वाचनाबद्दल आमच्या काही ठाम कल्पना आहेत.
एक म्हणजे दुर्मिळ ग्रंथमहर्षि डॉ. अरूण टिकेकर व आम्ही असे मानतो, की वाचाल तर वाचाल!
म्हणजे कसे, तर समजा तुम्ही रस्त्याने चालला आहात व पुढे खड्डा आहे, हा फलक तुम्ही वाचला नाही, तर तुम्ही त्या खड्ड्यात पडाल की नाही? मग?... कित्ती बले सोप्पे!!... वाच्याल तल वाच्याल!
(सूचना - उपरोक्त अभिजात विनोदाचा कॉपीराईट आमचा आहे. कोणीही हास्यरंगमध्ये तो छापून विनोदाचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावू नये!)
दुसरी बाब म्हणजे आपण जे काही वाचू त्यातून आपणांस काही तरी मिळालेच पाहिजे.
याचा दुसरा अर्थ असा, की ज्यातून काहीही, म्हणजे उदाहरणार्थ पुस्तक परिक्षणाचे नगद १५० (अक्षरी दीडशे फक्त) रुपये मिळणार नाहीत, ते वाचू नये! अर्थात हेच (दीडशाचे) तत्त्व बहुत उपसंपादक पाळतच असल्याने यात नवीन असे काही नाही!
परंतु मनुष्यप्राण्याने प्रत्येक गोष्टीत अशी भौतिक फळाची अपेक्षा का बरे धरावी? उलटपक्षी कोणत्याही अपेक्षा न धरता आपण सर्वांनी वाचनकार्य केले पाहिजे. श्रीमद्भगवद्गीतेत प्रत्यक्ष भगवंतानेच उपदेशिले आहे, की कर्मण्येवाधिकारस्ते....
अगबाईअरेच्चा! आमची भाषा अशी अध्यात्मिक अंगाने का चाललीय?....
हां. हा आमच्या हिचा चावटपणा! समोर दूरचित्रवाणीसंचावर मराठीतला आस्था जो की साम मराठी च्यानेल, तो लावून ठेवलाय. त्यावर नेहमीच पपू श्री बालाजी तांबे यांचा गीता गाता चल वा तत्सम कार्यक्रम सुरु असतो, म्हटल्यावर कोणासही वाण वा गुण लागणारच!... जसा की तो रा. रा. संजीवकुमार लाटकर (पक्षी - वाहिनीप्रमुख, साम) यांस लागला आहे! हल्ली त्यांच्यात कशी स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे दिसतात नाही! सुखदुःखे समैकृत्वा की असेच काहीतरी!! अस्तु.
तर मुद्दा असा, की आम्ही अनेकदा कोणतीही अपेक्षा (म्हणजे उदाहरणार्थ वाचनाने झोप यावी वगैरे) न धरता वाचन करतो. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आम्ही पत्रकारांनी लिहिलेली पुस्तकेही वाचतो. (आम्हांस आम्लपित्ताचा जबरी त्रास! तरीही आम्ही हे धाडस करतो यावरून तुम्हांस आमच्या वाचननिष्ठेची पावती मिळेल!) तर परवाच आम्ही एका पत्रकार-लेखकाचे, तेही पुणेरी लेखकाचे पुस्तक वाचले. (संजय आवटेंचे नव्हे! त्यांचे ओबामांवरील पुस्तक हे भल्तेच विक्रमी आहे असे ऐकतो. ते वाचून अनेकांचे 'बराकी'करण झाल्याची अफवा आहे. फार कशाला, ते वाचून खुद्द लेखकासही आपण निवडणुकीला उभे राहून हे विश्व सुंदर करावे, असे वाटू लागले आहे म्हणतात!)
