जे हत्ते लोकसत्तेच्या ठायी च्यानेल-ए-मसीहा राजीव खांडेकर यांनी एक शैक्षणिक लेख (न्यूज चॅनेल पाहायला शिका!) लिहिला आणि काय सांगू, आमुच्या तर नजरेसमोर स्टारच चमकले!

आमुचे जाऊ द्या! आम्ही आपुले अदनासे बोरूबहाद्दर! आमुच्या अकलेचे म्हणाल, तर व्हर्निअर कैवार वा स्क्रू मापी घेऊनच तिचे माप काढावे लागेल! तेव्हा आमुचे जाऊ द्या! पण त्या स्टारलेखाने "बालबुद्धीच्या नवशिक्या पोरासोरांपासून पांडित्याची झूल अंगावर पांघरून वावरणा-या विद्वतजनांपर्यंत" ऐशा समस्तांची अशी काही श्मश्रू केली आहे, की यंव रे यंव!

(बालबुद्धीची नवशिकी पोरंसोरं ऐसे सत्कारताना स्टार-ए-आझम राजीवजींच्या ज्ञानचक्षुंसमोर खचितच स्टारचे प्रवाचक नसणार! त्या स्टारसन्मानाचे मानकरी नक्की आम्हीच असणार! किंतु पांडित्याची झूल पांघरलेले विद्वतजन म्हणजे नेमके कोण ते काही आम्हांस उमगले नाही! कोण्या संपादकाने च्यानेलांवर टीका करणारा अग्रलेख कधी लिहिला होता काय? चौकशी करावयास हवी.)

ते काहीही असो. परंतु ही उपरोक्त मंडळी (पक्षी - बानपोसो व पांझुपांवि) व अन्य लोक (राजीवजी यांचा 'बघे प्रेक्षक' असा गौरव करतात!) यांच्या टाळक्यात राजीवजींनी बूम हाणला, ते बरेच झाले! "अर्धवट ज्ञानातून आलेली अज्ञानमूलक टीका" करायची म्हणजे किती करायची? त्यास काही प्रमाण? बानपोसो यांच्याकडे एकवेळ दुर्लक्ष करता येईल, पण पांझुपांवि हे सुद्धा उठसूट च्यानेलांवर टीका करतात म्हणजे काय? समजतात तरी कोण हे स्वतःला? स्टारमाझाचे अँकर?

बरें टीका व आक्षेप तरी काही ज्ञानमूलक असावेत ना! किंतु नाही. २६-११ पासून आम्ही ऐकतोय. तीच ती टीका आणि तेच ते आक्षेप! हे म्हणजे च्यानेलांवरील वृत्तदळणासम झाले! राजीवजी म्हणतात, "शक्य असते तर या मंडळींनी (पक्षी - बानपोसो व पांझुपांवि) चॅनेलवाल्यांना अंगठे धरून वर्गाबाहेर तरी उभे केले असते किंवा अरबी समुद्रात तरी नेऊन बुडवले असते!" (खरेच अशी काही आफत आली असती, तर किती हाहाकार माजला असता! कल्पना करा, की सनसनीचा सन्माननीय सादरकर्ता वर्गाबाहेर अंगठे धरून उभा असता, तर त्या वर्गावर जाण्याची वर्गशिक्षकांची तरी हिंमत झाली असती काय?) तथापि असे काही आता होणे नाही! कारण की स्टार-ए-आझम, च्यानेल-ए-मसीहा, बूमबहाद्दर राजमान्य राजेश्री राजीव खांडेकर यांनी आपल्या लेखणीच्या धारदार खांडाने या एकेका आक्षेपाचे राईराई एवढे तुकडे केले आहेत! टीकाकारांच्या अक्कल व समज व हुशारी व ज्ञान यांवरच थेट धावा बोलून त्यांचे शिरकाण केले आहे!

वास्तविक समस्त टीकाकारांना गारद केल्यानंतर राजीवजींची च्यानेलबचाव मोहिम फत्तेच झाली होती! या दिग्विजयानंतर स्टारमाझावरून भुईनळे व पाऊस व चिडिबार व आपटबार फोडावयास हरकत नव्हती! परंतु राजीवजींचा थोरपणा येथेच दिसतो! पत्रकार हा समाजाचा गुरु असतो (व त्यातील काही राज-गुरु आणि काही शिक्षणसेवक असतात), हे त्यांस नीटच माहित असल्याने, त्यांनी लगोलग प्रौढशिक्षणाचे राष्ट्रीय अभियानही हाती घेतले. त्या अंतर्गत बानपोसो व पांझुपांवि व बघे प्रेक्षक यांच्या आरोपांची शहानिशा करावयास घेतली. राजेश्री म्हणतात, "त्याने सारेच गैरसमज दूर होतील असे नाही. पण किमान हे माध्यम समजायला तरी मदत होईल."

