ते पाहा... ते पाहा....
महामहिम अशोकराव चव्हाण (पक्षी - मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) कसे गुपचुपचाप उत्तर महाराष्ट्री निघाले आहेत...
अंहं. विलासरावांपासून तोंड लपवून नाही निघालेत ते! असेच चाललेत. पण कुणासही सुगावा लागू न देता.
आता कशासाठी चालले आहेत म्हणे! जनस्थान पुरस्कारानिमित्ताने नाधोंना (पक्षी - माजी आमदार, विधान परिषद. अशोकरावांसाठी एवढी आणि एवढीच ओळख पुरेशी आहे!) भेटण्याकरीता का ते चालले आहेत? तसेही नसावे. अशोकराव आधी स्वतःचे स्थान पाहतील की जनस्थान? मग जात आहेत तरी कशासाठी?
सांगतो, सांगतो... परंतु आम्ही जे सांगतो आहोत तो डेटा चुकूनही नारायणराव, गडकरी, विलासराव प्रभृतींच्या हाती जाता कामा नये हं... तेव्हा रा. रा. रविकिरण देशमुख, रा. रा. प्रताप आसबे, रा. रा. सुरेंद्र हसमनीस, रा. रा. पद्मभूषण देशपांडे आणि रा. रा. प्रतापराव थोरात हे वगळून अन्यांनो, इकडे कान करा...
म.म.मु. अशोकराव चव्हाण हे उत्तर महाराष्ट्री, म्हणजे नेमके सांगावयाचे तर नाशकातील सातपुरात रा. रा. उत्तमराव कांबळे यांच्याकडे चालले आहेत.
कशासाठी म्हणजे? तुम्हांस काय वाटले पुस्तक प्रकाशन आहे तेथे? उत्तमराव दिवसाला एक पुस्तक लिहितील हो! स्वागताध्यक्षाची डायरी, एसेनेनची डायरी, नियोजनाच्या डायरीची डायरी... नववर्षी भेट मिळालेली प्रत्येक डायरी लिहून त्याचे पुस्तक काढतील ते. किंतु म.म. मुख्यमंत्र्यांना वेळ पाहिजे ना प्रकाशनाला जाण्याइतका. वेगळ्याच कामासाठी निघालेत अशोकराव.
साधी-सुधी भेट नसणार आहे ती.
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य हो,
ती बिंब-प्रतिबिंबाची भेट असणार आहे!
ऊन-सावलीची भेट असणार आहे!
होय, या भेटीत मुख्यमंत्री आपल्या शॅडोला गळामिठी घालणार आहेत. या हृदयाचे गूज त्या हृदयी घालणार आहेत. चार युक्तीच्या गोष्टी समजून घेणार आहेत. अनुभवाचे बोल ऐकणार आहेत. एसेनेनचे अहवाल वाचून महाराष्ट्राचे प्रश्न समजून घेणार आहेत.
काय म्हणालात?
शाडू माहिती आहे... कारण की हल्ली तर बरेचसे संपादक शाडूचेच असतात... पण ही शॅडोची भानगड काय आहे?
किती हो तुम्ही अज्ञानअंधकारी!
तुम्हांस हेही माहित नसावे ना, की जनस्थानभूषण पत्रपंडित एसेनेनसम्राट राजमान्य राजेश्री उत्तमराव कांबळे हे या उभ्या महाराष्ट्राचे शॅडो मुख्यमंत्री आहेत!
आम्ही कोणत्याही प्रकारचे नशापाणी न करता, स्वतःच्या अक्कलहुशारीने, कोणत्याही दबावाविना, पूर्ण शुद्धीने हे येथे घोषित करीत आहोत, की रा. रा. उत्तमराव कांबळे हे महाराष्ट्राचे शॅडो मुख्यमंत्री आहेत! (जानुआरीच्या प्रथम सप्ताहीच बहुधा त्यांनी आपल्या केबिनीत बसून एकट्यानेच स्वतःस पद व गोपनीयतेची शपथ दिली म्हणतात. आता अशा शपथविधीत काय 'आनंद' असणार?... नव्हताच, असे सांगणारे सांगतात!)