नमनालाचा एवढे शब्द जाळल्यानंतर आता सांगूनच टाकतो, की आम्ही नुकतेच रा. रा. श्री. ज. जोशी यांचे पुणेरी हे पुस्तक वाचले. पुस्तकातील प्रकर्णे मोठी बहारीची व ज्ञानवर्धक होती. (अर्थात हे सांगण्याकरीत संपूर्ण पुस्तक वाचण्याचीही आवश्यकता नाही. नुसत्या अनुक्रमणिकेवरूनच ते कळते. अनुक्रमणिकेत आमच्या पिढीचे कामजीवन असे एका प्रकरणाचे नाव आहे!) या पुस्तकातील दैनिक काळमधील दिवस हा धडा वाचून तर आम्हांस भारीच मौज वाटली. त्यात किनई एकेठिकाणी जोशीबुवांनी रा. रा. शिवरामपंत करंदीकर या संपादकांचा एक कमालएकिस्सा सांगितला आहे. हे रा. रा. करंदीकर म्हणजे त्रिकाळ दैनिकाचे मालक-संपादक. ते पूर्वी मास्तर होते. (म्हणजे बघा, पूर्वी शाळामास्तर सुद्धा दैनिक काढू शकत असत! आता दैनिक काढायचे म्हटले, तर केवढी शाळा करावी लागते! हाती मंत्रिपद नसेल, तर दैनिक चालविणेही कठीण, असा समय पातला आहे हल्ली! नारायणरावांच्या हे बरोब्बर लक्षात आले म्हणतात! अस्तु.) रा. रा. करंदीकर हे पूर्वीचे मास्तर. त्यामुळे ते चाटे नव्हते, तर चांगलेच ध्येयवादी वगैरे व इत्यादी होते. एवढे ध्येयवादी, एवढे पत्रधार्मिक, एवढे काटेकोर की 'एका अग्रलेखात शुद्धलेखनाच्या दहापंधरा चुका आढळल्यानंतर, त्यांनी तोच अग्रलेख दुरुस्त स्वरुपात दुस-या दिवशी पुन्हा छापला होता व वाचकांची माफी मागितली होती.'
हे वाचल्यानंतर तर आम्ही खीखीखी करून लोटपोटच हसलो!
(व मग आम्हांलाच आमचे दात दिसले!)
मनीं आले, हे एडिटरबाबा आताच्या काळात असते, तर काय झाले असते?
त्यांना रोज कालचा अंक पुन्हा छापावा लागला असता!!
नाही, असे नाही.
ते मटामध्ये असते, तर त्यांना कॉस्ट कटिंगचे कारण देऊन घरीच पाठविण्यात आले असते!
सकाळमध्ये असते, तर माणूस मोठा पत्रकार, म्हणून त्यांना सकाळ भाजीपाला समितीचे काम देऊन कचेरीतच 'बसविले' असते!
लोकसत्तेत असते, तर त्यांना वास्तुरंगच्या पडक्या पुरवणीत टाकले असते!
(खरे तर आज ते लोकसत्तेत असते, तर त्यांना काहीच करावे लागले नसते! कारण की आजकाल लोकसत्तेत जाहिराती येवढ्या पान-गळ्यापर्यंत येताहेत, की 'कंपनी मस्ट' बातम्या जाण्याचीही मारामार! तेथे कोठे शुद्ध शोधणार आणि कोठे लेखन शोधणार!!)
लोकमतमध्ये असते, तर...
छे! ते लोकमतमध्ये असूच शकले नसते! (हवे तर महावीरभाईंना विचारा!)
एकूणच आजकाल अशा करंदीकरमहाराजांना पत्रसृष्टीत स्थान व ठिकाण नाही!
शुद्धलेखनाचे सोडा, ते हल्ली सत्वशीला सामंतबाई, यास्मीन शेखबाई व अरुण फडकेबाबा यांशिवाय (आम्हांसकट) कोणास येते?
परंतु साधी, सरळ मराठी भाषा. तिचे काय?
आंग्ल दैनिकांत रिडर्स एडिटर असा प्रकार असतो.
हिंदुस्तान टाइम्ससारखे दैनिक अल्प व स्वल्पविरामाच्या चुकाही दुस-या दिवशी दुरुस्त करून, वर वाचकांस क्षमस्व म्हणते.
आणि आम्ही मराठी?
जाऊ देत झाले.
ते पुस्तक वाचले हीच चूक झाली.
