
आपणांस आतापर्यंत कळाले किंवा समजले असेलच,
की ए-सिडिक कम्युनिकेशन्सच्या कारभा-यांनी हे काही तरी नवीन प्रकर्ण काढले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार कळते-समजते हे मराठीतील पहिलेच मीडियाविषयक ब्लॉगपत्र आहे.
वस्तुतः ते पहिले असो वा दुसरे, वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यांस त्याचे काही घेणेदेणे आहे का? ते किमान वाचनीय आदी असो म्हणजे झाले, एवढेच त्यांचे लय-नाही-मागणं असणार!
तर कळते-समजते तसे वाचनीयबिचनीय आहे का, याचे सखोल परिशिलन केल्यानंतर आमच्या लक्षात आले, की यात मराठी मीडियाच्या अनादीअनंत विश्वातल्या छोट्या-मोठ्या बातम्या आहेत. (हे म्हणजे काही तरीच हं! मीडियातल्या बातम्यांसाठी येथे येण्याची काय गरज? मग प्रेसरूम, पत्रकारसंघ आणि कचेरीतील कॅंटिने ही व्यासपीठे कशासाठी असतात?... ठीक आहे. हेही असू दे.) याशिवाय येथे विविध वृत्तपत्रांच्या लिंक्स, काही महत्त्वाच्या पत्रांतील एडिटर व अन्यांचे लेख, काही पत्रपंडित व अन्यांच्या लेखांच्या लिंक्स, झालेच तर मराठी पत्रकारांच्या ब्लॉग्जचे दुवे असा माहितीचा लिंक्सरोड आहे.
एकंदर समस्त मराठी पत्रकारांस उपयुक्तबिपयुक्त असे काही तरी हे कळते-समजते दिसते आहे.
बघा तुम्हांस कसे वाटते ते?
आणि blogeditor.acidic@gmail.com या पत्त्यावर त्याबद्दल जरूर कळवा. येथे contact me नावाचे एक बटण आहे. तेथूनही तुम्हांस आमच्याशी संपर्क साधता येईल.
(आणि मित्रहो, तशीच काही माहिती असेल ना, तर या पत्त्यावरून आमच्या कानातही सांगत जा. कळते-समजतेय ना?)
(Posted by बापू आत्रंगे, दि. ३१ डिसें. २००८)
10 comments
suhani
ani gadgil
va kay chan nav ahe.
patrakaritecha bahvishya ujwal
tumi khup pudhe jal
suhani gadgil. tumala subhecha.
bapuna denyachi mala kahi garaj nahi.
-
chakrasod swami
(from tokyo, japan)
Ya chakrasod swamila ATS chya tabyat dyayla pahije
आनी यो चक्रसोड स्वामीच एटीएसमंदी असला तर काय कराल ?
त्यापेक्षा भौ आपण त्यांना प्रशांत महासागरात बुडवून टाकू. (म्हणजे मनाने)
सारखे या देशातून त्या देशात फिरतात. जसे खारीगावमधून घोडबंदर रोडवर जावं कुणी अशा थाटात कधी युरोप तर कधी आशियात (वर आपण कुठे हाय ते सांगूपण पाहतात मॅडसारखं)
प्रशांत महासागरच ठीक आहे. बरोबर ना सुहानी काकू ?
बापू लय झ्याक उपक्रम काढला हायती. आता नवे-जुने सगळे पत्रकार शाणे होतील.
हे वर्ष बापू तुम्हाला, तुमच्या टीमला आणि समस्त ब्लॉग वाचकांना अधिक शहाणपणाचे जावो.
सुख- समृद्धी काय असली नसली तरी चालते.
-टोच्या बोबडे
kon re ha tochya.
mala budvto kay ?
tula kay vatla, mala pohota yet nahiy ?
patticha pohonara ahe. anekda
dharamtar te getway poholoy.
kolyanchya jalyat na adakta
kay samajle ?
rahila amchya bhrmanticha. tar ami kamasathi aj ithe tar udya tithe asto. ani jithe asto tithun pan ha blog vachto.
koni tochya kiva tokyane ithe amala budavnyachi bhasha karnyaitpat tyanchi unchi ahe ka te tapasave.
- cakrasod swami
(prashant mahasagaravaril jahajavarun)
हा आणखी कक्रसोड कोण निर्माण झाला.
त्याने भलतंच गंभीर घेतलेलं दिसतंय.
अरे टोच्या मला कुठेही बुडव. तयार आहे मी बुडून जायला येवढा आयुष्याला वैतागलोय. कामाने.
-चक्रसोड स्वामी,खराखुरा
(अजूनही टोक्योत असलेला)
हा चक्रसोड स्वामी काय म्हणतोय, 'टोक्यो'त असलेला की 'टोक्या'त असलेला ?
द. ग. डे
बाकी, सुहानी (कि सुहाणी) आण्टीच्या आगमनामुळे आनंद झाला. वाळवंटात हिरवळ आल्यासारखे वाटते.
marathi patrakaranchi wait saway, disali hirawal ki mar khade! kay anamik aani kolhapure?
Post a Comment
मागील लेख
-
►
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
सहयोगी बातमीदार
-
The Economic Times and ET NOW Code of Conduct - *Introduction:* What We Stand For As a brand, The Economic Times / ET Now (hereinafter referred to as ET) draws its power and influence from two things: 1...4 months ago
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

