'सकाळ'च्या विशिष्ट अशा कौटुंबिक जिव्हाळ्याच्या निःपक्षपाती 'शैली'मुळे एखाद्या सुंदरशा बातमीचे कसे भजे होते, याचा एक नितांत सुंदर नमुना रविवारच्या (दि. ११ जाने.) अंकात पाहायला मिळाला.
पुण्यात झालेल्या 'वसंतोत्सव' या कार्यक्रमात शनिवारी झी मराठीवरील 'आयडिया सारेगमप'च्या 'लिटल चॅम्प्स'चा परफॉर्मन्स झाला. (प्रतिथयश गायकांनी वाईट वाटून घेऊ नये, परंतु या बालगायकांचा परफॉर्मन्स हेच यंदाच्या 'वसंतोत्सवा'चे खरे आकर्षण होते!) या मुलांनी उभ्या महाराष्ट्राला 'येड' लावलेय. लहानांपासून थोरांपर्यंत आणि शास्त्रीय संगीताच्या कानसेनांपासून पॉप संगीताच्या दिवाण्यांपर्यंत सर्व जण यांचे अक्षरशः 'फॅन' झाले आहेत. यात काहींचा अपवाद असेल, काही यांना 'बालकामगार' म्हणून हिणवतही असतील, परंतु यांनी महाराष्ट्राला वेड लावलंय ही गोष्ट खोटी मात्र नक्कीच नाही. असो. तर अशा या मुलांनी 'वसंतोत्सव' गाजवला. त्यांचा परफॉर्मन्स खूप रंगला, हे न्यूज चॅनेल्सवर दिसले.
ज्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिला नाही, त्याची टीव्ही न्यूजही मिस केली, अशा पुणेकरांना या कार्यक्रमाची 'बहारदार' बातमी 'सकाळ'मध्ये वाचावयास मिळाली. स्वर्गस्थ नानासाहेब परुळेकरांची शप्पथ घेऊन सांगतो, 'सकाळ'ने त्या बातमीचे अक्षरशः भजे केले... तेही ताजे म्हणून विकले जाणारे शिळेपाके भजे! बातमी वाचल्यानंतर घडलेला प्रसंग तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहिला पाहिजे, असे आम्हाला आमच्या वरिष्ठांनी शिकवले होते. पण 'सकाळ'ची बातमी वाचली आणि डोळ्यांसमोर वसंतोत्सवाऐवजी सुतकोत्सवी प्रसंग उभा राहिला! बातमीतील एक परिच्छेद केवळ गाण्यांच्या यादीने भरलेला होता. (गाणी आणि वाणसामान यात फरक असतो हे बहुधा त्या सकाळच्या लिटिल चॅम्पला ज्ञात नसावे!) कार्यक्रमात नाना पाटेकरने जी धमाल उडवून दिली, त्याचा तर साधा उल्लेखही नव्हता.
हीच बातमी 'लोकसत्ते'त वाचली, तेव्हा लक्षात आले की, हा कार्यक्रम किती रंगतदार झाला होता! या 'लिटल चॅम्प्स'सोबत धमाल करताना नाना पाटेकरचा फोटो आणि 'नानाचा ठेका अन् लिटल चॅम्प्सचा धमाका' असा आकर्षक मथळा पाहूनच मन त्या बातमीकडे वळले. याउलट 'सकाळ'मध्ये अत्यंत कोरडा असा फोटो आणि प्रचंड गोंधळात टाकणारे रुक्ष हेडिंग. (बहारदार सतारवादनाने रसिक मंत्रमुग्ध, वसंतोत्सवातील आकर्षणः बालगायकांनीही मने जिंकली!) यामुळे त्या बातमीवर एक क्षणसुद्धा थांबावेसे वाटले नाही. बरे, बातमीच्या लीडमध्ये बालगायकांचे वर्णन आणि हेडिंग बहारदार सतारवादनाने रसिक मंत्रमुग्ध? हा काय प्रकार? सकाळमध्ये सध्या बातमीदार, उपसंपादकांचे प्रशिक्षण सुरू असल्याचे कळते-समजते. कदाचित या प्रशिक्षणानंतर तरी त्यांच्या बातम्यांमध्ये फरक पडावा! आमेन!!
