नवे वर्ष उजाडले. मोरुच्या बापसाने लाथ घालून मोरूला मोबाईलवरून उठविले. कारण मोरूने आपल्या बापसालाही हॅप्पी न्यू इयरचा एसेमेस पाठविला होता! (आता तुम्ही विचाराल, हे हॅप्पी न्यू इयरचे एसेमेस म्हणजे काय? तर ज्यांचा मजमून सहसा कोणीही वाचत नाही व ज्यावरील फक्त प्रेषकाचे नावच वाचले जाते त्यांस हॅप्पी न्यू इयरचे एसेमेस असे म्हणतात.) आपल्या इष्ट मित्र-मैत्रिणी व कचे-यांतील साहेबादीकरून सर्व लोकांस असंख्य एसेमेस पाठविण्याचे सत्कर्म पूर्ण झालेले असल्याने मोरूही उठला व त्याने समोर पडलेले वृत्तपत्र डोळ्यांसमोर धरले.
"डॅडी..." मोरूने बापसास हाक मारली.
बापूस खजिल झाला! डॅडी हे संबोधन ऐकल्यानंतर तो बिचारा नेहमीच खजिल होतो.
मोरु विचारत होता, "नव्या वर्षाचे संकल्प म्हणजे काय हो?..."

येथून पुढे आम्ही त्यांचे संभाषण अजिबात ऐकले नाही.
नव्या वर्षांचे संकल्प या विषयावर कोट्यवधी लेखकूंनी परार्धवेळा इतके काही विनोदी इत्यादी लिहिलेले आहे, की आता तसले काही लिखाण दिसले तरी स्वतःचे डोळे फोडून टाकावेत असा संकल्प मनी येतो! नवे वर्ष उजाडल्यावर लोकांना संकल्प दांडिया का खेळावासा वाटतो, हे आम्हांस तरी कोडेच आहे. पण लोक करतात संकल्प! सर्वसामान्यांचे सोडून द्या, (त्यांचे नेहमीच सोडून द्यायचे असते!), पण आमची आतली खबर अशी आहे, की काही जानेमाने पत्रउस्तादसुद्धा डायरीबियरीत गुपचूप संकल्प लिहून ठेवतात!

तर अशीच काही गोपनीय संकल्पचित्रे आम्हांस अलीकडे पाहावयास मिळाली. (जशी मंत्रालयातील गोपनीय कागदपत्रे रा. रा. नितीनभौंना मिळाली... आमच्याकडेही काही 'राणे' असतातच म्हटलं!) बहुजनहिताय बहुजनसुखाय ती संकल्पचित्रे येथे सादर करीत आहोत. -

रा. रा. कुमार केतकर (लोकसत्ता) -
लोकरंगमधील भाकिताच्या लेखांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तेव्हा आठवड्याचे भविष्यही आता मीच लिहिन असे म्हणतो!

रा. रा. आनंद आगाशे (सकाळ) -
कोणत्याही विषयावर कोणालाही रिपोर्ट तयार करण्यास सांगणार नाही. सांगितले, तर तो रिपोर्टाचा मेल स्वतःच्या डोळ्यांनी वाचीन!

रा. रा. भारतकुमार राऊत (टाइम्स ग्रुप) -
या वर्षापासून पुन्हा पत्रकारिता करीन! गेल्या काही वर्षांपासून मनातच राहिलेला हा संकल्प यंदा मार्गी लावीन!!

रा. रा. संजय राऊत (सामना) -
संपादक म्हणजे पक्षप्रवक्ता की पक्षप्रवक्ता म्हणजे संपादक हा गुंता यंदा मायबाप पत्रकारितेच्या साक्षीने सोडवीन!

रा. रा. अशोक पानवलकर (मटा) -
खुलासा - यंदा आम्ही कोणताही संकल्प केलेला नाही, याबद्दल 'दिलगिर' आहोत!

रा. रा. प्रकाश कुलकर्णी (नवशक्ती) -
अंक काढीतच राहीन... काढीतच राहीन... काढीतच राहीन... शेवटी म्हटलेच आहे ना - कर्मण्येवाधिकारस्ते!

रा. रा. संजीव लाटकर (साम मराठी) -
फक्त सहा महिने.... सहा महिन्यांत सामला जगातील नंबर एकचा चॅनेल बनवीन!

रा. रा. आल्हाद गोडबोले (प्रहार) -
एसिडिटी वाढू देणार नाही... वाढली की मग त्यावर पुन्हा लेख लिहावा लागेल!

रा. रा. यमाजी मालकर (सकाळ) -
सतत कपॅसिटरवर लेख लिहून महाराष्ट्र भारनियमनमुक्त करीन!

(Posted by बापू आत्रंगे, दि. २ जानेवारी २००९)

This entry was posted on 2.1.09 at 00:05 . You can follow any responses to this entry through the comments feed .

13 comments

Anonymous  

रा. रा. बापू अत्रंगे (बातमीदार)
ब्लॉग नियमित पने अपडेट करेन... अधून मधून छोटी किंवा मोठी सुट्टी घेणार नाही...

