आपणांस तंगी नेहमीचीच!
त्यात आता ही आर्थिक मंदी.
म्हटल्यावर म्हटले,
परिस्थिती भल्तीच वंगाळ पातली आहे!
दशदिशांना कपातीचे वारे वाहते आहे.
पगाराला कात्री लागते आहे.
पेपरांचे काय आणि च्यानेलांचे काय
बुडत्यांचे चाललेत खोलात पाय
असे वंगाळ वंगाळ झाले आहे!

वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
एकंदरितच देशकालस्थिती अशी चिंताजनक नसती व आम्हांस वेतन कपातीचे वा चाकरी गमावण्याचे भय नसते, तर आत्ता... आत्ता याक्षणी आम्ही पुनवडीतील अल्का चौकात ईसकाळच्या अभिनंदनाचा सप्तरंगी फ्लेक्स लावला असता!
किमानपक्षी बुधवारात जाऊन करवीरभूषण रा. रा. सम्राटदा फडणीस (पक्षी - ईसंपादक, ईसकाळ) यांस एक कटिंग चहा पाजून वर खैनीची चिमूट दिली असती!

आता तुम्ही विचाराल, की बापू, एकीकडे वृत्तपत्रांची पाने कमी झालेली आणि दुसरीकडे रद्दीचा भाव उतरलेला अशी चहूबाजूंनी आर्थिक कोंडी झाली असताना, कुणास चहा पाजण्याचा अविचार तुम्हांस सुचतो तरी कसा? असा काय बेहद्द आनंदीआनंदगडे तुम्हांस झाला आहे?

तर वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
ही खुषीचीच बाब आहे.
तुम्हांस ठाऊक असेलच, की एकीकडे 'साम्राज्या'चा पाय खचलेला आहे!
(खुषीची बाब ही नाही! )
त्यास कॉस्टकटिंगची लिपापोती सुरू आहे! (हीसुद्धा नाही!)
अशा बिकट परिस्थितीत ईसकाळने काही जाहिरातींवर बंदी घातली आहे!
खुषीची बाब आहे ती ही!
पैसा जाय पर प्रेस्टिज न जाय ही पत्रकुलाची रीत, हा पत्रकुलाचा धर्म!
ईसकाळ त्यास डोळे खुले ठेवून जागला आहे!

सकाळ पत्रास तुम्ही काहीही म्हणा... (तसे आपण म्हणतोच! सोडतो की काय? म्हणावयाचे असे तेथेच तर असते!!)
तर सकाळला तुम्ही काहीही म्हणा, किंतु काही सालांमागे सकाळने जोशींच्या गुटख्याच्या दुभत्या जाहिरातींवर बंदी घातली होती,
या सकाळच्या स्वच्छसंस्कृत धाडसास दाद ही दिलीच पाहिजे, की वाह सकाळ!!
आता तोच कित्ता ईसकाळने गिरविला आहे. ईसकाळने गुगलद्वारे प्रसारीत केल्या जाणा-या जाहिरातींवर बंदी घातली आहे.
कारण?
त्या जाहिरातींमध्ये काही तरी आक्षेपार्ह आढळले!
(आक्षेपार्ह म्हटल्याबरोबर आमुच्या अंगभूत भोचक स्वभावाने फणा काढला! चौकशी करता समजले, की गेले दोन दिवस ई-सकाळवर अर्धनग्न ललनांची छायाचित्रे असलेल्या एस्कॉर्ट सर्व्हिसच्या जाहिराती प्रकाशित होत होत्या! पण त्या पुण्यात म्हणे दिसल्याच नाहीत! दुर्दैव, दुसरे काय!!)

सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळातही ईसकाळने आक्षेपार्ह जाहिराती बंद करून त्यापासून मिळणा-या धनराशीवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला, याकरीता ईसकाळचे अभिनंदन करणे वा ईसंपादक रा. रा. सम्राट 'कायत्रास' फडणीस यांस कटिंग चहा पाजणे आम्हांस भागच आहे.