(Posted by चांगदेव पाटील २.०, दि. १२ जाने. २००९)
(इमेज मोठी करण्यासाठी तिच्यावर क्लिक करा.)
14 comments
चांगदेवा, साधी गोष्ट आहे. तो कायर्क्रम झी टीव्हीचा होता. साम मराठीचा नाही. आपण स्पधर्कांच्या बातम्यांना फार महत्त्व देत नाही. हे कसे विसरलात.
सच्चा पुणेकर
प्रिय सच्चा पुणेकर,
तुमचे म्हांने बरोबर आहे... स्पर्धकांना इथे पब्लिसिटी नाही मिळत... पण बातमी छान लिहिता आली असती ना... पोलिसांकडून नोट येते ना, तशी लिहिली आहे टी... हे काय आशय प्रोग्रामच रिपोर्टिंग झाला ???
कार्यक्रम वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचा, कलाकार झी टीव्हीवरील सारेगमपचे...मग सकाळने माध्यम प्रायोजकत्व का बरं स्वीकारावे?
अजुन एक मजा म्हणजे सकाळ या प्रोग्राम चा मीडिया स्पोंसर आहे... आणि लोकसत्ता मस्त बातम्या देते...!!!
आमचे येथे कोणत्याही बातमीचे मस्तपैकी भजे करुन मिळेल... त्यासाठी खास आचारी नेमलेले आहेत...आमचे कडे त्याची खास परंपरा आहे. सूचना- भजे खाल्लानंतर ग्राहकांनी ते सपक, मिळमिळीत असल्याची तक्रार करु नये. ऐकली जाणार नाही...आमचे येथील भज्यांची हीच खासियत आहे.
सध्या टीव्हीची पेपरांना स्पर्धा आहे. ते पाहता बातम्या अधिक रंजक, प्रत्ययकारी शैलीने लिहिल्या जाव्यात अशी अपेक्षा असते. याचा अर्थ बातम्यांना उगाच पदरचा मसाला लावू नये. त्या वास्तवच असाव्यात. पण त्या वाचताना वाचकांना आपणच जणू घटनास्थळी आहोत, असे वाटले पाहिजे. तसे झाले तरच टीव्हीचा उथळ हल्ला आपण परतवून लावू शकू. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता नुसत्या घटनांमध्ये अडकून पडता कामा नये. बातमीपुढची बातमी देणे गरजेचे आहे. घटनांच्या विश्लेषणावरसुद्धा जास्त भर द्यायला पाहिजे. पेपरचे हेच बळ आहे. शिवाय अज ूही वाचकांचा विश्वास पेपरवरच आहे. टीव्ही त्यांना विश्वासू वाटत नाही. पेपरांनी हे लक्षात ठेवून बातम्या दिल्या पाहिजेत. - एक पेपरप्रेमी पत्रकार.
Kharetar yapurvich vhayla pahije hote, pan yanimittane ek suchvave vatate,RASIK MANTRAMUGDH ya shabdanvar bandi ghalayla pahije kinva tase lihinaryancha pagar kapla pahije. Karan bhashnapasun bhajnanparyant kashanehi rasik mantamugdh hotat...karan navshike vartahar culturli aadani astat...aani sampadak, upsampadaksuddha....
बंदीचाच विषय निघाला आहे तर उत्साहात, सज्ज. संपन्न, तृप्त दूरवस्था, हेळसांड, साम्राज्य, त्रस्त, या शब्दांवरही बंदी घाला. तसेच नागरिकांची मागणी, कळते, समजते, शक्यता या शब्दप्रयोगांवरही बंदी घातली पाहिजे.
मुद्रितशोधक
अरे तुम्हा सगळ्यांना एक गंमत सांगतो, नक्की तीच त-हा इथे झालीय याची आम्ही (इथे मी एकटाच, वी पीपल नव्हे )सकाळच्या गळ्याची आणि लोकसत्तेच्या डोक्याची शप्पथ घेऊन सांगतो. (महाराष्ट्र टाइम्सच्या कशाची शप्पथ घ्यावी ते न उमजल्याने)
वन्स अपॉन टाइम. आम्ही सकाळच्या कुठल्याशा एका कार्यालयात उमेदवारीचे धडे गिरवत होतो. तेव्हाची ही गोष्ट आहे.