(Posted by बापू आत्रंगे, दि. २० फेब्रु. २००९)
19 comments
vachaal tar vaachaal yaa uktichaa tikekaranshi kaahihi sambandh naahi to aahe madharao gadkari yanchyashi
Bapu, amerikela gelelye patrkaranchi jara khabar kadha. tikde mhane wadmayeen (wangmayeen)je kahi zale te ikde kahich kalale nahi.manoranjanache vruttant chhaan aale.
बापूराव, आयला तुमची पण कमालच आहे की राव! तुम्ही लिहीत असलेल्या `वस्त्रहरणा'चा मी पहिल्या दिवसापासून वाचक आहे. पण तुम्ही तर सकाळ, साम, लाटकर, लोकसत्ता,केतकर,टिकेकर यन्च्यवरच आसूद ओढताय. आता फ़क्त कम्बरेचे काढायचे शिल्लक ठेवलेत. बापू, आता ज़रा टार्गेट बदला बघू.
sadharan 10 varshanpurviche pustak aata vachnyache karan kalel? mhanje aamasni pan vachta yeil.
Bapu, kunakde lakshaa devu naka. june chngle vachlele navyane sangitle mhanun kahi bighdat nahi. Prashna evdhach ahe ki aple patrakar bandhav news paper chya palikadche kahi vachat nahit..karan ya dhandyat yetana tyani aiklele aste, vachal tar maraal.
बापू, पत्रकारांची पुस्तके असावी, पण ती नवीन विषयांवरील असावी, नवीन विषयांवरील म्हणजे अप्रकाशित हो. कारण आजकाल पेपरमध्ये वृत्त मालिका छापायची अन परत त्याचे पुस्तक छापायचे, असा प्रकार सुरू आहे. एकदा पेपरमध्ये वाचून कंटाळा आला तरी पुन्हा पुस्तक म्हणून ते साहित्य का वाचावे बरे... काही पेपरमध्ये तर अशी पुस्तके छापण्यासाठीच सदरे चालविली जातात. अन सबधित पेपरच त्यांना पुस्तके छापून देतात. पहाता पहाता एका पत्रकाराचा लेखक होतो हो... त्यामुळे पत्रकारांमध्ये पुस्तके वाचण्यापेक्षा पुस्तके छापण्याची (काढण्याची शब्द चांगला वाटत नाही) स्पर्धा लागली तर नवल वाटू नये.
इशाऱा ः रा. रा. बापू यांनीही आपल्या आतापयर्ंतच्या बातमीदारीचे (बातमीदारावरील लेखांचे) पुस्तक काढण्याचा विचार करू नये.
भंकस
बापू, गंभीर विषयाकडे लक्ष वेधतो. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका जुन्या दैनिकातील ज्येष्ठ पत्रकाराने राजीनामा दिल्यानंतर त्याचा निरोप समारंभ मालकाने होऊ दिला नाही. कहर म्हणजे या समारंभासाठी आलेल्या या पत्रकाराला बखोटे धरून कार्यालयाबाहेर काढले. सर्व पत्रकारांनी या विषयावर बोलायलाच हवे.
Please be specific.
At least tell us the name of that newspaper.
हेहेहे बापू.
मराठी भाषेची एवढी उठाठेव तुम्ही करायचे काही कारण नाही.
तुम्हाला काय वाटते की मराठी अशी मरणार आहे?
वर्तमानपत्रांत तेवढासुद्धा दम नाही हो आजकाल... हेहेहे.
गंभीरपणे सांगायचे, तर आजकाल पेपरांतील मराठी भाषा हा एक वेगळाच नमुना असतो. त्याबद्दल अधिक वाचावयाचे असल्यास तुम्ही जयदेवजी डोळे यांचे समाचार हे पुस्तक वाचा.
बापू तुम्हांला आणि सगळ्यांनाच मी आवर्जून विनंती करतो, की तुम्ही समाचार हे पुस्तक वाचाच. बापू बातमीदारमधून तुम्ही जे काम करीत आहात, तसेच काम डोळे सर कित्येक वर्षांपासून करीत आहेत.