तर वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
एवढे दोन शब्द बोलून आम्ही आपली रजा घेतो.
आमची मटा ऑनलाईनवरील सेक्स न्यूज व न्यूड व्हर्जिन मेरी प्ले बॉयवर ही बातमी वाचण्याची वेळ झाली आहे!!

(Posted by बापू आत्रंगे, दि. १५ डिसेंबर २००८)

This entry was posted on 15.12.08 at 16:00 . You can follow any responses to this entry through the comments feed .

21 comments

ABASAHEB MUJUMDAR, PUNAVADEE  

MANAPASUN ABHINANDAN!

DOGHANCHEHEE. SAKAALCHE. TUMACHE.

YA DISPATCHVAR PAHILICH PRATIKRIYA

LIHITANA PARULEKARANCHI ATHAVAN

HOTE AHE..BAPU, APAN KADHITARI LIHA

KINVA MEE LIHIN TYANCHYAVISHAYEE..

December 15, 2008 5:35 PM
Anonymous  

http://www.loksatta.com/lokprabha/20081219/lpfront.htm

see this link.... vrutt atirekhi....

December 15, 2008 8:25 PM
Anonymous  

हा हा हा सहयोगी बातमीदारवरील एका बातमीची जन्मकथा खास आहे.... यावरून तरी पत्रकारांनी काय तो बोध घ्यालया हवा. लोकप्रभाच्या ताज्या अंकातील मते बातमीदाराशी मिळती जुळती आहेत.

December 16, 2008 8:24 PM
Anonymous  

असे झांले काय? मग हे बरेच झाले म्हणायचे की. जाहिरातीवरून आठवले किती दिवस झाले याबद्दल लिहावे असे मळमळत होते पण संधी नव्हती आली आता फ़ायदा घेत लिहूनच टाकते कशी. ते लोकसत्तावाले अलिकडे पहिल्या पानावरच पान पान भर जाहिरातीच्या लंगोट्या घालून येतात हो. अलिकडे चेनेलावर पाहून दुसरया दिवसाची हेड लाईन समजते पण काय आहे ना ती पेपरात वाचल्याशिवाय जिवाला बरे नाही वाटत सकाळी डोळे चोळत पेपर हातात घ्यावा तर पहिल्या पानावरच पानभर भस्सकन जाहिरातच दिसते. जिवाला बरे नाही वाटत.

December 17, 2008 9:06 AM
Anonymous  

काहौ भगिने

लोकसत्ताला जॅकेट घालवून मिरवायची सवय आहे.

मराठी वृत्तपत्रात एकच तर वृत्तपत्र आहे ज्याला जॅकेट वापरायची ऐपत आहे.


रविवारचे ५ रुपयांचे वृत्तपत्र पाहा. पान १ पूर्ण रिकामं आणि मग रविवार विशेषची पानं सोडली तर मजकूर काहीच नाही.

जाहिरातींवर पेपर चालतो.

काश हमभी लोकसत्तात होते. तो यहांकी रिकामी पन्नोंसे छुटकारातो मिलता.

असं तुझ्याच प्रमाणे वाटतं ग भगिनी.

-एक अति पानलाव्या

December 17, 2008 10:11 AM
Anonymous  

असं काही नाही अनामिक भो. आता लंगोटी पत्र पण जॅकेट घालतात. जाहिरातदारां गरज आहे ती. आणि आती पानलावे अहो, जाहिरातीची पाने लागतात म्हणूनच आपल्याला पगार मिळतो. लावा लाव पानेच लावा . त्याशिवाय पयार्य नाही.