तर वाचकांतील "बालबुद्धीच्या नवशिक्या पोरासोरांपासून पांडित्याची झूल अंगावर पांघरून वावरणा-या विद्वतजनांपर्यंत" समस्तहो,
राजेश्रींनी च्यानेलांवरील आरोपांची शहानिशा कशी केली?
च्यानेलांबाबतच्या गैरसमजांचे निर्दालन कसे केले?
हे माध्यम कसे समजून दिले?
याबाबतची उत्सुकता आपुल्या मनी दाटून आली असेल ना?
परंतु आपण त्याकडे पुढच्या एपिसोडी वळू.
तोवर गृहपाठ म्हणून कळते समजतेला भेट देऊन वाचा रा. रा. राजीव खांडेकर यांचा एज्युकेशनल लेख.

This entry was posted on 5.2.09 at 15:23 . You can follow any responses to this entry through the comments feed .

14 comments

Waiting Bapu, waiting for second part...

February 5, 2009 6:17 PM
yash  

bapu, rajubhai khandekarchya chanelvar baghnyasarke khup kahi aste, fakt kan band karun ghayche..... dhant dhan

February 5, 2009 6:28 PM
Anonymous  

dhyant dhyan!!!!!!!!!!!!!!!

February 5, 2009 8:59 PM
Anonymous  

Chyanelanchi ek gammat sangto bhavano, parva star mazachi ek reporter karyakartyana 'karyakartagan' ase mhanit hoti. Tar tyachyahi parva vagle bhaunchya chayaynel varchimumbaihun nagpurla geleli reporter manit hoti ki, babasahebanchya darshanala bhavikanchi gardi hot aahe.....
Ya chyaynel bhagininche aani tyaynchya sampadakanche bhasha shikshan kase karayche ?

February 5, 2009 10:04 PM
Anonymous  

अरे कोण तो वागळे भाऊंच्या चॅनेलवर टीका करतोय, वागळे म्हणाले ना बरोबर आहे तर बरोबर आहे, तुम्हाला आयबीएनच्या थेट भेट मध्ये पाठवायचे का, मग कळेल वागळेंच्या चॅनेलवर टीका करणा-यांचे काय होते ते !!!!!!!!!!!!!!!!

द.ग.डे

February 5, 2009 11:07 PM
Anonymous  

'चॅनेलवाल्यांना अंगठे धरून वर्गाबाहेर तरी उभे केले असते किंवा अरबी समुद्रात तरी नेऊन बुडवले असते! '

या ओळींना आमचा विरोध आहे, चॅनेलवाल्यांना समुद्रात बुडवले असते तर तेथील जलचरांनी आमच्यावर खटला गुदरला असता,

हाहाहाहहाहाहाहाहाहाहाहहाहाहा

February 5, 2009 11:15 PM

रा. रा. राजीव खांडेकर यांचे चुकले नसून चॅनेलांवर अनेकदा उगाच टिका केली जाते. ज्यांना काहीही कळत नाही, असे लोकसुदधा टिका करतात. एकदा चॅनेलमधे काम करून पाहा म्हणजे तुम्हाला कळेल की येथे कशी लढाई असते ती. पेपरांच्या बातमीदारांपेक्षा चॅनेलांचे बातमीदार बातम्या पटकन मिळवतात. तसेच पेपरवाले घरात नाही तर आफिसात बसून बातम्या मिळवतात. आमचे तसे नसून, आम्हाला स्पाटवर जावेच लागते. हे कष्ट कोणी विचारात का घेत नाही. बातम्या त्याच त्या दाखवता म्हणता मग लोक पाहतात तरी कशाला पुन्हा पुन्हा. नव्याने येणारांसाठी बातम्या सारख्या दाखवायला लागतात येवढेही पेपरवाल्यांना, संपादकांना समजत नाही का. लोकसत्तेच्या संपादकांनी चॅनेलवर टिका केली होती. तेथेच लिहून रा. रा. राजीव खांडेकरसरांनी तिला मस्त उत्तर दिले याबदल त्यांचे अभिनंदन. बापू पुढचा लेख लिहिताना या गोष्टीचा विचार करा मगच लिहा. तुम्ही पेपरवाल्यांना आणि चॅनेलवाल्यांना एकाच तराजूत टाकू नका, ही विनंती. खांडेकरसरांचे पुन्हा अभिनंदन.