फक्त तुम्ही टपल्या व चिमटे मारत, शालजोडीतील देत हे काम करीत आहात. डोळेसर या सगळ्याकडे अतिशय गांभिर्याने पाहात आहेत. मला वाटते, हेच गांभीर्य आज हवे आहे. विनोदाने काहीही होत नाही. येथून पुढे तुमच्या लिखाणाला गंभीर वळण यावे अशी अपेकशा करतो.
तुमचा वाचक - एस. पाटील
एस पाटील की आणखी कुणी पाटील (बहुतेक डोळे पाटील)
अगदी झक्कास ओळींमध्ये जयदेव डोळे यांच्या पुस्तकाचे परीक्षण आणि प्रचार केलात. तुम्ही सकाळमधलेच असणार नक्की.तेथे पुस्तकाचे परीक्षण हे एखाद्या बातमीच्या इन्ट्रोएवढेदेखील असू शकते. तेव्हा तुमचा त्यात हात बसलेलाच असणार.
पुस्तके वाचून पत्रकारिता येत नसते पाटील मामा. त्यासाठी पत्रकारांनी स्वतःचे डोळे उघडे ठेवावे लागतात. शिवाय डोळे (दृष्टी किंवा सोप्या मराठीत व्हीजन या अर्थानं म्हणतोय) असावे लागतात.
तेव्हा ज्यांच्याकडे नाहीत असे डोळे त्यांनी वाचावे जयदेव डोळे
असं स्पष्ट म्हटलं असतंत तरी चाललं असतं की डोळे (पाटील)
बातमीदाराच्या बाल वाचकांनो. बातमीदारी नावाचे एक शॉलीट पुस्तक आले आहे. ते वाचा असं मी अजिबात म्हणणार नाही. फक्त येवढेच सांगीन
की, सोते समय अपनी आंखोमे जीवदया नेत्रप्रभा डालना न भुले.
ये आपकी आखे स्वच्छ आँर दृष्टी (व्हिजन)अच्छी रखता है.
आपका खोया हुवा साथी
- टोच्या बोबडे
एस पाटील की आणखी कुणी पाटील (बहुतेक डोळे पाटील)
अगदी झक्कास ओळींमध्ये जयदेव डोळे यांच्या पुस्तकाचे परीक्षण आणि प्रचार केलात. तुम्ही सकाळमधलेच असणार नक्की.तेथे पुस्तकाचे परीक्षण हे एखाद्या बातमीच्या इन्ट्रोएवढेदेखील असू शकते. तेव्हा तुमचा त्यात हात बसलेलाच असणार.
पुस्तके वाचून पत्रकारिता येत नसते पाटील मामा. त्यासाठी पत्रकारांनी स्वतःचे डोळे उघडे ठेवावे लागतात. शिवाय डोळे (दृष्टी किंवा सोप्या मराठीत व्हीजन या अर्थानं म्हणतोय) असावे लागतात.
तेव्हा ज्यांच्याकडे नाहीत असे डोळे त्यांनी वाचावे जयदेव डोळे
असं स्पष्ट म्हटलं असतंत तरी चाललं असतं की डोळे (पाटील)
बातमीदाराच्या बाल वाचकांनो. बातमीदारी नावाचे एक शॉलीट पुस्तक आले आहे. ते वाचा असं मी अजिबात म्हणणार नाही. फक्त येवढेच सांगीन
की, सोते समय अपनी आंखोमे जीवदया नेत्रप्रभा डालना न भुले.
ये आपकी आखे स्वच्छ आँर दृष्टी (व्हिजन)अच्छी रखता है.