December 17, 2008 11:08 AM
Anonymous  

एका परंपराप्रिय, संस्कृतीनिष्ठ वाचकाची एका दिवसाची डायरी -

सकाळी ऑफिसला जाण्यास निघालो, तर पत्नी म्हणाली, अहो आपल्या शोनीला करिना स्टाईल मिनी स्कर्ट घ्यायचाय. एक महिना झाला तिने शॉपिंग नाही केलंय. तेव्हा मग गुपचूप क्रेडिट कार्ड काढून दिलं. आणि बाहेर पडलो.
रस्त्यातली, रस्त्याकडेच्या जाहिरातींवरली हिरवळ पाहात पाहात ऑफिसात पोचलो. तिथे बाजूचा लेले काहीतरी पाचकळ ज्योक सांगत होता. जरावेळ तेथे उभा राहिलो. म्हटले, जाताना लेल्याकडून आज एखादी भक्त पुंडलीक सीडी नेली पाहिजे. खूप दिवसात काही रसाळ दर्शन झालेले नाही.
मग काम केले. हल्ली नेटवर पहिल्यासारखी गम्मत राहिली नाही. अनेक साईट ब्लॉक केल्यात. तेव्हा मग ई-सकाळ काढून वाचले. ते वाचताना धक्काच बसला. कसल्या घाणेरड्या जाहिराती होत्या त्यावर. त्या जाहिराती पाहण्यात वेळ कसा गेला समजलेच नाही. पण इसकाळवर अशा जाहिराती म्हणजे आपल्या थोर संस्कृतीचे काय होणार. ऑफिस सुटण्यापूर्वी ई-सकाळला एक झणझणीत मेल टाकून दिला. संपादकाला बेअक्कल म्हटले. म्हटले, अशाने आपल्या परंपरांचे काय होणार. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मग लेलेकडून ती सीडी घेतली आणि घरी निघालो.

December 17, 2008 5:26 PM
Anonymous  

वा भौ अनामिक नंबर ७.

तुम्ही आमचे खरे मित्र.

आम्हीपण नेमके असेच केले.

म्हणजे ई सकाळला शिव्या दिल्या.

पण आम्ही लेलेंच्या राहिलेल्या

सगळ्या सीडीज देऊन टाकल्या.

त्यांच्याकडून नवं काही घेतलं नाही.

-लेले यांचे चेले

December 17, 2008 11:10 PM
विश्वास पाटील  

होय. हा सकाळचा आदरशच
सकाळ ने गुगलच्या जाहिराती बंद करून पहिल्यांचादा त्याग केला आहे, असे नाही. आपल्या या आदरश वृत्तीचे दशर्न सकाळने सुरवातीपासून दिले आहे. गुटख्याच्या जाहिराती सकाळमध्ये नव्हत्या. बराच काळ दारुच्या जाहिरातीही सकाळ छापत नसे. मटक्याचे आकडेही सकाळ छापत नाही. राजकीय अगर इतर जाहिराती छापतानाही सकाळमध्ये संपादकीय संस्कार केले जातात. वाचकांची फसवणूक होईल, अशा जाहिराती सकाळ छापत नाही. या गोष्टी सध्याच्या पत्रकरितेत वेगळ्या आहेत. पण हे वेगळपण सकाळने जपले आहे. हे नाकारून चालणार नाही. वाचकांनी कसे असावे, वाचक कोण असावा हे वृत्तपत्र टऱवू शकत नाही. पण आपण कसे असावे ह तर ठरविता येते. सकाळने तेच केले आहे. त्यामुळे लेलेंचे चेले कसेही असले तरी सकाळच्या या त्यागाचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही.

विश्वास पाटील

December 18, 2008 2:46 PM
Anonymous  

ahi vishvasrao ekade kote? ani aplaii bhavani, tochya bobade, bhankas kote gele sagale....

December 18, 2008 2:51 PM
Anonymous  

बापू, स्मार्ट मैतरावर ही बारी कशी आली ?