आम्ही हे जाणतो, की ही माहिती भल्तीच उत्तेजक आहे. ही माहिती समजताच उभ्या महाराष्ट्रात राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक खळबळीची त्सुनामी येणार आहे. मंत्रालय हादरून जाणार आहे. शेअरबाजार व्होलाटाईल होणार आहे. परंतु आज ना उद्या एखाद्या सरकारी अहवालात ही माहिती आलीच असती. आणि एकदा अहवालात आली म्हटल्यावर, त्याच्यावरून तंतोतंत बायलाईन स्टोरी करायला एसेनेनला कितीसा वेळ लागतो?
आता तुम्ही पुसाल, की अनेकांच्या शॅडोलाही अज्ञात असलेले हे शॅडोवृत्त (यात आम्ही रा. रा. दिनेश गुणे (पक्षी - एसेनेनचे मुंबई प्रमुख) यांना गृहित धरलेले नाही. त्यांना सग्गळे माहित असते. फक्त ते मृणालताई नानिवडेकरांना सांगत नाहीत!) आम्हांस कोठून समजले? तर त्याचीही एक कथा आहे.
अगदी नेमके सांगायचे, तर जानुआरीतला असाच कोणता तरी दिवस होता. आम्ही असेच ५९५ बुधवार पेठेत गेलो होतो. तेव्हा मनीं म्हटले, सकाळभवनी आलोच आहोत, तर राज्यातील भारनियमनाच्या प्रश्नाची सुटका कुठवर आली आहे याची चौकशी तरी करावी. तेव्हा आम्ही रा. रा. यमाजी मालकर (पक्षी - संपादक, सकाळ) यांच्या केबिनी गेलो.
त्यांस लाल सलाम केला.
मालकरांचे लक्षच नव्हते.
तेव्हा दरवाजावर टकटक केले.
मालकरांचे लक्षच नव्हते.
तेव्हा आम्ही मोठ्ठ्याने इन्किलाब झिंदाबादचे नारे दिले.
चुकून 'नामांतर झालेच पाहिजे' अशी घोषणासुद्धा दिली.
मग सेवादलातली आठवतील तेवढी गाणी म्हटली.
पण त्यांचा काही प्रतिसादच नाही.
मनीं म्हटले, त्या पेटत्या दिवसांवर खुशहालीचे पाणी पडलेले दिसतेय! अरेरे!!
अखेरीस आम्ही मोठ्याने सीटीसी, व्हीसी, केआरे, गार्सिया असे काही चित्रविचित्र आवाज काढले.
त्याबरोब्बर साहेबांनी वर पाहिले!
आम्हांस या, या, असे म्हणत त्यांनी हातातील स्क्रूड्रायव्हर कम टेस्टर खमिसाच्या खिशात टाकला.
म्हटले, हे काय?
ते म्हणाले, काही नाही. कपॅसिटरवर लेख लिहिलाय. प्रुफं तपासत होतो.
म्हटले, व्वा. जोरात काम चाललेय.
ते म्हणाले, हे तर काहीच नाही. हा फक्त बारा अँपियरचा लेख आहे. यानंतर लवकरच मी एक ४४० व्होल्टचा लेख लिहिणार आहे.
म्हटले, व्वा व्वा. सरकारला धक्का देण्याचा विचार दिसतोय.
ते म्हणाले, एक जबाबदार शॅडो वीजमंत्री म्हणून आम्हांला ते केलेच पाहिजे. या सरकारमध्ये लोडशेडिंग दूर करण्याची कपॅसिटीच नाही.
शॅडो वीजमंत्री? पण तुम्ही तर संपादक आहात ना? बरे तुम्ही तर अशोकरावांना सकाळनायक असा पुरस्कारही नाही दिलात. मग तुम्ही मंत्री कसे काय झालात?
त्यावर मालकरसर डोळे बारीक करून दाढीतल्या दाढीत अत्यंत मृदुमुलायम हसले.