January 2, 2009 6:52 PM

नक्की रे गड्या... नक्कीच हा संकल्प करीन...
(नाही तरी ते मोडण्यासाठीच असतात असे म्हटलेलेच आहे कोणीतरी!)

January 2, 2009 7:10 PM
टिकोजीराव टिकले...  

`साम` सूम होता वाटे
सटा ला द्यावा फाटा;
`यूसलेस` बाबूंसंगे
झाला केवऴ घाटा...

सांगा बरं आम्ही कोण ?

January 2, 2009 9:05 PM

बापूसाहेब आत्रंगे,
रा. रा. कुमार केतकर यांनी केलेला संकल्प पुर्ण होत आहे. त्यांचे त्रिकालवेध हे सदर सुरू झालेय लोकसत्तेत. म्हणजे आता केतकर सर भविष्यच सांगणार. हा बातमीदार इम्पक्ट म्हणायचा का? हाहाहा.
केतकरसरांचे हे सदर जरूर वाचावे... बाकीच्या संपादकांनी!

January 3, 2009 11:38 AM
भंकस  

संकल्प बातमीदाराचा ः दोन बातम्या कमी देईन पण बातमीदार ब्लाॅक नियमित वाचेल.
संकल्प उपसंपादकाचा ः इतर आवांतर वाचन नाही जमले (तसे कधीच जमत नाही) तरी बातमीदार आणि त्याची इतर उपप्रकाशने (पेपरची आवृत्ती असावी तसे) आवश्यक पाहिल. (बातमीवर मारतो तशी नजर मारेल)
संकल्प संपादकांचा ः इतर पेपरचे संपादकीय वाचणे जसे आवश्यक आहे, तसेच बातमीदार वाचणेही आहे. हे लक्षात ठेीन.
संकल्प व्यवस्थापनाचा ः बातमीदारवर नजर ठेवीन. आपल्या कायार्लयात त्याची चचार् होऊन देणार नाही, अन आपले लोक वाचणार नाहीत, याची काळजी घेईन.
संकल्प भंकसचा ः बातम्या पाडाव्यात तशा काॅमेंटा पाडणार नाही.

भंकस

January 3, 2009 3:58 PM
Anonymous  

ha bhakas ala re parat.

January 3, 2009 7:23 PM
Anonymous  

बापू, तुम्हाला काही कामधंदे आहेत का ? का उगीच रिकामा....... ...तुंबड्या लावीपणा चाललाय ?

January 3, 2009 11:56 PM
Anonymous  

भंकसराव, तुम्ही म्हणजे अगदीच बुवा...

January 4, 2009 10:31 AM

रा. रा. अनामवीर,

बापू, तुम्हाला काही कामधंदे आहेत का? का उगीच रिकामा....... ...तुंबड्या लावीपणा चाललाय?

अगदी खरे आहे तुमचे! हाच प्रश्न हल्ली आम्हांलाही पडतो!!

January 4, 2009 10:53 AM
Anonymous  

अखेर सुहाणी ऑण्टीनी काहीतरी लिहिले म्हणायचे!

January 4, 2009 9:34 PM
Anonymous  

सुहानी रात ढल चुकी..... पी - वी - - वी वी-
....

ना जाने............................


बापू, शेवटला कॅपेसिटरवाल्या माळकरांचा संकल्प लय झ्याक हाय.

सम्दे कॅपेसिटर कंडेन्सरवाले यमाजीकी जय, असंच हल्ली म्हणतात म्हणे.

त्यांच्याकडे एक पुस्तक तयार होईल इतके लेखही आहेत कन्डेन्सरावर आणि त्यांच्या स्वप्नात कन्डेन्सरच येतात असे आगाशे ( हे आनंद नव्हे बरंका. मोहन) यांनी नुकतेच कुणालातरी सांगितल्याचे स्मरते.

-चक्रसोड स्वामी
इंडिया (पुण्यातून)

January 4, 2009 11:27 PM
Anonymous  

Bapu, Kay rao tumi Lokmat chya saglya sampadakancha avman kela. Kiman sakhi manch chya karyakramana hajeri lavin, asa tyancha kahrakhura sankalp tumhi tyachi dakhal ghetli nahi. Pan mhanun kahi pharak padnar nahi. ata varshabhar Lokmatchya 11 edition na chukta vacha. bagha sagle Krishna sampadak.....

January 5, 2009 8:56 PM
Anonymous  

Bapu, Kay rao tumi Lokmat chya saglya sampadakancha avman kela. Kiman sakhi manch chya karyakramana hajeri lavin, asa tyancha kahrakhura sankalp tumhi tyachi dakhal ghetli nahi. Pan mhanun kahi pharak padnar nahi. ata varshabhar Lokmatchya 11 edition na chukta vacha. bagha sagle Krishna sampadak.....

January 5, 2009 8:56 PM

Post a Comment