आमचा एक वाचकमित्र आहे.
तो खूप आजारी आहे.
त्यास हशारोग झाला आहे.
तो सारखा हासत असतो.
तो कशालाही हासत असतो.
उदाहरणार्थ
परवा त्यास म्हणालो, रा. रा. कुमार केतकर हे त्रिकालवेधी पत्रकार आहेत. त्यांनी त्यांच्या सदरात पपू बापूंच्या (पक्षी - अनिरुद्ध बापू) अभ्यासाचा संदर्भ दिला होता!
तर तो म्हणाला, बापूशेट, यक्दा वय झालं की मान्सं आशी बगता बगता सहिस्नु व्हत जात्यात!
व तो फिसकन् हासला!!
एकदा त्यास सांगितले, की पुढारी व लोकमत यांनी मोठी विस्तार योजना आखली आहे. पुढारी औरंगाबादेतूनही निघणार आहे. शिवाय देवगिरी तरूण भारतही सुरु होतोय औरंगाबादेतून. तर तो डोळे बारीक करुन पुटपुटला, की म्हंजी आता अनुक्रमे ईलासराव द्येसमुक आन् गोपीनाथ मुड्यांची काळजी मिटली म्हनायची! औरंगाबादच्या लोकमतनं तं ईलासरावांस्नी पार बेदकलच केलं व्हतं!!
व मग तो खीखी करून हासत राहिला!!
काल आम्ही त्यास चिडून दूरध्वनी केला. म्हणालो, हे ऐकलेत? तिकडे सान होज्यास आपले मराठी पत्रकार गेले. तर त्या विश्व साहित्य समंलेनवाल्यांनी पत्रकारितेवरचा परिसंवादच रद्द करून टाकला. तर मांडीवर थाप मारून तो म्हणाला, पत्रकारांना फुक्टात न्यायचं तं न्यायचं आनी वर पुन्हा त्यांची भाषनं ऐकून घ्यायची, हा येव्हार घाट्याचा व्हनार हे त्यास्नी बराब्बर समाजलं म्हनायचं! शिवाय याच्यातून एकूनच विश्वसाहित्यामधली म-हाटी पत्रकारितेची जागाबी आपुआपच अधोरेखीत झाली की राव!
व असे म्हणून तो हीहीही हासत बसला!!
ही तेरवाची गोष्ट. त्यास म्हटले, की मारिओ गार्सिया हे रिडिझाईनकार हिंदुस्तान टाइम्सचा लेऔट बदलणार आहेत! हिंदु आणि मिंट नंतर एचटीने सुद्धा त्यांना ऑर्डर दिली म्हटल्यावर माणूस मोठाच असणार! तर तो चावटपणे म्हणाला, मानूस मोटाच हाय त्यो! त्याशिवाय का सकाळवालं त्येच्या डिझाईनीचं दैनिक पंचकोटी श्राद्ध घालत्यात!
व तो विषादाने हः हः हः हासता झाला!!
आज सकाळी तो आम्हांस भेटला, तोच मुळी खुखुखुखु खिदळत.
म्हटले, एवढा का हासतोयस बाबा? व्हॅलन्टाईन डेने केलेली राऊतांची रोखठोक गोची का वाचलीस तू?
तर तो कसेबसे हसू रोखत मानेनेच नाही म्हणाला.
तेव्हा आम्ही त्यास म्हणालो, मग आजच्या मुंबै सकाळच्या मुखपृष्ठावरील (दि. १६ फेब्रु.) नाट्यसंमेलनाच्या बातमीचा मथळा वाचला आहेस काय? - 'सांस्कृतिक महोत्सवाची उत्स्फूर्त सांगता!' - सांगता आणि तीही उत्स्फूर्त! म्हणजे बीडकरांनी जणू कंटाळून व वैतागून नाट्यसंमेलनाचं सूप वाजवून टाकले! मराठीच्या या सविनयभंगाने तर तुस हसू येत नाहीये ना?
तर हे ऐकून तो आणखीच हासत मानेने नाही म्हणाला.
तेव्हा आम्ही पुसले, अरे सुहृदा, मग तुझ्याने का लोकसत्तेतील चंद्रशेखर कुलकर्णी यांची, 'प्राजक्तासम हळुवार पडलेल्या सप्तसुरांच्या सड्या'ची अर्थात हृदयनाथांच्या भावार्थ सरगमची मधूरमधाळ बातमी वाचणे झाले का?
तर तो म्हणाला, हॅ! त्याच्यात हासन्यासारकं काय हाये? उलट ती बातमी वाचून लोकं इन्सुलिनची इंजेक्शनं टोचून घेत्यात!
तेव्हा आम्ही कृतक्कोपाने त्यास म्हणालो, की आता तू सांगणार आहेस की नाही काय झाले ते?