म्हणाले, आमचा पेपर सगळ्यांच्या एवढा पुढे आहे, की आज आमच्याकडे संपूर्ण मंत्रालय तयार आहे. आम्ही शॅडो मंत्रिमंडळाची नियुक्ती केलीय. सगळेच संपादक कॅबिनेट मंत्री झालेत. असोसिएट एडिटर राज्यमंत्री. तो आमचा डेस्क पाहिलात? उपसंपादक पानं लावताहेत तिथं. तिथला बोर्ड पाहिलात. काय लिहिलंय त्यावर?
आम्ही पाहिले. त्यावर कक्ष अधिकारी असे लिहिलेले होते! तेथे बाजूलाच एक शिपाई उभा होता. तो पट्टेवाला असावा!
आमच्या चेह-यावर अज्ञानाचा भारनियमनी अंधकार पाहून तेच पुढे म्हणाले, आम्ही प्रत्येक संपादकमंत्र्याकडे एकेक खाते दिले आहे.
म्हणजे खातेवाटपही झाले का तुमचे?
हो. मी वीजमंत्री आहे. म्हणजे यापुढे मी फक्त महाराष्ट्रातील ऊर्जा प्रश्नाचा अभ्यास करणार. मग वर्षातून एक दोन वेळा त्यावर अग्रलेख लिहिण्याची वेळ आली, की मीच तो अग्रलेख लिहिणार. समजा रस्त्याचा प्रश्न आला, की त्यावर आमचे सार्वजनिक बांधकाममंत्री लिहिणार..
अच्छा. हे असे आहे तर! चांगले आहे! पण समजा पत्रकारितेचा प्रश्न आला तर? वृत्तपत्रातील कामगारकपातीचा प्रश्न आला तर?
त्यावर ते काहीच बोलले नाहीत!
मग आम्ही आमच्या अंगभूत भोचकपणे विचारले, बाकी मग कोणाकोणाकडे कोणकोणती खाती आहेत?
ते म्हणाले, त्यासाठी तुम्हांला उत्तमरावांना भेटावे लागेल. ते आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनीच खातेवाटप केले आहे. म्हणजे संपादकांना मंत्रीपदं दिलीत. वृत्तसंपादकांकडे सचिवपदं सोपवलीत... असं बरंच काही त्यांनी केलंय... खूप कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत ते. सारखे अहवाल मागत असतात! पक्षश्रेष्ठींचा पाठिंबाही त्यांना आहे.
आम्ही म्हणालो, व्वा व्वा!
वृत्तपत्रे सरकार पाडत असतात, सरकार आणत असतात, हे आम्ही पाहिले होते, ऐकले होते.
सकाळ हे अखिल ब्रह्मांडातील पहिलेच वृत्तपत्र असावे, की ज्याने स्वतःचेच सरकार स्थापन केले आहे.
व्वा व्वा! वाहव्वा!! हे तर तंतोतंत सामराज्यच!!
सकाळभवनाच्या बाहेर पडताना आम्ही पाहिले,
त्या मजबूत इमारतीवर कशाची तरी भली मोठी शॅडो पडली होती.
कशाची असावी ती?
(Posted by बापू आत्रंगे, दि. १४ जाने. २००९)
13 comments
"आता अशा शपथविधीत काय 'आनंद' असणार?... नव्हताच" - You are right...ya saglyat 'anand' nasatoch!
GREAT. SAKAAL MADHYE NAV NAVIN
MURKHAPANE KARNYACHEE FASHIONCH
PADALEE AHE.AP NNA KHARETAR
CHANGALA GURU HAWA AHE...
EK SAKAL GRASTA BUDHWAR PETHEE
बापू,
अभिजित मुळ्ये-कार्लेकर यांसी आरोग्य -कल्याण (स्वतंत्र कारभार) मंत्रालयाचा जाम कंटाळा आल्याचं कळतं...तुम्हास्नि काही समजतं?
बानयाला उतयालाला तची आई बनायाजवळ गेली.
आई : बान्या बाळ उत आता. पेपर लिहीचा आहे ना?
बान्या: नाही, मी जाणार नाही, मला, सर्वजण चिडवतात.
आई: बाळ , तुला जायलचा पाहिजे,
बान्या: नाही, मी जाणार, तेथे सर्वजण तुकार मुळे आहेत. तो मोठा साहेभी मला यूस्लेस म्हणतो.