आपका खोया हुवा साथी
- टोच्या बोबडे
मित्र हो, पुस्तक या विषयावरील चर्चा आता पण थांबवू कारण., आयबीएन मिखील हा विषय घेण्याची शक्यता आहे. एकदा का त्यांच्या हाती ह विषय गेला की, अवघ्या महाराष्ट्राच काैल घेतला जाईल. किती टक्के लोक पुस्तक वाचतात, कसे वाचतात, कोठे वाचतात, वाचल्यावर काय करतात, असल्या अनेक प्रश्नांचा अखिल भारतीय सर्वे होईल. स्वतः मिखल सरसह अनेक तज्ज्ञ मंडळी एकत्र येतील त्यावर नोठा खल होईल. त्यातून अनेक निष्कर्ष काढले जातील, त्यावर अधारित परिक्षणे येतील, मग त्याचेही पुस्तक छापले जाईल आणि पुन्हा................. अरे आपण वृत्तपत्र चालवितो की पुस्तकांचा छापखाना? ते काही नाही. आताच्या आता ही चर्चा येथ थांबवा.. अन्यथा एका मोठ्या गोंधळाला बापूंसह सर्वजण जबाबदार राहतील., याची नोंद घ्यावी. (कृपया या विषयावर कोणी पुस्तक लिहू नये. लिहिल्यास आम्ही जबादार नाही.)
झाडबुके
वृत्तपत्रातील शुद्धलेखनाच्या चुकांबद्दल बोलायचे झाल्यास हा प्रकार आता नवा नाही. जसजसे तंत्रज्ञान वाढत आहे, तसा कामाचा वेग आणि चुकाही वाढत आहेत.
बातमी देणारा बातमीदार किंव वार्ताहर, संपादन करणारे उपसंपादक ते संपादक या मंडळींना स्वतः चे स्थान आहे. पण मुद्रितशोधन करणाऱयांचे स्थान काय? तो घटक जरा उपेक्षित राहिला आहे. अनेक पेपरमध्ये मुद्रितशोधकांना आपल्या कामाची आणि पदाची लाज वाटते. त्यामुळे ते स्वतःचे पद कधीच सांगत नाहीत. पुण्यात असेच एक मोठे झालेले मुद्रितशोधक आहेत, पण ते स्वतःला पत्रकार म्हणून घेतात. विशेष म्हणजे त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत, माझे असे मत आहे की, जोपयर्ंत या पदाला प्रतिष्ठा व महत्त्व मिळणार नाही तोपयर्ंत चुका होतच राहणार...
मुद्रितशोधकमित्र
पेपरांतला मुद्रितशोधक हा वर्ग खरे तर अतिशय महत्त्वाचा. पण तोच आज उपेक्षित आहे. महाराष्ट्र टाइम्समधून तर तो हद्दपारच झाला आहे. अर्थात महाराष्ट्र टाइम्सला मराठीचे तसेही काही प्रेम नसल्याने त्यांना काहीच फरक पडत नाही.
दुसरी एक गोष्ट म्हणजे, आजकाल मुद्रितशोधकही त्या तोलामोलाचे राहिलेले नाहीत. -हस्वदीर्घ दुरुस्त करणे म्हणजे मुद्रित शोधन नव्हे. ते त्याहून अधिक असते. पण तसे करायचे तर भाषेचा तेवढा अभ्यास हवा, पत्रकारितेची माहिती हवी. हल्ली पत्रकारांनाही पत्रकारिता येत नाही आणि काही काही संपादक अशी मराठी लिहितात, की ते वाचून खणखणीत उलटी व्हावी.
एकूण हे दुखणे खूप खोलवरचे आहे, हेच खरे. बापूंनी याला येथे तोंड फोडले ते बरे झाले.
तुमचा लेख मी प्रथमच वाचला आणि तो वास्तवदर्शी आहे, हेही जाणवले. पण एकंदरीत हा ब्लॉग वेगळाच वाटला.
ह्यात जर ब्लॉग फ़ॉलोइंगचे गॅजेट ऍड केलेत, तर हा ब्लॉग बुकमार्क करुन इतरवेळीही वाचता येईल. माझ्या या सूचनेचा आपण निश्चित विचार कराल ही आशा आहे.
कळावे.
धन्यवाद!
Dole he julmi gaDe. Rokhunee maj pahoo nakaa...!
batmidar.blogspot.com is very informative. The article is very professionally written. I enjoy reading batmidar.blogspot.com every day.
bad credit payday loans
payday loans canada
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