आमचे त्यावेळचे साहेब (म्हणजे तेव्हा आम्हाला ते शॉलीट वाटायचे.) बातम्या अशा फर्मास करायचे,की पाहत राहावे.
एकावेळी चार चार बातम्या.
अशावेळी त्यांचं एका बातमीचं पहिलं पान कधी दुस-या बातमीमध्ये शिरे आणि बातमी उपसंपादकांकडे कॉकटेल सूप स्वरूपात जाई. सकाळ विद्यापीठात तेव्हाही (सालाबादप्रमाणे) नवशिक्यांचाच अधिक भरणा असल्याने विचाऱयांची
पाने जायची वेळ आली तरी अर्थ लावण्याची वाट लागून जायची. बरं साहेबांनी रात्री आौषध घेतलं की हल्क,सूपरमॅन,स्पायडरमॅन आणि याप्रकारचे सगळे मॅन त्यांच्यासमोर फिके पडावेत. (त्यामुळे बातमीचा अर्थ विचारणार कोण)
मग उपसंपादक यांच्या बातम्या अशाच लावणे पसंत करू लागले. या साहेबांना अनेकदा शहरातल्या राजकारणी, बडे आसामी यांच्याकडे जावयाचे असल्याने. त्या चारी बातम्या अनेकदा हेडिंगा न देताच आँपरेटरकडे सरकवल्या जात.
आँपरेटरवरही साहेबांचाही वचक असल्याने, इन्ट्रो वैगेरे हे शब्द आँपरेटर सहज म्हणू शकत आणि पहिल्या तीन ओळींत हेडींग असतं या हिशोबाने आँपरेटरांकडूनच बातमीला शीर्षक दिले जाई.
त्यातून अनेक गंमती जमती झाल्यात ज्याची आठवण सकाळला कायम आहे. (मी कशाला सांगू. तुम्हीच आठवा)
तसेच हेही बातमी लिहिणारे साहेब आणि त्यांचे आँपरेटर असावेत आणि बातमीच्या पहिल्या तीन ओळीत हेडिंग असते, हा ग्रहदेखील.
आता आम्ही
अब मै बिलकूल बूढा हू, गोली खाकर जिता हू.
तब भी मेरे पेपर के अंदर.............
है गंमत, देता सकाळ.............
हे गाणं म्हणण्यास प्रवृत्त करीत आहेत.
किती वर्ष गेली तरी बदल अजूनही नाही.
- टोच्या बोबडे
चांगदेवा, बातम्या लिहिणे ही देखील एक कला आहे. म्हणजे सर्व उपसंपादक की बोर्ड बडवण्याचे काम करीत असले तरी त्यांच्यात सृजनशीलता असावी. मात्र, त्यांच्यातील सृजनशीलता मारून टाकण्याचे काम होत असते. ब-याचदा एकाच चाकोरीतल्या बातम्या दिसून येतात. म्हणजे सकाळची लीडची बातमी आणि अँकर दोघांनाही सारखीच भाषा दिसते, त्याचे कारण हेच असावे. तरीही उपसंपादकाला काहीतरी अक्कल असते, याचा विचार त्यांच्या वरिष्ठांनी केल्यास आणि ख-याखु-या चुका आणि वाक्यांची रचना (हल्ली वाक्यरचना मात्र भयानकच असते.) याकडे लक्ष देऊन बातम्या केल्यास पेप्रात पुन्हा असे भजे तळण्याची वेळ येणार नाही. सकाळ आम्हालाही प्रिय आहे.
द. ग. डे
वृत्तपत्राचे हॉटेल झाले तर ... या शीषर्काचा एक लेख २६ नोव्हेंबर २००८ रोजी सहयोगी बातमीदार वर प्रसिद्ध झाल्याचे आठते. त्याचा तर येथे काही संबंध नाही ना.....
भजेवाला
bapu, kharach pepratla ha bhongalpana, aaitkhaupana, bashakalpana.....etc....kiti visheshane lau,,,tumhi kharach jabardast mandta buwa....tumhala salam!!
- gurunath
बेस्ट, फक्त लोकसत्ताचा बातमीदार जागेवर गेला होता का तेवढी माहिती घ्या देवा, हल्ली तिथल्या रोट्यामध्ये सकाळच्या बातमीदारांची नावे लिहून गेट करावे असे िलहितात म्हणे
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
▼
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
▼
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