यकीकडं वाचकास्नी चांगलंच द्यावं म्हनूनशान सकाळच्या साइटवरनं वाइटसाइट ज्यायराती काडून टाकल्यात. पैका कमावयाचा चांगला चानस घालवला तरी त्यांच्याकडं 'कॉस्ट कटिंग' न्हाय, आन आमच्या स्मार्ट मैतरावर कॉस्ट कटिंगची बारी आली. त्यांचा मुंटा बी आता गायब झाला. त्यो निगतोय आता मेन पेपरातनं आन आसं बी आयकलंय की मटाच्या साइटलाबी कॉस्ट कटिंगचा आजार झालाय, खरं हाय का ह्ये ? स्मार्ट पेपर तर चवीचवीनं वाचायचा ऐवज हाय, आसं असताना मैतराला ह्यो कसला आजार झाला ?

द.ग.डे

December 18, 2008 9:53 PM
Anonymous  

अरे विशू, अजून आहेस तू लहान शिशू

-आदरश वृत्तीचे दशर्न-

सकाळबद्दल बरीच माहिती दिसते रावा

लेलेंकडून तुम्हीबी सिड्या घेवून जात होतात ना.


आम्ही पायलं व्हतं.

मध्येच ताप आला की काय असा.

-लेले यांचे दुसरे चेले

December 18, 2008 10:32 PM
Anonymous  

पीपीपी................................................पीपीपी ............................................पीपीपी ...................पीपीपीपी..........

तुतारी नसल्याने वर्दी देणा-या आमच्या गाडीचा हॉर्नच तुतारी समजावा.

आमची (येथे वुई पीपल नाही) आठवण केल्यामुळे क्षणात हजर होत आहे.

अनामित्रा. आम्ही शोध लावत होतो.

जुगलच्या (गुगल) जाहिराती कॅन्सल केल्याने नक्की सकाळने किती पैशांवर पाणी सोडलंय ते.

अखेरीस तो शोध लागला.

३ लाख ४७ हजार ३१९ रुपये फक्त.

येवढं मासिक उत्पन्न ई सकाळला महिन्याला मिळत होतं. आता मिळणार नाही.

का तर म्हण अश्लील फोटो होते.


येवढ्या पैशात नागपूर सकाळमध्ये ५० उपसंपादक

कोल्हापूर सकाळला ४७ उपसंपादक आणि १० रिपोर्टर आणि १६ अंशकालीन वार्ताहर (३० रुपये ,अक्षरी तीस फक्त -कॉलमावर) मिळाले असते.

पुणे सकाळमध्ये २५ उपसंपादक ५ रिपोर्टर,९ अंशकालीन वार्ताहर (या फक्त हायफंडू मुली, वुईथ जीन्स,टी-शर्ट आँऱ शॉर्ट वुईथ थर्टी रुपीज पर कॉलम सेंटीमीटर,फ्रॉम रानडे आँल्सो )

गोमंतकमध्ये अगणित उपसंपादक आणि मोफत वार्ताहर मिळाले असते.(येथे अंशकालीन वार्ताहर पाहायला मिळत नाहीत)

मुंबई सकाळमध्ये मात्र मारून मुटकून १० उपसंपादकही मिळाले नसते.

हा शोध आणि हे गणित करण्यात वेळ गेला. त्यामुळे आपल्या भेटीस उशिर झाला.

भवानी काय करतेय ते माहिती नाही. कदाचित तीही कुठलंसं गणित करीत असावी.

भवानी तू कुठे....

याद आली जाम.....

-टोच्या बोबडे

December 18, 2008 10:48 PM
Anonymous  

sakalchi site paperwale vachtat, updates sathi, tyani ata kay baghayche.... vishwasrao.... ani sakalchya patrkaranihi adarsh asve nahi ka....

