कळते-समजते मध्ये वाचा -
अखेर मुंबईत पुढारी येतोय!
आपला सिनेमास्कोप वर्षाचा झाला
वर्ल्ड न्यूजपेपर कॉंग्रेसलाही मंदीचा फटका

याशिवाय आणखी बातम्या
आणि खास लेखांच्या लिंक्स...

------------------------------------------
निवेदन
गेले काही दिवस बापू आत्रंगे यांचे लेखन बातमीदारमध्ये प्रसिद्ध होऊ शकले नाही, याबद्दल क्षमस्व.
पण आपल्या नेहमीच्या शैलीत बापू उद्यापासून बातमीदारवर दाखल होत आहेत.
- ब्लॉगएडिटर

This entry was posted on 22.1.09 at 11:06 . You can follow any responses to this entry through the comments feed .

2 comments

भंकस  

अरेच्या बापू पुन्हा......

काही तरी भानगड दिसतीय. दुसऱ्यांच्या भानगडी बाहेर काढल्या की असे होणारच. बापू तुम्हा एखादा स्टनो बिनो का हो ठेवत नाही. बाकीच्या पेपरचे संपादक नाही का तसे करीत. रजेवर असले, सुट्टीवर असले अगदी परदेशात असले तरी अग्रलेख ठोकून मोकळे. स्टेनोला डिक्‍टेशन द्यायचे की झाले काम. एका जिल्हा वृत्तपत्राचे दिवंगत संपादक तर असे होते, की ते आपल्या रायटरला फक्त पॉंइटस्‌ सांगत. ते सांगतानाही त्यांचे डोळे कधी बंद होत हे त्यांनाही कळत नसे. ते पुन्हा उघडेपर्यंत इकडे अग्रलेखच तयारच नव्हे पेपरही छापून होत असे. त्या काळात संपर्क माध्यमे कमी होती. तरी हे महायश उपलब्ध माध्यमांचा वापर करून अग्रलेख चुकू देत नव्हते. चक्क पोलिस ठाण्यातून दूरध्वनी करून त्यांनी अग्रलेख सांगितला आहे. (क्राईम रिपोर्टने पोलिस ठाण्यातून बातमी सांगावी तसा). मग आता बापूंना का बरे असे जमत नाही? म्हणूच वाटते काही तरी भानगड......
भंकस

January 22, 2009 3:31 PM
Anonymous  

दिवंगत संपादक अग्रलेख डिक्टेट करायचे?
कमाल आहे बुवा!
दिवंगत संपादकाला पोलिस ठाण्यावरही नेले होते?
हे म्हणजे पोलिस प्रेस नोट सारखंच प्रकरण दिसतय. मयताने पोलिसांच्या आवाहनास न जुमानता पोलिसांवरच गोळिबार केल्याने पोलिसांनी स्वसंरक्श्णार्थ केलेल्या गोळिबारात मयत जखमी झाला आणि रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचे निधन झाल्याचे डॊक्टरांनी जाहीर केले...
हा: हा: हा:
हल्केच घ्या हो, भंकसराव
-बन्या

January 24, 2009 10:09 AM

Post a Comment