आई: तरी जावा लागणार.
बान्या : पण का? चुका ते करतात, आणि मला शिक्षा होते. ते मग स्कोर्कार्ड बनवतात आणि ज़ेरो मार्क देताता. शिवाय तेथे विशीस्ता नवलच म्हाहात्वा आहे.
आई: म्हणजे?
बान्या: उदा- कुलकर्णी, जोशी, देशपांडे याण्यानाच चांगले मार्क पडतात. अमहला नाही.
आई: ते सर्वा बरोबर आहे, पण तरीही तुला तेथे जायलाच हवे ना?
बान्या: पण का?
आई: कारण तू तेथे पेपर काढतोस. तू मोठा माणूस आहेस. पुढच्या वर्षी, दुसरी सळा बघू!
(आई ह्सते आणि, बानयाला तयार व्हायळ पळवते, सांगा हा बान्या कोण?)
BAPU,
SARAKHE SAKAAL LA TARGET KARU NAKA.
TUMHEE MEETH KHALLET NA?
MAG TENVA TO SUDHARALA KA NAHEET?
Evdhe mothe Balaji Guruji aahet. AA ahet. AK ahet. ase sagle milun AK47 peksha jast hotil. Mag sakaal cha game vhayla kitisa vel lagnar ? Jago AP jago...
सकाळमध्ये श ॅडो मंत्रालय स्थापन करण्यामागे असा हेतू आहे, की त्या योगे संपादकांनी त्या-त्या विषयाचा अभ्यास करावा. हा हेतू चांगलाच आहे. परंतु संपादकांनी अभ्यास करावा यासाठी जर असे करावे लागत असेल, तर मग त्याचा अर्थ असा होतो, की संपादक अभ्यास करीत नाहीत. मग ते नेमके करतात तरी काय.
दुसरी गोश्ट म्हणजे संपादक चतुरस्त्र असावा असे म्हणतात. जे लोक तसे असतात त्यांनाच संपादकपद मिळते असा आमचा समज आहे. या शाडो क ॅबिनेटने या समजावरच प्रशनचिन्ह निर्माण केले आहे.
स काळ मधे नोकरशाही ही आधीपासून होतीच. नवीन कंसेप्ट चा बोजवरा कसा वाजववा हे त्या नोकरशहिकडून शिकावे. सिक्स सिग्मा, एस ए पी, नंतर के आर ए, स्कोर्कार्ड, कंतेंट प्लान, सी ती सी (म्हणजे काय?) इत्यादी. आणि आता हे नवे फॅड. दर पंधरा दिवसाणी काहीतरी येते. कर्मायचारी तर आता ह्या सर्वांची चेष्टा करायला लागलेत.
येथे मालकचा अजेंडा वेगळा आहे आणि ह्या नोकरशाही चा वेगळा. आता स काळ चे खर्या अर्थाने स्रकारीकरण zहले. लगे रहो..... बापू
sakal sakali anandi anand chohikade, sakal times pasun 'saamsum' chohikade...
Dhamdum APMLchi jorjorat...avinash bhosale, Sontakke pasun suryadatta paryantchy tayar mandalinchya prasiddhichi bharbharat...
useless, beakkal, hell, shabdanchi relchel, VC madhun apmanachi kadu bhel...
Pan sangta konala... package mothe, maan-martaab mothe...apman gilayche karanhi titkech mothe..
Ladhte raho bappu....
Bapuji,
Tumhi je lihata te khare tar aste..ani satya pan aste...Amchya PA la thodi budhi dya na...manje te sakal madhil kachra saf kartil..ani sakal ha nawa sarkha sakal hoil
Post a Comment
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
▼
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
▼
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
वागळे, आयबीएनवरील हल्ला आणि पत्रकारिता - साधारणत: दीड वर्षापूर्वी आयबीएन लोकमत सुरू झाले. त्यावेळी वागळे आणि सरदेसाई असे दोन दमदार चेहरे, वेगळे कार्यक्रम, नेमकेपणा इ. मुळे मीदेखील आयबीएनचा फॅन झा...3 days ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

