म्याटर. त्यात स्लम़डॉगऐवजी बेंजामिन बटनला पारितोषिक लिहिलं असेल, तरी आम्ही कायसुदीक बदल न करता लावू. (पुण्यातल्या टीव्हीत असं दिसू शकतं.)

पाने वेळेत गेली पाहिजेत. नाहीतर सकाळी वेळेत अंक जाणार नाही. वाचकांना अंकाला आँस्कर मिळाले नाही वाटते, असा प्रश्न पडेल.


आमचे आँस्कर मनजे गावातले वाचक, तेन्ला काय कलतीया बटन की फटन

आम्ही लव्ह गुरूला पन आँस्कर देवू. गावातले मनतील वा, लव्ह गुरूला आँस्कर मिलले.


आम्ही पायजेल तेला आँस्कर देवू.


आम्ही हवे तल तारेलापण आँस्करमंदी दाखवू.

आनी चकदेला बेस्ट फिल्म म्हनू.

कोनाला कायपण कलनाल नाय.

-

मोच्या तोतरे

February 23, 2009 11:53 PM
Anonymous  

Visit this blog for coment


http://marathiblogchablog.blogspot.com/

February 24, 2009 12:14 PM
Anonymous  

Well, have you noticed, none of the pune marathi newspapers (sakal, maharashtra times, kesari, prabhat and samama) today has written the word "millionaire" correctly, except lokmat & agro won. please check, 'm not able to type all those interesting pronunciations here, still it is disgusting...

February 24, 2009 2:14 PM
Anonymous  

bapu, tumhala gelya postmadhe eka marathi papermadhli vait ghatana sangitali hoti, matra tyachi konihi dakhal ghetli nahi. Aaj aapna sarva supat aslo tari kadhitari jatyat janar ahotch. teva hasi majak barobar asha goshtichahi vichar vhava.

February 25, 2009 12:19 PM
एक मित्र  

शेवटच्या अनामिक मित्रा, मागील पोस्टमधील तुमची काॅमेट वाचली होती. तुम्ही म्हणता तशी घटना वाईट आहेच. पण त्याचा नेमका संदर्भ लागत नाही. कोणत्या पेपरमधील आहे, त्याचाही उलगडा होत नाही. घटना तशीच असेल तर मग आपल्या पत्रकार संघटनांनी त्यात लक्ष घातले पाहिजे. एकट्या बापूने ब्लाॅगवर लिहू असे प्रश्न सुटणार नाहीत. शक्य झाल्यास आणखी काही हिंट देण्याचा प्रयत्न करा. आपण शोघ घेऊ. किमान अशा गोष्टींची चर्चा होते आहे, हे कळाले तरी असे प्रकार कमी होऊ शकतील..
एक मित्र

February 25, 2009 2:33 PM

Bapu,

Be careful ,Bapu, you must have read supreme court's rulling about blogs

February 26, 2009 10:26 PM
Anonymous  

harekrushna kay ahe te rulling.. saglaycha mahiti sathi dya ki batmidarvar takun...

February 28, 2009 11:06 AM
Anonymous  

बापू, कुठे आहात? ऑस्करचा आनंद अजून संपला नाही का ?

February 28, 2009 8:44 PM

B§§MZg§§ do~§V H$b§A§E r__ §§C§~r__ C§§h§X__ §§r_U

March 22, 2009 7:43 PM

Post a Comment