February 6, 2009 12:21 AM
राजन टाकळीकर  

'एक स्टार माझाचा प्रेमी' हे साक्षात राजुभौ खांडेकर आहेत, असे ''कळते-समजते'.

February 6, 2009 4:52 PM
स. दा. टोले  

या स्टारमध्ये एका साक्षेपी साहित्यिकाची कन्या 'नांगर' (पक्षी - निवेदक) आहे. तिने गेल्यावर्षी अ.भा.म.सा. कारपोरेशनचे सुप्रीमो रा.रा. ठाले पाटील यांच्याशी बोलताना 'तारे' तोडले होते. तिला ''थेट प्रक्षेपणात'' तोंडघशी पडावे लागले होते. हे खांडेकर विसरले काय?

February 6, 2009 5:08 PM
लो.का. सांगे  

खांडेकर महाशयांनी जरा आपल्या बालवाडीला ''बोधामृत'' पाजावे.
'आपले ठेवायचे झाकून , लोकांचे पाहायचे वाकून' ते याला म्हणतात.

February 6, 2009 5:16 PM
बाळ  

बाळ: आआअ...., ईईईई...ऊऊऊऊ !!
आई: काय झाल माझ्या राजाला रडायला.
बाळ: आई आई, ते खांडेकर काका बघ न कशे माला रागवतात ...ईईई ....ऊउऊ.
बाळ: काका म्हणतात की आता रान्गनारी बाले शुदधा...ईई ...ऊउऊ... त्यांचा समाचार घेतला पायजे. आई , समाचार घेतला पाहिजे म्हणजे काय ग ?
आई: अरे पिल्लू, च्यानालातले काही बालं कसा लोकांचा समाचार घेतात, तसाच हा पण समाचार.
आई: लोकांना उलट सुलट प्रश्न विचारायचे, त्यांची उत्तरे द्यायला त्यांना मुलीच वेळ द्यायचा नाही, चुकीच्या बातम्या दखावय्च्या अन मग मध्येच मार्र खायचा...हाच काय तो समाचार.

( २ मिनिटे शांतता व् नंतर बाळ हसायला लागत)
बाळ: आछ्या अश्या शमाचार होय...मग तर माला पण घ्यायला आवडेल संजू काकांचा शमाचार. आई मी जाऊ त्यांच्याकले त्यांच्या शमाचार घ्यायला ?
आई (स्वयंपाक घरातून): जा हो बाळ...पण आधी खाऊन तर घे की.
बाळ: आई मी शंजू काका, लाज्दीप काका बलखा काकू...सगळ्यांचा एकदम शमाचार घेनाल
आई: हो रे माझ्या राजा...आधी हा घास खा बघू पटकन
बाळ:...अणि ना आई मध्येच मझ्यावल कोणी ओरडला न ताल में त्यांना बाबुल्बुआ म्हणुन 'कुमाल काका ला बोलावेल' आशा शांग्नाल...मग तर माला कुणीच रागावनार नाही...हो ना आई ?

(या नाट्या चा उत्तरार्ध बापूंच्या भाग २ बरोबर प्रसिद्ध होइल)

February 6, 2009 7:15 PM
Anonymous  

good!

February 7, 2009 12:58 AM

रा. रा. कपिल, यश, स्टार माझाचा प्रेमी, स. दा. टोले आणि अनामवीरहो,
तुमच्या प्रतिक्रिया वाचून आमुच्या मनींचा मोगॅम्बो खुश झाला.

त्या बाळाने तर धमालच केलीय! (खासगीत सांगतो, बापूंच्या लेखापेक्षा मला बाळाच्या पुढच्या प्रतिक्रियेचीच उत्सुकता लागलेली आहे.)
लगे रहो...

February 7, 2009 10:28 AM
Anonymous  

bapubhau khandekar mastarachi tumhi pani laaun keli. binpanyane karayachi hoti tyanchi shmashroo.

February 7, 2009 1:05 PM

Post a Comment