तेव्हा तो हसू आवरत उत्तरता झाला, की आज कंच्याबी पेपरात प्रसिद्ध न झालेला लेख वाचूनच मला हासायला आलंया!
हे म्हणजे अतिच झाले!
आम्ही - अरे कोणता प्रसिद्ध न झालेला लेख?
तो - सादासुधा लेख नाही, आग्रलेख!
आम्ही - म्हणजे?
तो - गेले दोन-तीन दिवस आम्ही वाट पाहून राह्यलोय एका आग्रलेखाची... पर कोनी काय लिहितच नाही म्हनल्यावर सारखं हासूच येऊन राह्यलंय...
आम्ही - अरे, पण कोणत्या विषयावर तुस अग्रलेख अपेक्षित होता?
त्यावर तो टवाळ म्हणाला, ते आम्ही सांगितलं, तं तुमच्या निर्भिड बान्याची इज्जत काय राहिल वो पेपरवाले? तव्हा ते काय आमी सांगू नये आनी तुम्ही आम्हाला इचारू नये....
व असे म्हणून तो चांडाळ चक्क हॉहॉहॉ हसत निघून गेला!
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष आणि अन्य हो,
तेव्हापासून आम्ही आमचे दोन्ही मेंदू शिणवतोय, की असा कोणता अग्रलेख आमच्या त्या वाचकमित्रास अपेक्षित असेल?
रा. रा. आनंद यादवांचा तुकाराम इंद्रायनीत बुडविण्यात आला. त्यावर वृत्तपत्रांनी ठोस भूमिका घ्यायला हवी होती, असे तर त्यास वाटत नसेल? एक महाराष्ट्र टाइम्स सोडला, तर त्यावर अद्याप कोणीही लिहिलेले नाही. पण आमच्या त्या मित्राला हे कोण सांगणार, की बाबा रे, निवडणूक तोंडावर आलेली आहे. अशात अशा विषयाला हात घातला आणि मालक दुखावला तर? कोण घेणार बरे ती रिस्क?
जाऊ दे! आमच्या मित्रास हवे तितके हासू दे...
नाही तरी त्याला हशारोग झालेलाच आहे!
(Posted by बापू आत्रंगे, दि. १६ फेब्रु. २००९)
9 comments
हाहाहाहीहीहीहोहोहो
बोरुबहाद्दरांच्या शौर्याचे चांगलेच वाभाडे काढले हो...
मटावाले तेवढे सरस ठरले हो...
हाहाहा
हीहीही
होहोहो...
हो.
kya baat hai! here's addition
aurangabadi Khabre:
1.aurangabad media madhye chaitanya. patrakaransathi bhavan jhale.(Lokmat bhavan nahi).
2.ya bhavnache geet purane,bjp ne navyane gayle.
3.Gopinathrao Munde yanni he patrakar bhavan dattak ghetle (punha deogiri tarun bharatcha nava tap honar to veglach)
4....Chala tarun bharat mule bjp cya zadala ''phale''lagnar.
Kadak. Back in form, Bapu.
Bapu,
Konatyaahi papervaalyaane dakhal ghenyaachyaa aadhi swataha Anand Yadavaanni kadambari maage ghetali tyaache kaay? Ekhadyaa sampadakaane kharmarit agralekh lihilaa astaa tar to tondavar padalaa astaa. Swataahaachyaa lekhanaashi lekhak thaam nasel, tar papervaalyaanni kashaalaa gale kaadhayche? Papervaalyaanni Yadavanche paani olakhale, ase mhanaa have tar.
Konatyaahi papervaalyaane dakhal ghenyaachyaa aadhi swataha Anand Yadavaanni kadambari maage ghetali tyaache kaay?
अहो पण येथे आनंद यादव या लेखकाचा प्रश्न येतोच कुठे?
त्यांनी कादंबरी मागे घेतली कारण त्यांच्यावर दबावच तेवढा आला होता. त्याची आपल्याला येथे बसून काय कल्पना येणार म्हणा.
येथे प्रश्न येवढाच आहे, की आपले संपादक अविष्कारस्वातंत्र्याचा कोणत्या पद्धतीने विचार करतात?
आनंद यादवांना हवे तर ठोकून काढा... पण काही भूमिका तर घ्या...
Bapu bahutansh sampadak baaman. Punha bahujan asle tari manovrutti baamnachich...mag aslya prakarnat lihayche mhanje risk yete...tyala waghacha kaleja lagto...Mataa ne lihile tehi mul vishay sodun bakichech hote...
bapu eakda lokmat punemadhye kay chalale aahe te paha.sampadkiya vibhagat sampadkanchi dahashat pasarli aahe patrakar bitharle aahet
Bapu, sukhrup khandekar lokmatchya kinaryala lagle he khare kay ?
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