December 18, 2008 11:18 PM
Anonymous  

आमचा आदर्श फक्त लेले आणि त्यांचे म्हणणे

- शोले- ले ले- शोले- ले- ले

अनेकदा शोले दे दे- देदे - दे- दे

(टीपा- शोले म्हणजे अश्लील सीडीजचं दुसरं नाव

हे नरेंद्र महाराजांनाही माहिती आहेत - कुठले ते विचारू नका मग खरा विनोद होईल)

-लेले यांचे पाचवे चेले

December 18, 2008 11:33 PM

ईसकाळच्या त्या जाह्यराती बंद केल्यावर करवीरभूषण सम्राटदा फडणीस लई कावले व्हते. हे खरं हाय का गा?
आम्चे म्हनने असे, का कायसुदिक गरज नव्हती त्या जाह्यराती काडायची? आसं उघडं वागडं फोटू बगून कोनच्या संस्कृतीचा पदर ढळत आसल, तं मंग ती संस्कृतीच बुधवारात श्रीकृष्ण टाकिजच्या म्होरं बसवून ठेवायच्या लायकीची हाय.
येक आठवलं. म्हराटी भाषेतल्या कथाकादंबरीकवितांची दुकानं पुन्यातल्या बुधवार पेठेत असणं हा काव्यगत न्याय म्हनावा का हो राव?

December 19, 2008 1:22 PM
विश्वास पाटील  

अरे अनामवरी आणि अन्य हो किती काॅमेंटा टाकता. तुमचा पगार किती, तुम्ही बोलता म्हणजे लिहीता किती? जरा विचार करा. बातमीदारवरही जाहिरीती यायला लागल्यात म्हणजे बापू काही तुम्हाला मानधन देणार नाहीत. फुकटात लिहायचे आहे हे. गोमांतकच्या बातमीदारांसारखे. लक्षात ठेवा.

विश्वास पाटील

December 20, 2008 11:31 AM
Anonymous  

विश्वासराव जरा पाहा की आरशात

येवढी हौस नाही, तर मग वाचता कशाला कमेंटा

आणि लिहिता पण कशाला तोंड वर (की आणखी काही)करून.

दाखवलीत तुमची मराठी प्रवृत्ती.

जळफळाटाची

लोकांनी काय पानीपत आणि तुमची इतर पुस्तकं वाचून कमेंटा करायच्या काय.

December 20, 2008 11:23 PM
Anonymous  

he patil te navet.... he nuste navachche ahet.... ani jalfalat karne he tyanche awadte kam ahe... kolhapur sakalmadhlya kunlahi vichara....

December 21, 2008 9:19 PM
Anonymous  

ओ बापू, प्रतिभा आटली असेल आता कमेंट करणा-यांची आणि ती सहन करणा-या वाचकांची.

वाजवा बार कुणाचा तरी.

लवंगी फटाकडी असो

नायतर ग्रॅनेड.

काय तो (गौप्य)स्फोट करून टाका नव्या पोस्टचा.

ब्रेक के बाद करणारी मालिका होऊद्यात कसलीतरी.

- टोच्या बोबडे

December 22, 2008 12:19 AM
भंकस  

वाहिन्यांवरील ब्रेकिंग न्यूजला ब्रेक लावण्यात आला आहे. तिकडे बुश यांना पत्रकारांनी बूट फेकून मारला आहे. असे असताना आपले बापू कोठे गेले. एवढा मोठा ब्रेक त्यांनी कधीच घेतल नव्हता. काय भानगड काय आहे. ताज हाॅटेल पुन्हा सुरू झाले. कायर्क्रम झाला. तेथे सुरक्षेच्या कारणास्तव वाहिन्यांच्या पत्रकारांना बाहेरच ठेवण्यात आले. (ताजच्या बाहेर भिकारी नसतात हो, काही तरी शंका उपस्थित करू नका). ते असो पण बापू कोठे गेले हाच घोर जीवाला लगला आहे. उघडले ताज चे दार च्या थाटात आता टाका बापू नवी पोस्ट.

भंकस

December 22, 2008 11:00 AM

Post a Comment